सदस्य:GANGARAM AWANE/dhulpati 1

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?केरी

गोवा • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१२.४२ चौ. किमी
• २,५९६.४ मी
जवळचे शहर सांखळी
जिल्हा उत्तर गोवा
तालुका/के सत्तरी
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
२,२५१ (2011)
• १८१/किमी
१,००० /
भाषा कोंकणी, मराठी


केरी हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या सत्तरी तालुक्यातील १२४१.८५ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे.

  केरी हे ग्रामनाम कन्नड शब्द ‘केरि’ शी संबंधित असून ‘केरि’ चा अर्थ होतो पाण्याचे तळे अथवा जलाशय आणि आज श्री सातेरी आजोबा देवस्थान मंदिरासमोरील तलाव या ग्रामनामाची प्रचिती आणून देतो.डोंगर रांगात वसलेल्या प्रदेशास केरी अशी संज्ञा असल्याचे मत आहे.[१]

भौगोलिक स्थान[संपादन]

केरी हे उत्तर गोवा जिल्ह्यातल्या सत्तरी तालुक्यातील १२४१.८५ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार या गावात ४९२ कुटुंबे व एकूण २२५१ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर सांखळी १० किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ११२५ पुरुष आणि ११२६ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ४३ असून. ह्या गावाचा जनगणनेतील स्थल निर्देशांक ६२६७८५ [२] आहे.


साक्षरता[संपादन]

  • एकूण साक्षर लोकसंख्या: १७७८
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ९२२ (८१.९६%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ८५६ (७६.०२%)


शैक्षणिक सुविधा[संपादन]

गावात ०६ शासकीय प्राथमिक विद्यालये घोटेली क्र.०१,घोटेली क्र.०२, बाहेरीलवाडा,धनगरवाडा शिरोली, केरी (मंदिराशेजारी), आहेत. गावात १ खाजगी प्राथमिक शाळा आहे. गावात २, माध्यमिक विद्यालय आहेत. १.सरकारी माध्यमिक विद्यालय केरी-सत्तरी गोवा २.स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय केरी.

सर्वात जवळील उच्च माध्यमिक विद्यालय श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय पर्ये असून ते केरीपासून ०४ किलोमीटरहून कि.मी. अंतरावर आहे.

सर्वात जवळील महाविद्यालय सरकारी कला,विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय सांखळी हे असून ते केरी पासून ०९ कि.मी. अंतरावर आहे,सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय १० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील वैद्यकीय महाविद्यालय गोवा वैद्यकीय महाविद्यालय असून अंदाजे ४०(सांखळी – मार्शेल मार्गे.) किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यवस्थापन संस्था होंडा येथे असून ती १४ कि.मी.अंतरावर आहे.

पिण्याचे पाणी[संपादन]

गावात शुद्धिकरण केलेल्या व न केलेल्या नळाच्या पाण्याचा पुरवठा आहे. गावात झाकलेल्या विहिरीच्या पाण्याचा पुरवठा आहे.


केरीतील निसर्ग

स्वच्छता[संपादन]

गावात उघडी व बंद गटारव्यवस्था उपलब्ध आहे.

या क्षेत्राचा संपूर्ण स्वच्छता अभियानात समावेश आहे.

गावात सार्वजनिक स्वच्छता गृह उपलब्ध नाही.


संपर्क व दळणवळण[संपादन]

गावात उपपोस्ट ऑफिस उपलब्ध आहे. गावाचा पिन कोड ४०३५०५ आहे.दूरध्वनी कोड ०८३२ आहे.

जमिनीचा वापर[संपादन]

केरी ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: ४७.११
  • लागवडीयोग्य पडीक जमीन: १००
  • कायमस्वरूपी पडीक जमीन: १९०
  • सद्यस्थितीतील पडीक जमीन: ११२.०५
  • पिकांखालची जमीन: ७९२.६९
  • एकूण कोरडवाहू जमीन: ४१२.६९
  • एकूण बागायती जमीन: ३८०


गुढी संस्कृतीची केरी

सिंचन सुविधा[संपादन]

सिंचनाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • कालवे: ३२०
  • विहिरी / कूप नलिका: ६०

उत्पादन[संपादन]

केरी ह्या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात,काजू,ऊस,देशी दारू,हस्तकला,नाचणी,दूध,सूतारकाम


केरी नामकरण[संपादन]

गोमंतकाच्या घाटमाथ्यावर, सह्याद्रिच्या पायथ्याशी,निसर्गाच्या कुशीत वसलेला सुंदर निसर्ग संपन्न गाव म्हणजे केरी. ‘केर’ या अक्षरावरून ‘केरी’ असे या गावचे नाव पडलेले असावे. सह्याद्रिच्या माथ्यावरील जो गाळ (कैर) पायथ्याशी आला त्याच सुपीक भुमीला पुढे ‘केरी’ असे नाव पडले.

गावची स्थापना व इतिहास.[संपादन]

केरी गावचा तसेच श्री सातेरी,केळबाय,आजोबा,देवस्थानाचा आद्य संस्थापक श्री. खायलेवाडकर हा होता असे सांगितले जाते. सुमारे आठशे वर्षापूर्वीचा  इतिहास केरी गाव संबंधी सापडतो. कदंबकालीन पाषाणी कोरीव शिल्प गावत आजही पाहावयास मिळतात. केरी गाव हा राणे सरदेसाई घराण्याला त्यांच्या शौर्याबद्दल इनाम दिला होता.म्हणुनच राणे-सरदेसाई यांना इनामदार अथवा खाशे असे संबोधले जाते.

गावातील विविध देवस्थाने.[संपादन]

 केरी गावात श्री सातेरी,केळबाय,आजोबा देवस्थान हे प्रमुख देवस्थान आहे. श्री आजोबा देवस्थान केवळ गोमंतकातच नव्हे तर शेजारील राज्यात देखील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. हजारो भाविक येथे येत असतात. धार्मिक विधीने जिवंतपणी अग्निप्रवेश करणारी श्री.काळसती ही तर सुहासिनी स्त्रियांचे आराध्य दैवतच आहे. श्री आजोबाच्या घुमटी शेजारी काळसती मंदिर आहे.त्याच प्रमाणे घोटेली क्र.०२ या वाड्यावर श्री सातेरी केळबाय व काळसती ही मंदिरे आहेत. विविध समाजाची (गावस,हळीद,माजिक,पार्सेकर) कुलदैवतांची मंदिरे आहेत. तसेच बेताळ,म्हारींगण हे देवही गावात पुजिले जातात.

गावातील विविध संप्रदायांचे मठ.[संपादन]

 केरी गाव जसा निसर्गसंपदेने नटलेला आहे तसाच तो धार्मिकदृष्ट्याही प्रगत आहे.  या गावातील बाहेरीलवाड्यावर  ‘श्री शंकरनाथ मठाश्रम’ हा आद्यमठ वाळवंटी नंदीच्या तिरावर वसलेला असून येथी श्री शंकरनाथस्वामींची समाधी आहे. या मठाद्वारे अनेक धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. श्री पारवडेश्र्वर मठ तसेच ॐ सिद्ध ब्रह्माश्रम हा पद्मनाभ शिष्य संप्रदायाच मठ आहे. 

अंजुणे धरण[संपादन]

  •   केरी गावात मे महिन्या अखेरीस पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असे ही बाब लक्षात घेऊन केरी पंचक्रोशी तसेच दक्षिण गोव्याची पाण्याची समस्या निकाली लागावी या हेतूने, गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, श्री.प्रतापसिंह राणे यांच्या मार्गदर्शणाखाली १९७८ साली अंजुणे धरणाची पायाभरणी झाली.तत्पूर्वी धरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या  केळावडे,गुळ्ळे,रावण आदी गावांना केरी पंचायत तसेच मोर्ले पंचायत क्षेत्रात पुर्नवसन करण्यात आले. १९ डिसेंबर १९८६ रोजी कालव्यांना पाणी सोडण्यात आले तेव्हापासून केरी गावाने तसेच पंचक्रोशीतील गावांनी कृषीक्षेत्रात भरीव कामगिरी केली.

विविध डोंगर[संपादन]

  • केरी गावच्या तिन्ही बाजूंना वाघेरी डोंगराने वेढा घातलेला आहे. या डोंगरावरील ऊन सावल्यांचा खेळ पाहण्याजोगा असतो. या वाघेरीत अनेक इतर डोंगर समावलेले आहेत त्यात वाय डोंगर,बिरामणाचो डोंगर,व्होळेरवैलो डोंगर,माट्टीचो डोंगर आदी विविध डोंगर या क्षेत्रात आहेत. पूर्वी वाघेरी डोंगरावर आदीवासी धनगर समाजाची वस्ती होती मात्र कालांतराने ते भुईपाल सत्तरी, केरी आदी ठिकाणी स्थायिक झाले. वनराई   पूर्वी आमच्या पुर्वजांनी वृक्ष,वेली यांचे संवर्धन व्हावे,त्यांची जोपासना व्हावी यासाठी धर्मांशी नाते जोडून अनेक देवराया निर्माण केल्या या घटनेला केरी गावही अपवाद नाही. आजही कित्येक शतकांची झाडे ताठ मानेने केरी गावच्या पुर्वजांची निसर्गाप्रतीचे प्रेम व आपुलकी दाखवत ऊभी आहेत. या वनराईत सर्वात महत्त्वाची  ‘आजोबाची राय’ या आजोबाच्या राईत कोणी बोलू नये,थुंकू नये तसेच नैसर्गिक विधीही करू नयेत असा विधी निषेध आहे, या आजोबाच्यारायी सोबतच ‘पीशाची राय’, ‘धाकटी कोमाचीराय’ ‘माऊलीची राय’ ‘पणासधारीची राय’ आदी वनराई आजही अस्तित्वात आहेत.

नद्या तसेच ओहळ[संपादन]

केरी गावाची जीवनदायिनी नदी म्हणून 'वाळवंटी' नदीला ओळखले जाते. ही वाळवंटी नदी घाटमाथ्यावरील 'चोर्ला' या गावी उगम पावते व तेथून प्रवाहीत होऊन केरी मार्गे सांखळीला जाते. वाळवंटी नदी सोबतच 'कैटी' ही दुसरी नदी प्रवाहीत होते जी महाराष्ट्रातील केरी शेजारील 'विर्डी' या गावातून प्रवाहीत होऊन शिरोली मार्गे केरी गावात प्रवेश करते. या नदी सोबतच गावात लहान- लहान ओहळ अस्तित्वात आहेत त्यापैकी महत्त्वाचे बिरामणाचो, गोटणीचो, पेडीकडलो,झरीकडलो, वाघेरीचो ओहळ असे विविध ओहळ अस्तित्वात आहेत.


एकंदरीत केरी गाव निसर्ग, सांस्कृती,धार्मिक,अध्यात्मिक,लोककला आदींनी समृध्द आहेच त्याच सोबत शैक्षणिक,आर्थिक,आरोग्य,या सुविधांनीही परिपूर्ण आहे. पर्यटनदृष्या या गावाला प्रगत कसे करता येईल हे मात्र पहायला हवे. या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास त्याचा फायदा गावातील नागरिकांना होईल यात दुमत नाही.
==संदर्भ आणि नोंदी==

  1. ^ केरकर, राजेंद्र (2012). ग्रामगाथा. गोवा: विवेकानंद वाचन मंदिर. pp. पृ.क्र.०२.
  2. ^ http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.ht



वर्ग:उत्तर गोवा वर्ग:सत्तरी वर्ग:उत्तर गोवा जिल्ह्यातील गावे