षन्यांग
Appearance
| षन्यांग 沈阳 |
|
| उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
| देश | |
| प्रांत | ल्याओनिंग |
| स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ३११ |
| क्षेत्रफळ | १२,९४२ चौ. किमी (४,९९७ चौ. मैल) |
| समुद्रसपाटीपासुन उंची | १८० फूट (५५ मी) |
| लोकसंख्या | |
| - शहर | ८१,०६,१७१ |
| - घनता | ६३० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल) |
| प्रमाणवेळ | यूटीसी + ८:०० |
| http://www.shenyang.gov.cn | |
षन्यांग (मराठी नामभेद: शन्यांग, शेनयांग ; चिनी: 沈阳; फीनयीन: Shěnyáng ;), किंवा मुक्देन (मांचू:
), हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील ल्याओनिंग या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. पूर्वी हे शहर षंगचिंग (चिनी: 盛京) किंवा फेंगथ्यॅन विषय (चिनी: 奉天府) या नावांनी ओळखले जाई. इ.स.च्या १७व्या शतकात मांचू लोकांनी हे शहर जिंकले आणि काही काळासाठी येथे राजधानीचे ठाणे मांडून छिंग घराण्याने येथून सत्ता चालवली.
प्रशासकीय दृष्ट्या षन्यांगास उप-प्रांतीय शहराचा दर्जा असून हे वायव्य चीनमधील सर्वांत मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले षन्यांग चीनच्या जपान, रशिया व कोरिया ह्या देशांसोबतच्या व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.
जुळी शहरे
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
