श्रीपेरुम्बुदुर लोकसभा मतदारसंघ
Appearance
(श्रीपेरुम्बुदुर (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीपेरुम्बुदुर लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील श्रीपेरुम्बुदुर परिसरात स्थित असून त्याचा मोठा भाग चेन्नई महानगरामध्ये मोडतो. येथील तीन विधानसभा मतदारसंघ चेन्नई जिल्ह्यामध्ये, दोन मतदारसंघ चेंगलपट्टू जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक कांचीपुरम जिल्ह्यामध्ये आहेत.
विधानसभा मतदासंघ
[संपादन]लोकसभा मतदारसंघ क्र. ५ - श्रीपेरुम्बुदुर मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
| # | नाव | जिल्हा |
|---|---|---|
| १ | मदुरावोयाल | चेन्नई |
| २ | अंबत्तुर | |
| ३ | आलंदुर | |
| ४ | श्रीपेरुम्बुदुर | कांचीपुरम |
| ५ | पल्लावरम | चेंगलपट्टू |
| ६ | तांबरम |