Jump to content

चिदंबरम लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिदंबरम (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
तमिळनाडूच्या नकाशावर चिदंबरम लोकसभा मतदारसंघ

चिदंबरम लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील चिदंबरम परिसरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ कडलूर जिल्ह्यात, दोन मतदारसंघ अरियालूर जिल्ह्यामध्ये तर उर्वरित एक मतदारसंघ पेराम्बलुर जिल्ह्यामध्ये आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आरक्षित आहे.

विधानसभा मतदासंघ

[संपादन]

लोकसभा मतदारसंघ क्र. २७ - चिदंबरम मध्ये २००९ पासून खालील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.

# नाव जिल्हा
१ भुवनागिरी कडलूर
२ चिदंबरम
३ कट्टुमन्नारकोविल
४ अरियालूर अरियालूर
५ जयांकोंडम
६ कुन्नम पेराम्बलुर


खासदार

[संपादन]
वर्ष खासदार पक्ष
१९९८ दलित एळिलमलाई पट्टाळी मक्कल कट्ची
१९९९ ई. पोन्नुस्वामी
२००४
२००९ तोल. तिरुमावलवन विदुतलै चिरुतैगल कच्ची
२०१४ एम. चंद्रकाशी अण्णा द्रमुक
२०१९ तोल. तिरुमावलवन विदुतलै चिरुतैगल कच्ची
२०२४

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]