"समलिंगी विवाह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो वर्ग:लग्न हून वर्ग:विवाह ला हलवले कॅट-अ-लॉट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''समलिंगी विवाह''' दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह आहे.
'''समलिंगी विवाह''' दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह आहे. उदा. दोन पुरषांमधील विवाह किंवा दोन स्त्रियांमधील विवाह.

जगातील अनेक देशांमध्ये [[समलैंगिकता|समलैंगिक]] समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही; तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिला नाही. समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली [[नेदरलँड्स]] देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर [[बेल्जियम]], [[कॅनडा]], [[नॉर्वे]], [[दक्षिण आफ्रिका]], [[स्पेन]], [[स्वीडन]], [[आइसलँड]], [[पोर्तुगाल]] व [[आर्जेन्टिना]] ह्या ९ अधिक देशांनी, तसेच [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कनेक्टिकट]], [[आयोवा]], [[मेन]], [[मॅसेच्युसेट्स]] व [[व्हरमाँट]] ह्या राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे.

२३:२२, ५ जून २०२० ची आवृत्ती

समलिंगी विवाह दोन समान लिंगाच्या व्यक्तींदरम्यान कायदेशीर रित्या करण्यात येणारा विवाह आहे. उदा. दोन पुरषांमधील विवाह किंवा दोन स्त्रियांमधील विवाह.

जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही; तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिला नाही. समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगालआर्जेन्टिना ह्या ९ अधिक देशांनी, तसेच अमेरिकेच्या कनेक्टिकट, आयोवा, मेन, मॅसेच्युसेट्सव्हरमाँट ह्या राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे.

  समलिंगी विवाह
  परदेशात झालेले समलिंगी विवाह वैध
  इतर प्रकारचे संबंध मान्य
  समलिंगी विवाहांना अधिकृत दर्जा नाही

भारतीय घटनेच्या सेक्शन ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यकींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणले जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे[१] हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले.

भारतामध्ये लैंगिकता हा एक वादग्रस्त सामाजिक विषय आहे व समलैंगिकता ही व्यापकपणे 'मानसिक विकृती' समजली जाते. समलैंगीक व्यक्तींना पारंपारिक समाजात अपमानास्पद वागणूक दिली जाते. अनेक समलिंगी व्यक्तींना अश्या प्रकारे समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन किंवा वरील नमूद केलेल्या कायद्याचा दाखला देऊन 'तुम्ही ह्या कायद्याने सांगितल्याप्रमाणे गुन्हा केला आहे' असे सांगून, अटक करवण्याच्या धमकीने लुबाडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

हिंदू विवाह अधिनियमानुसार समलिंगी विवाह वैध आहे असा युक्तीवाद लढवला जाऊ शकतो, कारण हिंदू धर्मामध्ये विवाह दोन भिन्न लिंगांच्या व्यक्तींदरम्यानच व्हायला हवा असा स्पष्ट उल्लेख नाही.

संदर्भ

  1. ^ "India decriminalises gay sex".