सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम

सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम (Sir Vivian Richards स्टेडियम) हे कॅरिबियनमधील अँटिगा आणि बार्बुडा ह्या देशामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. हे स्टेडियम २००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकासाठी बांधण्यात आले. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व्हिव्ह रिचर्ड्स ह्याचे नाव ह्या स्टेडियमला देण्यात आले आहे.

सध्या क्रिकेटसोबत हे स्टेडियम फुटबॉल सामन्यांसाठी देखील वापरले जाते. अँटिगा आणि बार्बुडा आपले काही सामने येथून खेळतो.

गुणक: 17°6′11.79″N 61°47′5.46″W / 17.1032750°N 61.7848500°W / 17.1032750; -61.7848500