सुब्रमण्यम स्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुब्रह्मण्यम स्वामी

अध्यक्ष, जनता पक्ष
विद्यमान
पदग्रहण
इ.स. १९८९

कार्यकाळ
इ.स. १९९० – इ.स. १९९१
पंतप्रधान चंद्रशेखर

कार्यकाळ
इ.स. १९९० – इ.स. १९९१
पंतप्रधान चंद्रशेखर

कार्यकाळ
इ.स. १९८८ – इ.स. १९९४
कार्यकाळ
इ.स. १९७४ – इ.स. १९७६

कार्यकाळ
इ.स. १९८८ – इ.स. १९९४
मतदारसंघ मदूरै
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९

जन्म १५ सप्टेंबर, इ.स. १९३९
चेन्नई, तामिळनाडू
राजकीय पक्ष जनता पक्ष
पत्नी डॉ. रोक्स्ना स्वामी
निवास नवी दिल्ली/चेन्नई
शिक्षण हिंदू कॉलेज, दिल्ली (बी.एस.)
भारतीय सांख्यिकी संस्था, कलकत्ता(एम.ए)
हार्वर्ड विद्यापीठ (पी.एच.डी.)
व्यवसाय लेखक, अध्यापक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी
धर्म हिंदू
संकेतस्थळ http://www.janataparty.org/president.html

डॉ. सुब्रमण्यन स्वामी अथवा सुब्रमण्यम स्वामी (१५ सप्टेंबर, इ.स. १९३९,चेन्नई[१] - हयात) एक भारतीय नेता, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक व एक अर्थशास्त्रज्ञ आहेत.[२] सध्या ते जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.[३]

राजकीय कारकीर्द[संपादन]

सुब्रमण्यम स्वामी ५ वेळा भारतीय लोकसभेत खासदार राहिले आहेत. ते १९९० -९१ या काळात केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री - व्यापार, कायदा व न्याय मंत्री होते.[१]

शैक्षणिक कार्य[संपादन]

हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेटची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सायमन कुझनेट्सपॉल सॅमुएल्सन यांच्या सोबत संशोधन कार्य केले व यांच्या सोबत संयुक्त लेखक रूपात "इंडेक्स नंबर थेअरी" या विषयावर एक नवीन व पथ प्रदर्शक अध्ययन प्रस्तुत केले. ते हार्वर्ड विद्यापीठात सन्माननीय पाहुणे अध्यापक म्हणून जात असत[२]. २०११ मध्ये त्यांनी इस्लामविषयी लिहिलेल्या लेखामुळे त्यांचे अध्यापन बंद करण्यात आले. [४]

सामाजिक लढा व कार्य[संपादन]

त्यांनी कायम आपल्या तत्त्वांसाठी निर्भयपणे संघर्ष केला आहे. आणीबाणी दरम्यान ऐतिहासिक साहसी संघर्ष, तिबेट मधील कैलाश-मानसरोवर यात्री मार्ग खुला करण्यासाठी प्रयत्न, भारत - चीन संबंधांत सुधारणा, भारत - इस्रायल संबंधांत सुधारणा, आर्थिक सुधारणा व हिंदू पुनरुत्थान, इत्यादी काही बाबी त्यांच्या ठळक कार्यांपैकी आहेत.

२ जी तरंग भ्रष्टाचार उघड करून दोषींवर कारवाई करवण्यात त्यांच्या न्यायालयीन लढाईचा मोठा हात आहे. [५]

संदर्भ[संपादन]

  1. १.० १.१ संसदेच्या संकेतस्थळावरील सुब्रमण्यन स्वामींचे चरित्र. भारतीय संसद. ३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  2. २.० २.१ "Swamy to teach at Harvard", हिंदू, १५ फेब्रुवारी २०११. (इंग्रजी मजकूर) 
  3. "जनता पक्षाच्या संकेतस्थळावर सुब्रमण्यन स्वामींची माहिती". (इंग्रजी मजकूर) 
  4. "Harvard Faculty Debates Free Speech", हारवर्ड मॅगेझीन. (इंग्रजी मजकूर) 
  5. "How Swamy busted the 2G scam", इंडिया टुडे, २ ऑक्टोबर २०११. (इंग्रजी मजकूर) 

बाह्य दुवे[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.