२०१४ हॉकी विश्वचषक ही पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेची दहावी आवृत्ती ३१ मे ते १५ जून, इ.स. २०१४ दरम्यान नेदरलँड्स देशामधील द हेग शहरात खेळवली गेली. १९७३ व १९९८ नंतर हा विश्वचषक नेदरलँड्स देशात तिसऱ्यांदा खेळवला गेला. ह्या स्पर्धेमध्ये १२ देशांच्या राष्ट्रीय पुरुष हॉकी संघांनी सहभाग घेतला.