सदस्य चर्चा:मनीषा शेटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातूनदृश्यसंपादक सजगता मालिका :

यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हा एक रिच-टेक्स्ट संपादनाची सोय करणारा मिडियाविकि विस्तारक आहे. [[]] {{ }} सारख्या विकिच्या मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे.

दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)मनीषा शेटे यांना उद्देशून पुढचा प्रतिसाद लिहिण्याकरिता किंवा चर्चा करण्याकरिता वरच्या निळ्या कळीवर टिचकी मारली तरी चालेल

-- साहाय्य चमू (चर्चा) १८:१७, ११ मे २०१६ (IST)

मराठी भाषा गौरव दिन[संपादन]

टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:५०, २७ फेब्रुवारी २०१७ (IST)

कविता[संपादन]

कवितेच्या स्वरूपात टंकित कसे करावे याचे मार्गदर्शन हवे आहे. मनीषा शेटे (चर्चा)

<poem> </poem> या दोन टॅग्स मध्ये कविता खालील प्रमाणे जोडता येऊ शकेल. विकिस्रोत प्रकल्प सुद्धा अभ्यासावा. आपल्या स्वत:च्या नावाची सही केवळ चर्चा पानांवर करावी, ज्ञानकोशीय लेखात करू नये.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:५३, ४ एप्रिल २०१७ (IST)

<poem> [[वाघ|वाघोबा]] वाघोबा जंगलचे आजोबा | काळे पिवळे पट्टे गालिचे छान
यावे कोणी जावे कोणी ,ताठ तुमची मान |
किती राठ मिशा ,काटेरी जश्या बोचणारी नख ,बिचव्याची टोक |
पाणी प्यायला जाता , हळूच ओढ्यावर नाही लागत चाहूल , नाही वाजत पाउल |
रात्रीच्या अंधारात झाडीमागे लपता लुकुलुकू डोळ्यांनी टूकुतटूकू बघता |
जंगलभर सारा तुमचा दरारा भीती वाटे केवधी कोण काढेल खोडी |
[[हरीण]] [[ससा|ससे]] वासरे नातवंडे पोर झोपलात घरी की धावतील भिरीभिरी |
खेळता खेळता कसा घेतील कानोसा ऐकली पहा घुरघुर पळून गेली दूर ||
</poem>

असे लिहिल्यास खालील प्रमाणे दिसेल

वाघोबा वाघोबा जंगलचे आजोबा |
काळे पिवळे पट्टे गालिचे छान

यावे कोणी जावे कोणी ,ताठ तुमची मान |

किती राठ मिशा ,काटेरी जश्या
बोचणारी नख ,बिचव्याची टोक |

पाणी प्यायला जाता , हळूच ओढ्यावर
नाही लागत चाहूल , नाही वाजत पाउल |

रात्रीच्या अंधारात झाडीमागे लपता
लुकुलुकू डोळ्यांनी टूकुतटूकू बघता |

जंगलभर सारा तुमचा दरारा
भीती वाटे केवधी कोण काढेल खोडी |

हरीण ससे वासरे नातवंडे पोर
झोपलात घरी की धावतील भिरीभिरी |

खेळता खेळता कसा घेतील कानोसा
ऐकली पहा घुरघुर पळून गेली दूर ||

नमस्कार , लिहिण्यातील बारकावे समजावून दिल्याबद्दल व आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.मनीषा शेटे (चर्चा) १५:०६, २१ जुलै २०१७ (IST)

अभ्युदय व नि:श्रेयसची दीक्षा देणारा जैन धर्म[संपादन]

नमस्कार,

मराठी विकिपीडियावर योगदान दिल्याबद्दल धन्यवाद.

विकिपीडियावर विश्वकोशीय लेख अपेक्षित आहेत. असे करताना इतर अनेक संकेतांबरोबरच गौरवार्थ विशेषणे शक्य तितकी टाळणे हा महत्वाचा संकेत आहे.

अभ्युदय व नि:श्रेयसची दीक्षा देणारा जैन धर्म या शीर्षकाद्वारे तुम्हाला काय माहिती लिहायची आहे? जैन धर्मातील अभ्युदय व निःश्रेयस या कल्पनांबद्दल लिहायचे झाले तर आधीपासू असलेल्या जैन धर्म या लेखात एक विभाग तयार करुन तेथे ती माहिती द्यावी. तुम्ही लिहिलेल्या मजकूरातही माहितीपेक्षा विशेषणेचे आढळली. शीर्षक आणि मजकूर दोन्हीत उणीव आढळल्याने लेख वगळा गेला.

तुम्ही जैन धर्म यात अभ्युदय आणि निःश्रेयस याबद्दलची (विश्वकोशीय) माहिती घातल्यास ते अधिक योग्य राहील.

अभय नातू (चर्चा) १९:३१, २० जुलै २०१७ (IST)

वाचकांना ठरवू द्या[संपादन]

आपला अभ्युदय व नि:श्रेयस हा परिच्छेद चर्चा:जैन धर्म येथे आपल्या स्वत:च्या संदर्भासाठी वगळलेल्या पानातून आयात केला. आपण बनवलेले लेखपान वगळळण्याची आवश्यकता पुन्हा स्वतंत्रपणे तपासून पाहीली. शीर्षक लेखनातील समस्या सोडली तर आपण लिहिलेल्या परिच्छेदातील बहुतेक लेखनास त्या क्षेत्रातील अभ्यासकांच्या संदर्भांची आवश्यकता आहे.

विकिपीडिया वर्णनात्मक ब्लॉग नव्हे एक ज्ञानकोश आहे, ज्ञानकोशात कोणत्याही विषयावर सर्वसाधारणपणे एकत्रित लेखन केले जाते. आणि एकत्रित लेखनासाठी जैन धर्म हा लेख आधी पासून उपलब्ध आहे. ज्यात सुधारणात आपण सहभागी होऊ शकता.

ज्ञानकोश वाचकाचा दृष्टिकोन: आम्ही ज्ञानकोश मोजक्या तथ्यांसाठी आणि आकडेवारीसाठी वाचतो. येथे आम्हाला इतरांची परस्परविरोधी मते विशिष्ट संदर्भासहित मिळावीत. पण आमचे मन आणि विचार प्रभावित करण्याकरिता ज्ञानकोशांतील लेखकांचे मत त्यात मिसळू नका असा असतो. कोशांतील लेख वाचून वाचक आपले मत बनवतो.
सारे विश्वकोश, विश्वकोशाची विश्वासार्हता जपण्याकरिता केवळ वस्तुनिष्ठ लेखन करण्याचा संकेत पाळत असतात. त्यामुळे शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा असलेले, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा देणारे, इत्यादी ललित लेखन किंवा ब्लॉग या स्वरूपातील लेखन विश्वकोशात नसते..

ज्ञानकोशीय लेखकाने वाचकाच्या विवेकावर विश्वास ठेवावा. अभ्युदय व नि:श्रेयस आहे की अजून काही हे वाचकाने लेख वाचून मत बनवावे. शीर्षकातून अथवा वर्णनात्मक लेखनातून वाचकावर मत लादण्याचे ज्ञानकोशात प्रयोजन शिल्लक रहात नाही.

• जैनांचे चोविसावे म्हणजेच शेवटचे तीर्थंकर प्रभू महावीर यांचा काळ २५५७ वर्षांपूर्वीचा मानला जातो... [ संदर्भ हवा ]
हे वाक्य 'अमुक, अमुक अभ्यासकांच्या मतानुसार जैनांचे चोविसावे म्हणजेच शेवटचे तीर्थंकर प्रभू महावीर यांचा काळ २५५७ वर्षांपूर्वीचा आहे.." असे हवे
• ...व त्यांच्या पूर्वी तेवीस तीर्थंकर होऊन गेले आहेत.
'मानले जाते' हा वाक्प्रचार या वाक्यांशासोबत अधिक योग्य आहे का ते पहावे. त्यासाठी सुद्धा संदर्भ द्यावा.
• ... यावरून जैन धर्माची पाळेमुळे भारतभूमीत किती खोलवर रुजलेली आहेत याचे अनुमान करता येते.
आता इथे बहुधा तुमचे स्वत:चे मत आले आहे त्यापेक्षा अभ्यासकाचे संदर्भ देऊन 'भारतीय संस्कृतीवरील जैन धर्माचा प्रभाव' असा स्वतंत्र विभाग बनवता येईल. आपण फक्त माहिती देण्याचे काम करावे आणि संदर्भातील माहिती वरुन, जैन धर्माची पाळेमुळे भारतभूमीत किती खोलवर रुजलेली आहेत नाही का ? अशी वाचकाची आपसूक प्रतिक्रीया येऊ शकते तर येऊ द्यावी. आपण प्रतिक्रीया सहसा न लादलेली चांगली.
".... जैन धर्माची पाळेमुळे भारतभूमीत कितीतरी खोलवर रुजलेली आहेत" असे एखाद्या लेखकाचे / अभ्यासकाचे वाक्य कुठे सापडले तर ते विकिक़्वोट या वाक्योल्लेखांची दखल घेणाऱ्या प्रकल्पात जोडावे.
काही शंका शिल्लक राहील्यास जरुर विचाराव्यात. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
@संदेश हिवाळे: आपणास सदर चर्चा अभ्यासता यावी म्हणून लक्ष वेधतो आहे .
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:२७, २१ जुलै २०१७ (IST)