"जयंत सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary |
||
ओळ २९: | ओळ २९: | ||
}} |
}} |
||
जयंत सावरकर (जन्म : ३ मे |
जयंत सावरकर (जन्म : गुहागर, ३ मे. १९३६) हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५४पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली, ती पुढे ७३ वर्षे चालूच राहिली दर दोन तीन दिवसांनी कुठल्या न कुठल्या नाटकात ते रंगभूमीवर दिसतातच. |
||
सावरकर मूळ गुहागरचे. वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांना २१ मुले होती. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले, व नोकरी करू लागले.. |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात |
||
⚫ | सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले. |
||
⚫ | मा. [[अनंत दामले]] ऊर्फ [[नूतन पेंढारकर]], [[केशवराव दाते]], [[जयराम शिलेदार]], [[मा. दत्ताराम]], [[दादा साळवी]], [[नानासाहेब फाटक]], [[पंडितराव नगरकर]], [[परशुराम सामंत]], [[बाळ कोल्हटकर]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[रमेश देव]], [[राजा परांजपे]], [[रामदास कामत]], [[सुरेश हळदणकर]], ते आजच्या पिढीतील [[अद्वैत दादरकर]], मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. |
||
⚫ | मा. [[अनंत दामले]] ऊर्फ [[नूतन पेंढारकर]], [[केशवराव दाते]], [[जयराम शिलेदार]], [[मा. दत्ताराम]], [[दादा साळवी]], [[नानासाहेब फाटक]], [[पंडितराव नगरकर]], [[परशुराम सामंत]], [[बाळ कोल्हटकर]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[रमेश देव]], [[राजा परांजपे]], [[रामदास कामत]], [[सुरेश हळदणकर]], ते आजच्या पिढीतील [[अद्वैत दादरकर]], [[मंगेश कदम]] यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर [[अद्वैत दादरकर]], [[चंद्रकांत कुलकर्णी]], [[मंगेश कदम]], समीर विद्वांस अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत. |
||
जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. |
|||
जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली. . |
|||
==कौटुंबिक== |
==कौटुंबिक== |
||
ओळ ५७: | ओळ ५९: | ||
* कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या) |
* कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या) |
||
* के दिल अभी भरा नही |
* के दिल अभी भरा नही |
||
* खोली नंबर ५ |
|||
* गणपती बप्पा मोरया (राजा) |
* गणपती बप्पा मोरया (राजा) |
||
* चव्हाटा (कुळबुडवे) |
* चव्हाटा (कुळबुडवे) |
||
* जादूचा खेळ (गावकरी |
* जादूचा खेळ (गावकरी |
||
* जावई माझा भला |
|||
* तुझे आहे तुजपाशी (आचार्य; श्याम) |
* तुझे आहे तुजपाशी (आचार्य; श्याम) |
||
* दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर) |
* दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर) |
||
ओळ ८४: | ओळ ८८: | ||
* सम्राट सिंह (विदूषक) |
* सम्राट सिंह (विदूषक) |
||
* सूर्यास्त (गायकवाड) |
* सूर्यास्त (गायकवाड) |
||
* सूर्याची पिल्ले |
|||
* सौजन्याची ऐशी तैशी (मंडलेकर) |
* सौजन्याची ऐशी तैशी (मंडलेकर) |
||
* हंगामी नवरा पाहिजे (आचारी, नायक) |
* हंगामी नवरा पाहिजे (आचारी, नायक) |
||
ओळ १३१: | ओळ १३६: | ||
==जयंत सावरकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
==जयंत सावरकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
||
* [[मुंबई मराठी साहित्य संघ]ाचे उपाध्यक्षपद |
|||
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१५) |
* [[अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद]]ेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१५) |
||
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले. |
* मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले. |
२२:०८, १७ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जयंत सावरकर | |
---|---|
जन्म |
जयंत सावरकर ३ मे, १९३६ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
जयंत सावरकर (जन्म : गुहागर, ३ मे. १९३६) हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५४पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली, ती पुढे ७३ वर्षे चालूच राहिली दर दोन तीन दिवसांनी कुठल्या न कुठल्या नाटकात ते रंगभूमीवर दिसतातच.
सावरकर मूळ गुहागरचे. वडील लहानमोठा व्यवसाय करायचे. सकाळी चार वाजता उठून रोज चरकातून उसाचा हंडाभर रस काढून ते चालत चालत आरे गावापर्यंत जाऊन विकायचे. त्यांना २१ मुले होती. जयंत सावरकर सर्वात धाकटे. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता, त्याच्याकडे जयंत सावरकरांना पाठवले. ते त्याच्याबरोबर गिरगावात राहू लागले, व नोकरी करू लागले..
नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे जेव्हा ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला, पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.
सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाट्य शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. साहित्य संघाच्या दरवाज्यावर उभे राहून ते तिकिटे कापत. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.
मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, केशवराव दाते, जयराम शिलेदार, मा. दत्ताराम, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रमेश देव, राजा परांजपे, रामदास कामत, सुरेश हळदणकर, ते आजच्या पिढीतील अद्वैत दादरकर, मंगेश कदम यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे. कमलाकर सारंग, दामू केंकरे, भालचंद्र पेंढारकर या जुन्या दिग्दर्शकांबरोबर कामे केल्यानंतर अद्वैत दादरकर, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, समीर विद्वांस अशा नव्या पिढीतल्या दिग्दर्शकांबरोबरही त्यांनी कामे केली आहेत.
जयंत सावरकर यांनी शंभरहून अधिक मराठी आणि तीसहून अधिक हिंदी चित्रपटांत कामे केली आहेत. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या तरुण कलाकारांबरोबर त्यांना कामे करायला मिळाली. .
कौटुंबिक
- सासरे - कै. मामा पेंडसे
- पत्नी - उषा पेंडसे
- मुलगा - कौस्तुभ
- कन्या - सुषमा आणि सुवर्णा
जयंत सावरकर यांची भूमिका असलेली नाटके आणि त्यांतील भूमिकांची नावे
- अपराध मीच केला (गोळे मास्तर)
- अपूर्णांक (ब्रम्हे)
- अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष)
- अल्लादीन जादूचा दिवा (हुजर्या)
- अवध्य (नाचणे)
- आम्ही जगतो बेफाम (चिवटे)
- एकच प्याला (तळीराम)
- एक हट्टी मुलगी (गृहस्थ)
- ओ वुमनिया
- कळलाव्या कांद्याची कहाणी (कारभारी; मंगळ्या)
- के दिल अभी भरा नही
- खोली नंबर ५
- गणपती बप्पा मोरया (राजा)
- चव्हाटा (कुळबुडवे)
- जादूचा खेळ (गावकरी
- जावई माझा भला
- तुझे आहे तुजपाशी (आचार्य; श्याम)
- दिवा जळू दे सारी रात (पोस्टमास्तर)
- दुरितांचे तिमिर जावो
- धंदेवाईक (विमा एजंट)
- टिळक आणि आगरकर (गोपाळराव जोशी)
- नयन तुझे जादुगार (पतंगे रिपोर्टर)
- नाथ हा माझा (विनयकुमार)
- प्रेमसंन्यास (गोकुळ)
- प्रेमा तुझा रंग कसा (बच्चाजी बल्लाळ)
- बेबंदशाही (खंडोजी, खाशाबा)
- भानगडीशिवाय घर नाही (मोठा भाऊ; विवाहित)
- भावबंधन (कामण्णा)
- मातीच्या गाड्याचे प्रकरण (चेट)
- यमाला जेव्हा डुलकी लागते (बजाबा)
- ययाति आणि देवयानी
- लग्नाची बेडी (अवधूत)
- लहानपण देगा देवा
- लैला होलैला (इन्स्पेक्टर मालपाणी)
- वन रूम किचन (जोशी)
- वरचा मजला रिकामा (पोपट)
- वाजे पाऊल आपुले (भाऊराव)
- व्यक्ती आणि वल्ली (अंतू बर्वा; हरितात्या)
- सम्राट सिंह (विदूषक)
- सूर्यास्त (गायकवाड)
- सूर्याची पिल्ले
- सौजन्याची ऐशी तैशी (मंडलेकर)
- हंगामी नवरा पाहिजे (आचारी, नायक)
- हॅम्लेट (नाटकातल्या नाटकातली राणी)
- हं हं आणि हं हं हं (राजा)
- हाच खेळ उद्यापुन्हा (नंदलाल)
- हा तेराव्वा
- हिमालयाची सावली (केशव)
- हिरा जो भंगला नाही (राजज्योतिषी)
जयंत सावरकर यांची भूमिका असलेले चित्रपट
- इजा बिजा तिजा
- इना मिना डीका (हिंदी)
- कुरुक्षेत्र (हिंदी)
- गडबड गोंधळ
- गुलाम-ए-मुस्तफा (हिंदी)
- जावई माझा भला
- तेरा मेरा साथ रहें (हिंदी)
- धमाल बाबल्या गणप्याची
- प्रतिसाद : द रिस्पॉन्स (हिंदी)
- पोलीस लाईन
- बडे दिलवाला (हिंदी)
- बिस्कीट
- झांगडगुत्ता, वगैरे
- युगपुरुष (हिंदी)
- रिंगा रिंगा
- रॉकी हॅन्डसम (हिंदी)
- लव्ह का तडका (हिंदी)
- वक्रतुंड महाकाय
- वास्तव : द रिॲलिटी (हिंदी)
- विघ्नहर्ता महागणपती
- वोह छोकरी (हिंदी, दूरचित्रवाणी चित्रपट)
- व्यक्ती आणि वल्ली (अंतू बर्वा; हरितात्या)
- शासन (हिंदी)
- समुद्र (हिंदी)
- सिंघम (हिंदी)
- हरिओम विठ्ठला
- येड्यांची जत्रा
आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर सहभाग असलेले कार्यक्रम
- गजरा (दूरदर्शन)
- प्रपंच (टेकाडे भावजी, आकाशवाणी)
- चला हवा येऊ द्या
आत्मचरित्रात्मक पुस्तक
- मी एक छोटा माणूस
जयंत सावरकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- [[मुंबई मराठी साहित्य संघ]ाचे उपाध्यक्षपद
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१५)
- मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाने ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ या कार्यक्रमात १४ ऑगस्ट २०१५ रोजी जयंत सावरकर यांना डॉ. मा.गो. खांडेकर स्मृतिपुरस्कार देऊन गौरविले. त्यावेळी सावरकर यांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच त्यांनी स्वतःच्या नाटकांतली गाजलेली स्वगते आणि नाट्यप्रवेश सादर केले.
- रत्नागिरी जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरव (१९९६)
- ९७व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद (२०१७)
- चतुरंग प्रतिष्ठानने साजरा केलेला सहस्रचंद्रदर्शन सोहळा
- विष्णुदास भावे पुरस्कार (२०१६)
- केशवराव दाते पुरस्कार
- मास्टर नरेश पुरस्कार
- महाराष्ट्र सरकारतर्फॆ नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार (२०१८)