काळा गरुड
Appearance
काळा गरुड (इंग्लिश: Black eagle) हा एक शिकारी पक्षी आहे.
हा पक्षी आकाराने घारीपेक्षा मोठा असून काळसर वर्णाचा असतो. याच्या लांब शेपटीवर पुसट असतात. पंख लांब गोलाकार, पायाचा रंग पिवळा आणि चोच गर्द वर्णाची असते. यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असले तरी यामध्ये मादी मोठी असते .
हे पक्षी हिवाळ्यात पाकिस्तानच्या रावळपिंडी जिल्ह्यात आढळतात. याशिवाय भूतान आणि भारतातील अरुणाचल प्रदेश तसेच ब्रह्मपुत्रेच्या दक्षिणेकडील पर्वत आणि कन्याकुमारी तसेच श्रीलंकेकडील डोंगराळ भूप्रदेशातही आढळतात.
दक्षिणेकडे नोव्हेंबर ते मार्च या काळात आणि उत्तरेकडे आणि जानेवारी ते एप्रिलमध्ये आढळतात .
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली