टकला गरुड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टकला गरुड

टकला गरुड पक्षाला शिकारी पक्षी म्हणून ओळखले जाते. टकला गरुड हा १७८२ पासून अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी आहे. अमेरिकेमध्ये ह्या पक्षाला संरक्षण देण्यात आले आहे. टकला गरुडचे पंख मोठे असतात. नर आणि मादी एकसारखे असतात. हे गरुड कॅनडा आणि अलास्का यांपैकी सर्वात जवळ असलेली संयुक्त राज्य अमेरिका आणि उत्तर मेक्सिको आढळतात. हे गरुड मोठ्या प्रमाणावर खुल्या पाण्याच्या जवळ आढळतात आणि जेथे भरपूर अन्नधान्य आणि घनदाट झाडे आहेत तेथे यांचे वास्तव्य असते. १२ जुलै १९९५ रोजी अमेरिकेच्या लुप्त होणाऱ्या प्रजातींच्या यादीतून ही प्रजाती काढून टाकण्यात आली आणि धोकादायक प्रजातींच्या यादीत टाकण्यात आले. अमेरिकेतील बहुतेक ठिकाणी आढळतात, जगभरात गरुडांच्या ६० पेक्षा जास्त जाती आहेत. दर महिन्याला 30 मैलांचा सरासरी दराने वेगाने प्रवास करणारे गरुड प्रवास करतात. १० जानेवारी हा जागतिक गरुड बचाव दिवस म्हणून पाळला जातो.

शरीर रचना[संपादन]

Adult and chick
Haliaeetus leucocephalus

टकला गरुडचे डोके हे पांढऱ्या रंगाचे तर शरीर हे पूर्ण गडद तपकिरी रंगाचे असते. त्यांची शेपटी पांढऱ्या रंगाची असते. चोच, पाय चमकदार पिवळ्या रंगाचे असतात. गरुडांच्या चोचीदेखील इतर शिकारी पक्ष्यांसारख्या मोठ्या व बळकट असतात. त्यांच्या बाकदार चोचींमुळे त्यांना मांस फाडणे सोपे जाते. गरुडांचे पाय व पंजे भक्ष्य पकडण्यासाठी बळकट असतात. टकला गरुडाच्या पंखाचा फैलाव सुमारे सहा फुट असतो. आकाशात उंच उडणाऱ्या गरुडांचे पंख मात्र भरारी घेण्यासाठी लांब असतात आणि शेपूट तोकडी असते. त्यामुळे हवेत तरंगणे त्यांना सोपे जाते परंतु झेप घेणे मात्र तुलनेत थोडे कठीण जाते. गरुडाचे पंजे आणि नख्या सुद्धा बळकट असतात ज्यांचा उपयोग भक्ष्य पकडण्यासाठी आणि जखडून ठेवण्यासाठी होतो. चोच मोठी आणि आकड्यासारखी असते. टकला गरुडला सामान्यपणे ४० मैल पर्यंत उडता येऊ शकते, परंतु शिकार साठी सूर मारत असताना ते १०० च्या गतीपर्यंत पोहोचू शकतात. टकला गरुड हा ५ वर्षाचा वयात प्रौढ पिसारा प्राप्त करतो. ते जंगलामध्ये किमान ३८ वर्षे जगू शकतात. नरांचे वजन ८ ते ९ पाउंड असते; तर मादीचे वजन १० ते १४ पाउंड असते.

वास्तव्य[संपादन]

Bald eagle anatomy

टकला गरुड सहसा जंगल जवळील भागात राहतात, ते शक्य असेल तेवढे मोठ्या प्रमाणात विकसित भागात राहणे टाळतात. ते उंच झाडांवर राहणे पसंत करतात. जिथे मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे व मासेमारीसाठी जवळ आहे अशा ठिकाणी राहतात. तर हिवाळ्यात, ते कोरड्या, खुल्या क्षेत्रामध्ये आढळू शकतात. हिवाळा सुरू झाल्यावर ते मोठ्या वृक्षावर व खुल्या ठिकाणी राहणे पसंत करतात. रात्रीच्या वेळी, दरीमध्ये मोठ्या झाडांवर राहतात आणि हिवाळा दरम्यान गरुड लहान गट पडून बसतात.

घरटे[संपादन]

गरुडांची घरटी काट्याकुट्यांपासून बनलेली असतात व ती बहुधा उंच कड्यांवर किंवा उंच झाडांवरती असतात. प्रौढ गरुड घरटे सोडून जातात. प्रौढ गरुड ४ किंवा ५ वर्षांच्या होईपर्यंत आळशी होऊ लागतात. घरटे सोडून गेल्यावर ते आपला जोडीदार निवडतात व ते पुन्हा त्याच ठिकाणी दरवर्षी येतात जिथे ते राहत होते. तिथेच जवळ आपले घर बांधतात. त्यांचे घरटे हे खूप मोठे असते. कोणत्याही उत्तर अमेरिकन पक्ष्याचा घरट्यापेक्षा मोठे असते. साधारणपणे ५-६ फूट रूंद आणि २ फूट खोल असते. गरुड एका खेपेस एक किंवा दोन अंडी घालतात. पिल्लाचे संगोपन दोघे मिळून करतात.

खाद्य[संपादन]

This eagle has a sizeable wingspan

टकला गरुडचा प्राथमिक आहार म्हणजे मासे, जे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ मिळतात. ते गोड्या पाण्यातील मासे पकडून झाडावर जाऊन त्याचे सेवन करतात. तसेच, ससे, गिलहरी आणि इतर लहान सस्तन प्राणी देखील खातात.

दृष्टी[संपादन]

गरुडाकडे उत्कृष्ट दृष्टी असते. त्यांची ही दृष्टी माणसांच्या चौपट तीक्ष्ण असते. टकला गरुड हा उडत असताना, फडफड करत असताना शंभर फुटावरून पाण्यातील मासे पाहू शकतो. गरुडाचा डोळ्यातील पडदा अर्धपारदर्शक असल्यामुळे गरुड डोळ्यावरही पाहू शकतो. गरुडाचे डोळे हे मोठे असतात. डोळ्याच्या रचनेमुळे एकाच वेळी समोरचे तसेच बाजूचे पाहू शकतात. ते माणसांपेक्षा अधिक रंग पाहू शकतात.

संदर्भ[संपादन]

https://www.in.gov/dnr/fishwild/3383.htm

http://www.baldeagleinfo.com/eagle/eagle2.html Archived 2011-12-24 at the Wayback Machine.

https://ourpastimes.com/characteristics-eagle-bird-6717089.html

http://www.bluepage.org/bald-eagles/bald-eagle-eyesight.html

http://www.baldeagleinfo.com/ Archived 2011-02-22 at the Wayback Machine.