कालिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कालियाचे मर्दन करणारा कृष्ण (चित्रनिर्मिती: इ.स. १६४० अंदाजे)

हिंदू पुराणांनुसार कालिया हा वृंदावनामध्ये यमुना नदीत राहणारा एक विषारी नाग होता. याच्या विषारी फुत्कारांमुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते. एकमेव कदंब वृक्ष सोडता या ठिकाणी कुणीही मासे, पशू, पक्षी जिवंत राहत नसत. भागवत पुराणानुसार कृष्णाने याचे दमन करून याला यमुनेतून पळवून लावले.