गरुड
गरुड noniyar | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
|
गरुड हा एक शिकारी पक्षी आहे. त्याला पक्ष्यांचा राजा समजले जाते. गरुड हा रॅप्टर्स या प्रकारात मोडतो. हे पक्षी शिकार करतात. गरुड या पक्ष्याच्या काही उपजाती आहेत. सर्व उपजातींचे गरुड साप, इतर छोटे पक्षी, मासे, छोटे-मोठे सस्तन प्राणी यांची शिकार करतात.
गरुडाच्या जाती
[संपादन]- आफ्रिकी मत्स्य गरुड
- काळा गरुड
- टकला गरुड (अमेरिकेचे राष्ट्रीय चिन्ह)
- ठिपक्यांचा पाणगरुड
- तुरेवाला सर्प गरुड
- नेपाळी गरुड
- पहाडी गरुड
- पांढऱ्या शेपटीचा गरुड
- मत्स्य गरुड
- राखी डोक्याचा मत्स्य गरुड
- समुद्र गरुड
- सुपर्ण
- सोनेरी गरुड
- हार्पी गरुड
आकारमान
[संपादन]गरुड बऱ्याचशा शिकारी पक्ष्यांपेक्षा आकाराने मोठे असतात; केवळ गिधाडेच गरुडांपेक्षा मोठी असतात. सर्पगरुड खूप लहान असतात तर फिलिपिन गरुड व हार्पी गरुड खूप मोठे असतात (त्यांचे आकामान साधारण १०० सेंटीमीटर असतो व वजन ९ किलोपेक्षा जास्त असते)
जंगलांमध्ये राहणाऱ्या गरुडांचे पंख छोटे असतात व शेपटी लांब असते. त्यामुळे ते उडताना हवेतल्या हवेत अगदी सहज कलाटणी घेऊ शकतात. अधिक वेगाने, झाडांच्या फांद्यांमधून, लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांना छोटे पंख उपयोगी पडतात. आकाशात उंच भरारणाऱ्या गरुडांचे पंख मात्र मोठे असतात व शेपटी छोटी असते. त्यामुळे ते वाढत्या वातप्रवाहावर सहजतेने तरंगू शकतात. परंतु याच कारणांमुळे त्यांना आकाशात झेपावणे व जमिनीवर उतरणे तुलनेने अवघड जाते[१].
गरुडांच्या चोचीदेखील इतर शिकारी पक्ष्यांसारख्या मोठ्या व बळकट असतात. त्यांच्या बाकदार चोचींमुळे त्यांना मांस फाडणे सोपे जाते. गरुडांचे पाय व पंजे भक्ष्य पकडण्यासाठी बळकट असतात.
कारण त्यांच्या डोक्याच्या मानाने डोळे खूपच मोठे असतात. त्यामुळे गरुडांची नजर खूपच तीक्ष्ण, म्हणजे माणसांच्या चौपट तीक्ष्ण असते. माणसांना दृष्टिपटलावर (डोळ्याच्या पडद्यावर) दर चौरस मिलिमीटरला दोन लक्ष प्रकाश-संवेद्य पेशी असतात, तर गरुडांना एक दशलक्ष, म्हणजेच माणसांच्या पाचपट असतात. माणसांना जरी एकच गतिका (दृष्टिपटलामधील सर्वाधिक कार्यक्षम भाग) असली, तर गरुडांना त्या दोन असतात; त्यामुळे त्यांना एकाच वेळी समोर व बाजूंना पाहता येते. गरुडांच्या डोळ्याची बाहुली खूप मोठी असते; त्यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रकाशाचे कमीत कमी विवर्तन होते, यामुळे देखील त्यांची दृष्टी चांगली असते व त्यांना त्यांची भक्ष्ये खूप दुरूनही दिसतात[२].
खाद्य
[संपादन]गरुडांचे चार मुख्य गट आहेत.-
- बूटेड गरुड- ह्यांचे खाद्य मुख्यतः खारी, ससे, कुकुटाद्य कुळातील पक्षी व कासवे असते.
- सर्प गरुड- ह्यांचे खाद्य मुख्यतः विविध प्रकारचे सर्प असतात.
- हार्पी गरुड- हे गरुड त्यांचा डोक्यावरील पिसाऱ्यामुळे ओळखले जातात. माकडे, शाखावेताळ (स्लॉथ), खडूळ (अपॉसम) हे त्यांचे खाद्य असते. कधीकधी ते छोटे पक्षी किंवा सरपटणारे प्राणी खातात.
- मत्स्य गरुड किंवा समुद्र गरुड- त्यांचे प्राथमिक खाद्य मासे आहे. पण ते छोटे पक्षी, कृंतक[३] व मृत प्राणीदेखील खातात.
घरटे
[संपादन]गरुडांची घरटी काट्याकुट्यांपासून बनलेली असतात व ती बहुधा उंच कड्यांवर किंवा उंच झाडांवरती असतात. बरेच गरुड त्यांच्या पूर्वीच्या घरट्यांमध्ये परततात व काड्या, फांद्यांची भर घालत राहतात. गरुड एका खेपेस एक किंवा दोन अंडी घालतात; पण बऱ्याचदा आधी जन्मलेले व मोठे पिल्लू त्याच्या धाकट्या भावंडांचा जीव घेते, व अशा वेळी पालक मध्यस्थी करत नाहीत. पिलांमध्ये मादी पिल्लू नर पिलापेक्षा मोठे असल्यामुळे वरचढ ठरते.
सांस्कृतिक संदर्भ
[संपादन]संस्कृत साहित्यात गरुडाला पक्ष्यांचा राजा मानला आहे.[ संदर्भ हवा ] अस्तेक लोकांच्या सैन्यामध्ये सैनिकांचा एक खास विभाग होता, त्यांना गरुड योद्धा म्हणत.
मूळच्या अमेरिकन लोकांच्या संस्कृतीमध्ये थंडरबर्ड नावाचा गरुडासारखा काल्पनिक प्राणी आहे.
राष्ट्रीय व साम्राज्य चिन्हे
[संपादन]-
कर्नाटकचे राज्यचिन्ह.
-
इंडोनेशियाचे राष्ट्रीयचिन्ह
-
थायलंडचे राष्ट्रीयचिन्ह
-
उलानबातर या शहराचे चिन्ह
-
बायझेंटाईन साम्राज्याचे चिन्ह
-
जर्मन साम्राज्याचे चिन्ह
-
रशियन साम्राज्याचे चिन्ह
-
आल्बेनियन साम्राज्याचे चिन्ह
-
रोमानियाचे चिन्ह
-
इजिप्तचे राष्ट्रीयचिन्ह
-
रशियाचे राष्ट्रीयचिन्ह
-
मेक्सिकोचे चिन्ह
धार्मिक
[संपादन]हिंदू पौराणिक साहित्यानुसार गरुड हे विष्णूचे वाहन आहे. गरुड हा कश्यप व त्याची पत्नी विनता यांचा मुलगा आहे. दक्षिण अमेरिका खंडातल्या पेरूतील मोशे जमातीत गरुड पूज्य मानला जाई. त्यांच्या कलाकृतींतून त्याविषयीचे संदर्भ आढळतात. भारतीय आध्यात्म्यात गरुडपुराण सुद्धा आहे.
-
संत तुकाराम यांना न्यायला आलेले गरुडाच्या आकाराचे विमान
-
म्हैसूर येथील गंडभेरंड.
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ "गरुडांची माहिती". 2011-08-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-17 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ "गरुडांची दृष्टी". 2011-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-09 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य) - ^ कृंतक (अर्थ : कुरतडखोर प्राणी)
- ^ गरुडपक्ष्याची गुणवैशिष्ट्ये
बाह्य दुवे
[संपादन]- "पीबीएस.ऑर्ग - गरुडाविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "गरुडाच्या दृष्टीविषयी माहिती" (इंग्लिश भाषेत). 2011-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-12-09 रोजी पाहिले. Unknown parameter
|आर्काईव्ह दुवा=
ignored (सहाय्य); Unknown parameter|आर्काईव्ह दिनांक=
ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |