साताऱ्याचे दुसरे राजाराम
राजाराम द्वितीय (राजाराम भोसले; जून १७२६ - ११ डिसेंबर १७७७), ज्यांना रामराजा म्हणूनही जाणल्या जाते, ते मराठा साम्राज्याचे सहावे छत्रपती होते. ते छत्रपती शाहू प्रथम यांचे दत्तक पुत्र होते. ताराबाईंनी त्यांना शाहूंसमोर स्वतःचा नातू म्हणून सादर केले होते आणि शाहूंच्या मृत्यूनंतर सत्ता छीनायसाठी त्यांचा वापर केले होते. परंतु, तीला बाजूला केल्यानंतर, ती म्हणाली की राजाराम द्वितीय केवळ एक ढोंगी होता. तरीही बाळाजी बाजीरावांनी त्यांना छत्रपती म्हणून ठेवले. प्रत्यक्षात पेशवे आणि इतर सरदारांकडे सर्व कार्यकारी अधिकार होते, व राजाराम द्वितीय हा मराठ्यांचा केवळ नाममात्र प्रमुख होता.
प्रारंभिक जीवन
[संपादन]शाहूराज्यांच्या मृत्यूनंतर, राजाराम द्वितीय मराठ्यांचा छत्रपती म्हणून नियुक्त केलं. पेशवे बाळाजी बाजीराव जेव्हा मुघलांच्या विरुद्धी लडायला निघाले, तेव्हा ताराबाईंनी राजाराम द्वितीय यांना पेशवेपदावरून दूर करण्याचा आग्रह केला. राजारामने नकार दिल्यावर तिने त्यांना २४ नोव्हेंबर १७५०ला सातारा येथील अंधारकोठडीत कैद केले. तिने सर्वांना सांगितलं की तो गोंधळी जातीचा ढोंगी आहे आणि तिने त्याला शाहूंसमोर आपला नातू म्हणून खोटे सादर केले होते. या कारावासात त्यांची प्रकृती खूपच कमी झाली. ताराबाईंनी नंतर बाळाजीरावांचे श्रेष्ठत्व मान्य करून त्यांच्याशी शांतता करार केला. १४ सप्टेंबर १७५२ला ताराबाई आणि बालाजीराव यांनी जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरात परस्पर शांततेची शपथ घेतली. या शपथविधी समारंभात ताराबाईंनी अजुन एक शपथ घेतली, की राजाराम द्वितीय हा तिचा नातू नसून गोंधळी जातीतील एक ढोंगी होता. [१] तरीसुद्धा, पेशव्यांनी राजाराम द्वितीय यांना उपाधिकृत छत्रपती आणि कमजोर व्यक्तिमत्त्व म्हणून कायम ठेवले. [२]
राजवट
[संपादन]राजाराम द्वितीयांच्या राजवटेत, पुण्यातील भट घराण्यातील वंशपरंपरागत पेशव्यांनी आणि होळकर, गायकवाड, सिंधिया आणि भोसले (नागपूर) यांसारख्या साम्राज्यातील इतर सेनापतींनी सातारा येथील छत्रपतींची सत्ता जवळजवळ पूर्णपणे ढासळली होती.[ <span title="This claim needs references to reliable sources. (August 2020)">संदर्भ आवश्यक</span> ] या काळात मराठ्यांचा अफगाणिस्थानातील दुर्राणी साम्राज्याशी सतत संघर्ष होत होते. पानिपतची तिसरी लढाई त्यांच्या काळात झाली. मराठा आणि मुघल यांच्यात १७५२मध्ये एक करार झाला. मराठ्यांनी मुघलांना बाह्य आक्रमण तसेच अंतर्गत बंडखोरी पराभूत करण्यास मदत करण्याचे मान्य केले. मुघलांनी पेशवा बाळाजी राव यांना अजमेर आणि आग्रा सुभेदार म्हणून नियुक्त करण्याचे मान्य केले. मराठ्यांना लाहोर, मुलतान, सिंध सुब्बा तसेच हिस्सार आणि मुरादाबाद या जिल्ह्यांमधून चौथ गोळा करण्याचा अधिकार पण दीला. परंतु, मुघल बादशाह त्याला शांत करण्यासाठी लाहोर आणि मुलतान देखील अहमदशाह दुर्राणीकडे पण सोपवले होते. व, अजमेरसारख्या राजपुत शासित प्रदेश मराठ्यांना हस्तांतरित करण्यास त्यांनी मान्यता दिली नाही. यामुळे मराठ्यांचा दुर्राणी आणि राजपुत, यां दोघांशी संघर्ष झाल्या. [३] मधो सिंह सिंहने शुवद-उ-दौला व अफगाण शाह अहमद शाह दुर्राणी (अब्दाली) यांच्याकडे मदत मागितली. [३] राजारामाच्या राजवटेत मराठा-जाट संबंधही बिघडले.
त्यांच्यानंतर अजुन एक दत्तक शासक साताऱ्याचा शाहू द्वितीय आले.
संदर्भ
[संपादन]- ^ Charles Augustus Kincaid; Dattatray Balwant Parasnis (1918). A History of the Maratha People Volume 3. Oxford University Press. pp. 2–10.
- ^ Biswamoy Pati, ed. (2000). Issues in Modern Indian History. Popular. p. 30. ISBN 9788171546589.
- ^ a b G.S.Chhabra (2005). Advance Study in the History of Modern India (Volume 1: 1707–1803). Lotus Press. pp. 29–47. ISBN 978-81-89093-06-8.