सदस्य चर्चा:ऋषिकेश
स्वागत | ऋषिकेश, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | ऋषिकेश, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७३० लेख आहे व १६१ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
जुआन पुजोल गार्स्या
[संपादन]नमस्कार, ह्या लेखामधील मजकूर आपण कोठूनतरी कॉपी पेस्ट केल्यासारखा वाटत आहे. इतरत्र छापून आलेली माहिती येथे उतरवण्यास मनाई आहे. कृपया ही माहिती काढून आपल्या स्वत:च्या शब्दांत लेख पुन्हा लिहावा अन्यथा तो काढून टाकला जाईल. शिवाय ह्याचे योग्य नाव हुआन पुयोल गर्सिया असे आहे.
- लेख लेखकानेच येथे आणला आहे. तेव्हा प्रताधिकाराचा प्रश्न येऊ नये. तसेच नावाचा उच्चार याबाबत मतभेद असल्यास ते चर्चापानावर नोंदवावेत. निनाद १७:०३, १३ डिसेंबर २०१३ (IST)
- सदर लेखन मीच इथे आणले आहे. काही बाह्य संदर्भ घेतला आहे. पण त्याचा उल्लेख लेखात शेवटी केला आहे. नावाचा उच्चार याबाबत मतभेद असल्यास ते चर्चापानावर नोंदवावेत ऋषिकेश १७:१७, १३ डिसेंबर २०१३ (IST)
मला वाटते सही करावयाचा राहीलेला संदेश सदस्य:Abhijitsathe यांचा असावा.कॉपीराईट जपले जाण्या बाबत जागरूकता विकिपीडिया सदस्यांनी दाखवणे वावगे आहे असे नाही, ऐसीअक्षरे मधील संबंधीत लेखाचे लेखन सदस्य:ऋषिकेश यांचेच असेल तर आपल्या लेखनावरील कॉपीराईट बद्दल एवढी काळजी मराठी विकिपीडियावर घेतली जाते आहे हे असा विचार सुद्धा करू शकतील किंवा त्यांना तशी विनंती करता येईल. अर्थात जीथे कमी आवश्यकता होती तेथेच नेमकी अधीक जागरूकता दाखवली गेली असे काहीसे झाले असे दिसते.
इथे कॉपीराईट बद्दल क्लॅरीफीकेशन की इंग्रजी विकिपीडियावरून अनुवाद विकिपीडिया बाहेर स्वैर अनुवाद केला गेला असेल किंवा इतर प्रक्रीया झाल्या असतील तर संबधीत लेखकाचा कॉपीराईट नव्याने तयार होतो ते लेखन केवळ इंग्रजी विकिपीडियावरूनानुवादीत झाले म्हणून मुक्त ठरत नाही तोच लेखक स्वत: मराठी विकिपीडियावर काही काळाने ते लेखन आणत असेल तर ते पुन्हा विकिपीडिया लायसन्स खाली येईल.
एसी अक्षरे मध्ये चर्चा थोडी कन्फुजींग वाटली सदर लेखाचे लेखक मन आणि ऋषिकेश या एकच व्यक्ती आहेत का ? टेक्नीकली कॉपीराईट मन यांचा असतो. या एकच व्यक्ती असतील तर कॉपीराईटचा प्रश्न नाही पण भिन्न व्यक्ती असतील तर कॉपीराईटचा प्रश्न उपस्थीत राहातो.सदस्य ऋषिकेश यांना त्यांच्या आवडीचे लेखन आणि वाचन होत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:०३, १३ डिसेंबर २०१३ (IST)
- मन आणि मी एकच नसलो तरी मन यांना विकीपाने कशी तयार करायची हे माहिती नसल्याने त्याने मला या माहितीवर आधारीत विकीपान तयार करायची लेखी परवानगी दिली आहे. किंबहुना ऐसीअक्षरेवर आम्ही अनेक लेखकांना आपले लेखन 'विकीपिडीया'साठी मुक्त करायचे आवाहन करत आहोत जेणेकरूण विकीपिडीयावर अधिक माहितीपूर्ण लेखन यावे व मराठी आंतरजालावर निव्वळ पोकळ चर्चा न होता काहीतरी भरीव कार्य व्हावे. विकीपाने करताना माहिती कॉपीपेस्ट न करता त्यातील ललित अंगाला काढणे, अधिकची माहिती/चित्रे शोधून घालणे, विकी स्टँडर्ड्स प्रमाणे इतर बदलही करत आहोत. शक्य आहे तिथे संदर्भ दुवेही देणार आहोतच.
जर मन यांच्याकडून कन्फर्मेशन हवे असेल तर त्याला इथे सदस्यत्त्व घ्यायला सांगू शकतो किंवा त्याच्या आयडीने हेच विकीपान पुन्हा प्रकाशित करू शकतो ऋषिकेश १७:१७, १३ डिसेंबर २०१३ (IST)
सदस्य:ऋषिकेश प्रथमत: आपण एवढी सगळी जी मेहनत घेत आहात त्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.आपण विकीपान तयार करायची लेखी परवानगी आधीच घेतली हे स्तुत्य आहे. सध्यातरी ती परवानगी आपल्या स्वत:कडे आहे हे पुरेसे आहे.विकिपीडिया विश्वासही ठेवतो त्यामुळे मन यांच्याकडून कन्फर्मेशन अथवा आयडीची आवश्यकता नाही. अर्थात मराठी विकिपीडियाचे ते जेव्हा सदस्य होऊ इच्छितील तेव्हा त्यांचे स्वागत करण्यास आनंदच वाटेल.
आपण म्हणता तसे माहिती कॉपीपेस्ट न करता त्यातील ललित अंगाला काढणे, आणि विकी स्टँडर्ड्स प्रमाणे इतर बदल करत संदर्भ नमुद करत गेल्यास कॉपीराईटचे प्रश्न तसेही हलके होण्यास सहाय्य होतेच.मी संबंधीत लेखाच्या चर्चा पानावर लेखास उदयोन्मुख लेख म्हणून मुखपृष्ठावर घेण्या करता सुचवले आहे.
आपण कॉपीराईट विषयक काळजी घेत असल्यामुळे,संबधीत संपादन गाळण्यांमध्ये जरूर तिथे आपल्या सदस्यनामास अपवादही उपलब्ध करेन.कुठे अडचण आली तर जरूर कळवा शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न असेल.
- >>ऐसीअक्षरेवर आम्ही अनेक लेखकांना आपले लेखन 'विकीपिडीया'साठी मुक्त करायचे आवाहन करत आहोत जेणेकरूण विकीपिडीयावर अधिक माहितीपूर्ण लेखन यावे व मराठी आंतरजालावर निव्वळ पोकळ चर्चा न होता काहीतरी भरीव कार्य व्हावे.<<
आपले हे प्रयत्न मराठी विकिपीडिया आणि मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून समृद्ध करण्याच्या दृष्टीने बहुमोल आहेत.आपल्या दृष्टीकोणाचे अभिनंदन आणि प्रत्यक्ष प्रयत्नांबद्दल धन्यवाद
आपल्या आवडीचे वाचन आणि लेखन होत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०८:४०, १४ डिसेंबर २०१३ (IST)
- >उदयोन्मुख लेख म्हणून मुखपृष्ठावर घेण्या करता सुचवले आहे <
याबद्द्ल आणि एकूणच प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार
द.ल. गोखले
[संपादन]रविकिरण मंडळ मध्ये कार्यरत मनोरमा श्रीधर रानडे यांच्या बद्दल लेखना बद्दल धन्यवाद.रविकिरण मंडळ मध्येच कार्यरत असलेल्या द.ल. गोखले यांच्या बद्दलही अधिक माहिती हवी आहे.
आपल्या आवडीचे वाचन आणि लेखन घडत राहोही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:०३, १४ जानेवारी २०१४ (IST)
>मला स्वतःला यांच्याबद्दल माहिती नाही. ऐसी अक्षरेवरील श्री.कोल्हटकरांना माहिती असेल या अंदाजांने त्यांना विचारली आहे. माहिती मिळताच विकीपानात भर घालेनच ऋषिकेश ६:०१, १५ जानेवारी २०१४ (IST)
>>थोडी माहिती अपडेटवली आहे, ऐसीवरच्या कोल्हटकरांच्या मते पुणे-सांगलीतील जेष्ठ मंडळींपैकी काही त्यांना ओळखत असण्याची शक्यता आहे. या भागातील कोणी ज्येष्ठ विकीवर आहे काय? ऋषिकेश ४:२५, ७ फेब्रुवारी २०१४ (IST)
अपडेटवलेल्या माहितीकरता धन्यवाद. शंकर केशव कानेटकरांचे स्वप्नभूमी बूकगंगा डॉटकॉमवर मर्यादीत प्रकरणे आढळली. उपलब्ध पहिल्या तीन प्रकरणात द.ल. गोखल्यांचा उल्लेख आढळला नाही तरी त्याच कालखंडातील कवी गिरीष घाटे इत्यादी साहित्यिकांची माहिती दिसते म्हणजे बहुधा पुढील प्रकरणात आपण म्हणता तसे द ल गोखल्यांबद्दलसुद्धा माहिती असू शकेल. म्हणजे आता किमान अधिक माहिती कुठे शोधावयाची हे तरी माहित झाले.
एखाद्या व्यक्ती अथवा गोष्टी बद्दल माहिती कुठे कमी येत असेल तर माहितीतील गॅप विकिफॉर्मॅट मध्ये लगेच जाणवतो आणि मग आपण तेवढाच अधिक शोध घेतो. शोधकार्यातील साहाय्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १७:१२, ७ फेब्रुवारी २०१४ (IST)
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
[संपादन]मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
[संपादन]नमस्कार ऋषिकेश,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
[संपादन]कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.