"दुर्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ ७: | ओळ ७: | ||
* [[जलदुर्ग]] इ. |
* [[जलदुर्ग]] इ. |
||
== मनुस्मृती == |
== मनुस्मृती == |
||
मनुस्मृतीत |
मनुस्मृतीत सांगितलेले किल्ल्यांचे प्रकार- धन्वदुर्गं महीदुर्गमब्दुर्गं वार्क्षमेव वा । नृदुरगं गिरीदुर्गं वा सामाश्रित्य वसेतपरम् ।।... मनुस्मृती ७०. |
||
* धनदुर्ग : सभोवार २० कोसापर्यंत पाणी नसला दुर्ग. |
|||
* घनदुर्ग |
|||
* महीदुर्ग : ज्या बारा हातापेक्षा अधिक उंचीच्या, युद्धाचा प्रसंग आल्यास ज्यावरून व्यवस्थित फिरता येईल आणि झरोक्यांनी युक्त असलेल्या खिडक्या (जंग्या) ठेवलेल्या आहेत, अशा तटाने युक्त असलेला दुर्ग. |
|||
* महीदुर्ग |
|||
* अब्दुर्ग : सभोवार पाणी असल्याने नैसर्गिक संरक्षण असलेला दुर्ग. |
|||
* अष्दुर्ग |
|||
* वार्क्षदुर्ग : वृक्षदुर्ग. तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसपर्यंत मोठाले वृक्ष, काटेरी झुडपे आणि वेलीच्या जाळ्या यांनी वेष्टिलेला दुर्ग. |
|||
* वार्क्षदुर्ग |
|||
* नृदुर्ग : हत्ती, घोडे, रथ, पायदळ या चतुरंग सेनेने रक्षण केलेला दुर्ग. |
|||
* नृदुर्ग |
|||
* गिरिदुर्ग : डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणीपुरवठा असणारे, झाडे असून धान्य पिकवता येईल असे, पण जाण्यासाठी एकच वाट असलेले स्थान. |
|||
* गिरीदुर्ग |
|||
== देवज्ञविलास ग्रंथ== |
== देवज्ञविलास ग्रंथ== |
||
लाला लक्ष्मीधर याने राजा [[कृष्णदेवराय]] च्या काळात लिहीलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गीकरण लेलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार) |
लाला लक्ष्मीधर याने राजा [[कृष्णदेवराय]] च्या काळात लिहीलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गीकरण लेलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार) |
२२:२८, १ जानेवारी २०२० ची आवृत्ती
दुर्ग, छत्तीसगढ याच्याशी गल्लत करू नका.
दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे दुर्गम(कठीण) असते असे बांधलेले ठिकाण आहे. मध्ययुगीन मराठीत ह्यासाठी अरबीतून आलेला किल्ला हा शब्द वापरला जाई . शिवछत्रपतींच्या प्रेरणेने रचल्या गेलेल्या राजव्यवहारकोषात किल्ल्यासाठी दुर्ग हा प्रतिशब्द सुचवला आहे. अगदी प्राचीन काळापासून दुर्गांचा उल्लेख आढळतो.किल्ला हे इतिहासाची ओळख मानली जाते.
दुर्गांचे प्रकार
प्राचीन ग्रंथांत दुर्गांचे वेगवेगळे प्रकार सांगतलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे :
मनुस्मृती
मनुस्मृतीत सांगितलेले किल्ल्यांचे प्रकार- धन्वदुर्गं महीदुर्गमब्दुर्गं वार्क्षमेव वा । नृदुरगं गिरीदुर्गं वा सामाश्रित्य वसेतपरम् ।।... मनुस्मृती ७०.
- धनदुर्ग : सभोवार २० कोसापर्यंत पाणी नसला दुर्ग.
- महीदुर्ग : ज्या बारा हातापेक्षा अधिक उंचीच्या, युद्धाचा प्रसंग आल्यास ज्यावरून व्यवस्थित फिरता येईल आणि झरोक्यांनी युक्त असलेल्या खिडक्या (जंग्या) ठेवलेल्या आहेत, अशा तटाने युक्त असलेला दुर्ग.
- अब्दुर्ग : सभोवार पाणी असल्याने नैसर्गिक संरक्षण असलेला दुर्ग.
- वार्क्षदुर्ग : वृक्षदुर्ग. तटाच्या बाहेर चारी बाजूला चार कोसपर्यंत मोठाले वृक्ष, काटेरी झुडपे आणि वेलीच्या जाळ्या यांनी वेष्टिलेला दुर्ग.
- नृदुर्ग : हत्ती, घोडे, रथ, पायदळ या चतुरंग सेनेने रक्षण केलेला दुर्ग.
- गिरिदुर्ग : डोंगरी उंचवट्यावर पुरेसा पाणीपुरवठा असणारे, झाडे असून धान्य पिकवता येईल असे, पण जाण्यासाठी एकच वाट असलेले स्थान.
देवज्ञविलास ग्रंथ
लाला लक्ष्मीधर याने राजा कृष्णदेवराय च्या काळात लिहीलेल्या 'देवज्ञविलास' या ग्रंथात किल्ल्यांचे वर्गीकरण लेलेले आढळते.(उपयुक्ततेच्या क्रमानुसार)
- गिरिदुर्ग
- वनदुर्ग
- गव्हरदुर्ग(गुहेचा किल्ला म्हणून उपयोग)
- जलदुर्ग
- कर्दमदुर्ग (दलदलीचा प्रदेश असलेल्या ठिकाणी बांधलेला किल्ला)
- मिश्रदुर्ग (वरीलपैकी दोन अथवा तीन प्रकार एकत्रित करून बांधलेला)
- मृतिका दुर्ग
- दारू दुर्ग
- ग्रामदुर्ग
- कोट (सभोवताली लाकूड वापरून तयार केले संरक्षण)