Jump to content

प्रोव्हिडन्स स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रोव्हिडन्स मैदान
स्टेडियम, क्रिकेट मैदान
खेळरग्बी युनियन संपादन
देशगयाना संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानगयाना संपादन
स्थानProvidence संपादन
भौगोलिक गुणक६°४५′२७″N ५८°१०′४०″W संपादन
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक2006 संपादन
वास्तव्य करणारावेस्ट इंडीज क्रिकेट संघ संपादन
Map

प्रोव्हिडन्स मैदान तथा गयाना नॅशनल स्टेडियम हे गयानामधील खेळाचे मैदान आहे. २००७ च्या क्रिकेट विश्वचषकातील सुपर ८ सामने खेळवण्यासाठी हे मैदान बांधले गेले.

या स्टेडियमने २८ मार्च २००७ ते ९ एप्रिल २००७ दरम्यान विश्वचषकाचे सहा सामने आयोजित केले, ज्यामध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरला. या सामन्यात श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलग चार चेंडूंमध्ये चार बळी घेणारा पहिला गोलंदाज होण्याचा पराक्रम केला.[१][२][३] प्रामुख्याने क्रिकेट सामन्यांसाठी बांधण्यात आलेले हे स्टेडियम बहुउद्देशीय सुविधेमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते.

इतिहास

[संपादन]
मैदानावरील खेळपट्टी

२००७ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी बांधल्या गेलेल्या या स्टेडियमने स्पर्धेतील सुपर एट टप्प्यातील सहा एकदिवसीय सामन्यांचे आयोजन केले. जून २०१६ पर्यंत, २००७ च्या विश्वचषकानंतर या स्टेडियमवर आणखी दहा एकदिवसीय सामने खेळवले गेले, ज्यामध्ये वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या २०१६ च्या त्रिकोणी मालिकेतील ऐतिहासिक तीन दिवस/रात्र सामन्यांचा समावेश आहे. कॅरिबियन क्षेत्रात सर्व एकदिवसीय सामने फ्लडलाइट्सखाली खेळवले जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

प्रोव्हिडन्सने २००८ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना आयोजित केला होता, परंतु मे २०११ मध्ये वेस्ट इंडीजने पाकिस्तानचा पराभव करेपर्यंत येथे दुसरा कसोटी सामना झाला नव्हता. हे मैदान २०१० आयसीसी जागतिक ट्वेंटी२० स्पर्धेच्या ठिकाणांपैकी एक होते, जिथे वेस्ट इंडीजच्या दोन सामन्यांसह गट टप्प्यातील सहा सामने झाले.

क्रिकेटव्यतिरिक्त या स्टेडियमवर फुटबॉल आणि २०१० मध्य अमेरिकन आणि कॅरिबियन खेळांमधील रग्बी सेव्हन्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरीफेस्टा १० साठी आयोजित केलेले उद्घाटनाचे व समारोपाचे सोहळे आणि अनेक महासंगीत कार्यक्रमही येथे पार पडले. कॅरिबियन प्रीमियर लीग सुरू झाल्यानंतर हे स्टेडियम गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाचे गृह मैदान झाले.

या स्टेडियमची उभारणी गयाना सरकारने भारत सरकारकडून मिळालेल्या मोठ्या आर्थिक मदतीने केली. या प्रकल्पाची संकल्पना आर. के. अँड असोसिएट्स (नवी दिल्ली) यांनी मांडली, रचना सी. आर. नारायणा राव आर्किटेक्ट्स (चेन्नई) यांनी तयार केली आणि बांधकाम शापूरजी पालनजी ग्रुपने केले.[४] पुरामुळे उशीर झालेले बांधकाम मे २००५ मध्ये सुरू झाले.

१५,००० प्रेक्षकक्षमता असलेले प्रोव्हिडन्स स्टेडियम गयानामधील सर्वात मोठ्या क्रीडांगणांपैकी एक आहे आणि आता बोर्दाच्या ऐवजी येथे कसोटी सामने खेळवले जातात. या संकुलात शॉपिंग मॉल आणि लक्झरी अपार्टमेंट्सचा समावेश आहे. प्रिन्सेस इंटरनॅशनल हॉटेल या स्टेडियमच्या शेजारी स्थित आहे.

वाहतूक

[संपादन]
ॲमेझॉन वॉरियर्स विरुद्ध टीकेआर; सीपीएल २०१८ क्वालिफायर्स

प्रोव्हिडन्स स्टेडियम गयानाची राजधानी जॉर्जटाउनच्या दक्षिणेस काही किलोमीटर अंतरावर डेमेरारा नदीच्या पूर्वेकडच्या तीरावर वसलेले आहे. ईस्ट बँक हायवेवर असलेले हे स्टेडियम जॉर्जटाउन शहराच्या मध्यभागापासून १० मिनिटांच्या अंतरावर आणि छेदी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ३० मिनिटांच्या अंतरावर आहे.

२००७ क्रिकेट विश्वचषक सामने

[संपादन]
२८ मार्च २००७
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०९ (४९.३ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२१२/९ (४८.२ षटके)
दक्षिण आफ्रिका १ गडी राखून विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

३० मार्च २००७
इंग्लंड Flag of इंग्लंड
२६६/७ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२१८ (४८.१ षटके)
इंग्लैंड ४८ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

१ एप्रिल २००७
श्रीलंका Flag of श्रीलंका
३०३/५ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९० (४४.३ षटके)
श्रीलंका ११३ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

३ एप्रिल २००७
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
१५२/८ (३५ षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१६५/३ (३१.३ षटके)
दक्षिण आफ्रिका ७ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

७ एप्रिल २००७
बांगलादेश Flag of बांगलादेश
२५१/८ (५० षटके)
वि
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१८४ (४८.४ षटके)
बांगलादेश ६७ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

९ एप्रिल २००७
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२६३/८ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१३४ (३७.४ षटके)
न्यूझीलंड १२९ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना

२०१० आयसीसी जागतिक ट्वेंटी२० सामने

[संपादन]
३० एप्रिल
१३:००
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१३५/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१३९/८ (१९.५ षटके)
महैला जयवर्धने ८१ (५१)
शेन बाँड २/३५ (४ षटके)
न्यूझीलंड २ गडी राखून विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन
पंच: स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रे) आणि रुडी कर्टझन (द आ)
सामनावीर: नॅथन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली.

३ मे
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७३/७ (२० षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
२९/१ (५ षटके)
महैला जयवर्धने १०० (६४)
रे प्राइस २/३१ (४ षटके)
श्रीलंका १४ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन
पंच: बिलि डॉक्ट्रोव्ह (वे इं) आणि इयान गोल्ड (इंग्लंड)
सामनावीर: महैला जयवर्धने (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली.

४ मे
०९:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
८४ (१५.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३६/१ (८.१ षटके)
न्यूझीलंड ७ धावांनी विजयी (डीएलएस पद्धत)
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन
पंच: असद् रौफ (पाक) आणि स्टीव्ह डेव्हिस (ऑस्ट्रे)
सामनावीर: नॅथन मॅक्क्युलम (न्यूझीलंड)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.

३० एप्रिल
१७:०० (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१३८/९ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
६८ (१६.४ षटके)
डॅरेन सॅमी ३० (१७)
जॉर्ज डॉकरेल ३/१६ (४ षटके)
गॅरी विल्सन १७ (३४)
डॅरेन सॅमी ३/८ (३.४ षटके)
वेस्ट इंडिज ७० धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन
पंच: असद् रौफ (पाक) आणि बिली बाउडेन (न्यूझीलंड)
सामनावीर: डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडली.

३ मे
१३:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९१/५ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
६०/२ (५.५ षटके)
इयान मोर्गन ५५ (३५)
डॅरेन सॅमी २/२२ (४ षटके)
क्रिस गेल २५ (१२)
ग्रॅम स्वान २/२४ (२ षटके)
वेस्ट इंडिज ८ गडी राखून विजयी (डीएलएस पद्धत)
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन
पंच: टोनी हिल (न्यूझीलंड) आणि रुडी कर्टझन (द आ)
सामनावीर: डॅरेन सॅमी (वेस्ट इंडिज)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.

४ मे
१३:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१२०/८ (२० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
१४/१ (३.३ षटके)
इयान मोर्गन ४५ (३७)
केविन ओ'ब्रायन २/२२ (३ षटके)
निकाल नाही
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन
पंच: बिली बाउडेन (न्यूझीलंड) आणि टोनी हिल (न्यूझीलंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.

२०२४ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक सामने

[संपादन]
२ जून २०२४
१०:३० -४
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१३६/८ (२० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१३७/५ (१९ षटके)
सेसे बाऊ ५० (४३)
आंद्रे रसेल २/१९ (३ षटके)
रोस्टन चेस ४२* (२७)
असाद वाला २/२८ (४ षटके)
वेस्ट इंडिज ५ गडी राखून विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन, गयाना
पंच: ड्रियन होल्डस्टॉक (द आ) आणि राशिद रियाझ (पाक)
सामनावीर: रोस्टन चेस (वेस्ट इंडिज)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.

३ जून २०२४
२०:३० -४ (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१८३/५ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
५८ (१६ षटके)
अफगाणिस्तान १२५ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन, गयाना
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: फाझलहक फारूकी (अफगाणिस्तान)

५ जून २०२४
१९:३० -४ (रा)
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
७७ (१९.१ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
७८/७ (१८.२ षटके)
हिरी हिरी १५ (१९)
फ्रँक न्सुबुगा २/४ (४ षटके)
रियाझत अली शाह ३३ (५६)
अलेई नाओ २/१६ (४ षटके)
युगांडा ३ गडी राखून विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन, गयाना
पंच: ॲड्रियन होल्डस्टॉक (द आ) आणि राशिद रियाझ (पाक)
सामनावीर: रियाझत अली शाह (युगांडा)
  • युगांडाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.
  • सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील विश्वचषक स्पर्धेत युगांडाचा हा पहिला विजय ठरला.[६]

७ जून २०२४
१९:३० -४ (रा)
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
१५९/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
७५ (१५.२ षटके)
ग्लेन फिलिप्स १८ (१८)
फाझलहक फारूकी ४/१७ (३.२ षटके)
अफगाणिस्तान ८४ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन, गयाना
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान)
  • न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.
  • टी२०आ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अफगाणिस्तानचा हा पहिला वहिला विजय होता.

८ जून २०२४
२०:३० -४ (रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१७३/५ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
३९ (१२ षटके)
जुमा मियागी १३* (२०)
अकील होसीन ५/११ (४ षटके)
वेस्ट इंडिज १३४ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन, गयाना
पंच: कुमार धर्मसेना (श्रीलंका) आणि राशिद रियाझ (पाक)
सामनावीर: अकील होसीन (वेस्ट इंडिज)

सेमीफायनल २

[संपादन]
२७ जून २०२४
१०:३० -४
धावफलक
भारत Flag of भारत
१७१/७ (२० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१०३ (१६.४ षटके)
रोहित शर्मा ५७ (३९)
क्रिस जॉर्डन ३/३७ (३ षटके)
हॅरी ब्रूक २५ (१९)
कुलदीप यादव ३/१९ (४ षटके)
भारत ६८ धावांनी विजयी
प्रोव्हिडन्स स्टेडियम, जॉर्जटाउन
पंच: क्रिस गॅफनी (न्यूझीलंड) आणि रॉड टकर (ऑस्ट्रे)
सामनावीर: अक्षर पटेल (भारत)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडले.
  • भारताने तिसऱ्यांदा टी२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

विक्रम

[संपादन]

कसोटी

[संपादन]

प्रोव्हिडन्स स्टेडियमने २००८ आणि २०११ मध्ये अनुक्रमे श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध दोन कसोटी सामन्यांचे आयोजन केले आहे.[८] या दोन सामन्यांनंतरचे फलंदाजी आणि गोलंदाजीचे विक्रम खालीलप्रमाणे आहेत:

  • सर्वोच्च संघ धावसंख्या – ४७६/८ घोषित श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडीज
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या – १३६, महैला जयवर्धने
  • सर्वनिम्न संघ धावसंख्या – १५२ सर्वबाद वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान
  • डावातील सर्वोत्तम गोलंदाजी – ६/४२, सईद अजमल (पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज)
  • सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजी – ११/१११, सईद अजमल (पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज)

एकदिवसीय सामने

[संपादन]

हे स्टेडियम बांधल्यापासून येथे १९ एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत.

  • सर्वोच्च संघ धावसंख्या – ३०९/६ वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान[९]
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या – १३०*, तमीम इक्बाल (बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडीज)[१०]
  • सर्वनिम्न संघ धावसंख्या – ९८ वेस्ट इंडीज विरुद्ध पाकिस्तान
  • सर्वाधिक धावा – ३१४ (५ डाव), शिवनारायण चंदरपॉल[११]
  • डावातील सर्वोत्तम गोलंदाजी – ७/१२, शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज)[१२]
  • सर्वाधिक बळी – १२ (४ सामने), सुनील नरेन[१३]

टी२०आ

[संपादन]

या मैदानावर २०१० टी२० विश्वचषकात आठ आणि २०२४ टी२० विश्वचषकात पाच सामने खेळवले गेले आहेत.

डावात पाच बळी

[संपादन]

प्रोव्हिडन्स स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४ वेळा डावात पाच बळी मिळवण्याची नोंद झाली आहे. यापैकी सहा कसोटी सामन्यांमध्ये, पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये, दोन पुरुष टी२०आ मध्ये आणि एक महिला टी२०आ मध्ये नोंदवला गेला आहे.

कसोटी सामने

[संपादन]
प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील पुरुष कसोटी सामन्यांमधील पाच बळी
क्र. गोलंदाज दिनांक संघ विरुद्ध संघ डाव षटके धावा बळी निकाल
१चामिंडा वास२२ मार्च २,००८श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकावेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज४२२.२६१५श्रीलंका विजयी[१९]
२सईद अजमल[a]१२ मे २,०११पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान१३३६९५वेस्ट इंडीज विजयी[२०]
३सईद अजमल[a]३२३.५४२६
४डॅरेन सॅमी[a]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान४१७२९५
५शमार जोसेफ१५ ऑगस्ट २,०२४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका११४३३५
६जेडन सील्स१७ ऑगस्ट २,०२४२१८.४६१६

एकदिवसीय सामने

[संपादन]
प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील पुरुष एकदिवसीय सामन्यांमधील पाच बळी
क्र. गोलंदाज दिनांक संघ विरुद्ध संघ डाव षटके धावा बळी निकाल
१चार्ल लँगेवेल्ड्ट२८ मार्च २,००७[b]दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाश्रीलंकाचा ध्वज श्रीलंका११०३९५दक्षिण आफ्रिका विजयी[२१]
२आंद्रे नेल७ एप्रिल २,००७[b]बांगलादेशचा ध्वज बांगलादेश११०४५५बांगलादेश विजयी[२२]
३शाहिद आफ्रिदी१४ जुलै २,०१३पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२९१२७पाकिस्तान विजयी[२३]
४सुनील नरेन३ जून २,०१६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजदक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१९.५२७६वेस्ट इंडीज विजयी[२४]
५हसन अली९ मार्च २,०१७पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज२८.५३८५पाकिस्तान विजयी[२५]

टी२० आंतरराष्ट्रीय

[संपादन]

पुरुष टी२०

[संपादन]
प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील पुरुष टी२०आ सामन्यांमधील पाच बळी
क्र. गोलंदाज दिनांक संघ विरुद्ध संघ डाव षटके बळी धावा निकाल
१फाझलहक फारूकी३ जून २,०२४अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानयुगांडाचा ध्वज युगांडा२४५ ९अफगाणिस्तान विजयी[२६]
२अकील होसीन८ जून २,०२४वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज११वेस्ट इंडीज विजयी

महिला टी२०

[संपादन]
प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील महिला टी२०आ सामन्यांमधील पाच बळी
क्र. गोलंदाज दिनांक संघ विरुद्ध संघ डाव षटके धावा बळी निकाल
१दिआंद्रा डोटिन९ नोव्हेंबर २,०१८[c]वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजबांगलादेशचा ध्वज बांगलादेश२३.४५५वेस्ट इंडीज विजयी[२७]

हे सुद्धा पहा

[संपादन]

नोंदी

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "Full length, full reward". cricinfo.com. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ↑ "Records – One-Day Internationals – Bowling records – Hat-tricks". cricinfo.com. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  3. ↑ "Last-gasp S Africa beat Sri Lanka". BBC Sport. २८ मार्च २००७. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  4. ↑ "Shapoorji Pallonji readies IPO for arm". Times of India. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  5. ↑ "T20 World Cup: Farooqi's maiden five-wicket haul seals 125-run win for Afghanistan over Uganda". एशियन न्यूज इंटरनॅशनल. ४ जून २०२४. ४ जून २०२४ रोजी पाहिले.
  6. ↑ "Uganda's bowlers and Riazat seal their first win in T20 World Cup history". ईएसपीएन क्रिकइन्फो. ६ जून २०२४ रोजी पाहिले.
  7. ↑ "WI vs UGA Highlights, T20 World Cup 2024: Akeal Hosein's fifer helps West Indies crush Uganda by 134 runs". टाइम्स ऑफ इंडिया. ९ जून २०२४. ९ जून २०२४ रोजी पाहिले.
  8. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – Test matches – Match results – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  9. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – One-Day Internationals – Highest totals – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  10. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – One-Day Internationals – High scores – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  11. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – One-Day Internationals – Most runs – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  12. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – One-Day Internationals – Best bowling figures in an innings – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  13. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – One-Day Internationals – Most wickets – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  14. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – Twenty20 Internationals – Highest totals – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  15. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – Twenty20 Internationals – High scores – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  16. ↑ "Cricket Records – Records – Providence Stadium, Guyana – Twenty20 Internationals – Most runs – ESPNcricinfo". ESPNcricinfo. २० एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
  17. ↑ "AFG vs UGA, T20 World Cup 2024: Fazalhaq Farooqi becomes second Afghanistan player to take T20 WC fifer". sportstar.com. ४ जून २०२४ रोजी पाहिले.
  18. ↑ "AFG vs UGA, T20 World Cup 2024: Fazalhaq Farooqi becomes second Afghanistan player to take T20 WC fifer". sportstar.com. ४ जून २०२४ रोजी पाहिले.
  19. ↑ 1st Test, Sri Lanka tour of West Indies at Providence, Mar 22–26 2008, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  20. ↑ 1st Test, Pakistan tour of West Indies at Providence, May 12–15 2011, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  21. ↑ 26th Match, Super Eights, ICC World Cup at Providence, Mar 28 2007, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  22. ↑ 34th Match, Super Eights, ICC World Cup at Providence, Apr 7 2007, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  23. ↑ 1st ODI, Pakistan tour of West Indies at Providence, Jul 14 2013, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  24. ↑ 1st Match (D/N), West Indies Tri-Nation Series at Providence, Jun 3 2016, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  25. ↑ 2nd ODI, Pakistan tour of West Indies at Providence, Apr 9 2017, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.
  26. ↑ AFG vs UGA, T20 World Cup 2024: Fazalhaq Farooqi becomes second Afghanistan player to take T20 WC fifer, sportstar.com. ६ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.
  27. ↑ 3rd Match, Group A (N), ICC Women's World T20 at Providence, Nov 9 2018, CricInfo. ११ जानेवारी २०२० रोजी पाहिले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:कॉमोन्स वर्ग

  1. 1 2 3 सईद अजमल आणि सॅमी यांनी एकाच सामन्यात पाच बळी घेतले. अजमलची एकाच सामन्यातील दोन वेळा पाच बळी घेण्याची कामगिरी या मैदानावर झालेली एकमेव घटना आहे.
  2. 1 2 हा सामना २००७ क्रिकेट विश्वचषक दरम्यान खेळवला गेला होता.
  3. ↑ हा सामना २०१८ आयसीसी महिला जागतिक ट्वेंटी२० दरम्यान खेळवला गेला होता.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.