साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp
Appearance
(साचा:विकिपीडिया:नवीन माहिती-temp या पानावरून पुनर्निर्देशित)
* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
- ... की जवळपास ११ वर्षे पश्चिम बंगालच्या राज्यपालाचे पद सांभाळणाऱ्या पद्मजा नायडू ह्या सर्वाधीक काळ पदस्ठ असलेल्या महिला राज्यपाल होत्या?
- ... की १४ जुलै २०२३ रोजी, भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३च्या मदतीने, चंद्रयान ३ मोहीम प्रक्षेपित करण्यात आली ज्यामध्ये अंदाजे ३,९०० किलो भार होता?
- ...की, एरबस ए३४०-५०० प्रकारच्या विमानात प्रवास चालू असताना प्रवासी दगावल्यास मृतदेह ठेवण्यासाठी विशेष कपाट असते?
- ...की, मल्लिका शेरावत ही तत्त्वज्ञानाची विद्यार्थीनी होती?
- ...की, रामायणातील सीतेच्या पित्याचे नाव सीरध्वज जनक (चित्रित) होते ?
- ...की, आयुष्मान पूर्ण हे महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार करणारे सर्वप्रथम भिक्षू होते?
- ...की, हॉलीवुडमधील प्रसिद्ध चित्रपट ३०० थर्मोपिलाईच्या युद्धावर आधारित होता?
- ...की, बॉस्फोरस पूल (चित्रित) हा युरोप व आशिया यांना जोडणाऱ्या २ पुलांपैकी एक आहे?
- ...की,ग्रीसमधील एका गावाचे नाव मराठी असून महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड नावाचा तालुका तसेच मतदारसंघ आहे.
- ...की, रोमन काळाच्या पूर्वार्धात मीठ कर म्हणून आकारले जात असे.
- ...की, सिंहाची डरकाळी आठ ते दहा मैलां पर्यंत ऐकू येते?
- ...की, तुर्कीमधील इस्तंबूल हे शहर आशिया व युरोप या दोन खंडांत विसावले आहे?
- ...की, जिराफाच्या पाठीत जेवढे मणके असतात (सहा) तेवढेच मणके उंदराच्या पाठीत असतात?
- ...की, आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठी ज्वालामुखी मंगळावर आहे. या ज्वालामुखीची उंची २६.४ कि.मी. आहे?
- ...की, जगातील सर्वात खोल जागा प्रशांत महासागरातील मरियाना ही आहे. हिची खोली ११ कि.मी. एवढी आहे?
- ...की, आपल्या चाव्यांनी माणसाला हैराण करणाऱ्या डासांना दात नसतात?
- ...की, ताजमहालाचा रंग सकाळी गुलाबी, दुपारी पांढरा तर रात्री सोनेरी दिसतो?
- ...की, सहारा वाळवंटातील तापमान सकाळी ४५ अंश सेल्सियस असते तर रात्री ते ५ अंश सेल्सियस पर्यंत उतरते?
- ...की, शुक्र हा ग्रह हा पूर्वेपासून पश्चिमेकडे फिरतो त्यामुळे तेथे सूर्य हा पश्चिमेकडे उगवतो व पूर्वेकडे मावळतो?
- ...की, पी.टी. उषा हीचे पूर्ण नाव पीलुवालकंडी टेकापरवील उषा असे आहे.
- ...की, अमेरिकेने ६ आॅगष्ट, १९४५ रोजी जपानमधील हिरोशिमा शहरावर टाकलेल्या अणुबाॅम्बचे नाव लिटल बाॅय असे होते, तर ९ आॅगष्ट, १९४५ रोजी नागासाकी वर टाकलेल्या अणुबाॅम्बचे नाव फॅट मॅन असे होते.
- ...की, डास चावल्यानंतर आपल्याला त्या जागी खाज का सुटते, याचे कारण म्हणजे मादी डासाच्या लाळेत एक विशिष्ट रसायन असते. डास चावताच ते आपल्या रक्तात मिसळले जाऊन तेथे खाज सुटते.