सरस्वती (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


हिंदू पुराणांनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.

सरस्वती नावाच्या अनेक स्त्रिया पुराणकालात होऊन गेल्या. त्यांपैकी काही ह्या :-

 • ब्रह्मदेवाची मानसकन्या शतरूपा. हिलाच सरस्वती म्हणतात. ही स्वायंभुव मनूची पत्‍नी होती. हिला प्रियव्रत, उत्तानपाद आदी सात पुत्र आणि देवहूती आदी तीन कन्या होत्या.
 • पद्मपुराणानुसार ब्रह्माची पत्‍नी. हिलाच गायत्री, शारद, सावित्री, ज्ञानशक्ती आणि वाच्‌ अशीही नावे होती.
 • महाभारतातील शतरूपा. हिला दंडशास्त्र, नीतिशास्त्र आदींची कर्ती म्हटले आहे.
 • विष्णूच्या सार्वभौम नामक अवतारात त्याची माता.
 • पुरुवंशातील अंतीनार राजाची पत्‍नी. हिच्या मुलाचे नव त्रस्नु होते.
 • ब्रह्मपुराणानुसार पुरुवरस्‌ राजाची पत्‍नी. हिच्या मुलाचे नाव सारस्वत होते.
 • वायुपुराणानुसार दधीची ऋषीची पत्‍नी. हिच्याही पुत्राचे नाव सारस्वत होते.
 • मत्स्यपुराणानुसार आदित्याची पत्‍नी. ही दनु आणि दिती यांची आई.
 • सरस्वती राणे : एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका; गायिका हिराबाई बडोदेकर, अभिनेत्री कमलाबाई बडोदेकर आणि गायक सुरेशबाबू माने यांची बहीण; गायक अब्दुल करीम खान यांची कन्या.
 • सरस्वती काळे : जुन्याकाळची एक अल्पज्ञात गायिका. १९५९ साली निघालेल्या अनंत माने दिग्दर्शित ‘साता जन्माचा सोबती’ या चित्रपटातील गाण्यांची ही पार्श्वगायिका होती.
 • सरस्वती महाल ग्रंथालय, तंजावर
 • आर्य समाजाचे संस्थापक महर्षी स्वामी दयानंद सरस्वती (१८२४-१८८३)
 • सरस्वतीबाई आपटे (निःसंदिग्धीकरण)
 • सरस्वती (दीर्घिकासमूह)