"धनगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १४: | ओळ १४: | ||
== संबंधित पुस्तके == |
== संबंधित पुस्तके == |
||
* धनगरांचा गौरवशाली इतिहास (संजय सोनवणी) |
|||
* धनगरी ओवीगीतातील सांस्कृतिकता आणि भाषाविशेष (तानाजी पाटील) |
|||
* धनगरी बोली (वसंत पाटील) |
|||
* माझा धनगरवाडा (लेखक - धनंजय धुरगुडे) |
* माझा धनगरवाडा (लेखक - धनंजय धुरगुडे) |
||
२०:३५, १९ जुलै २०१९ ची आवृत्ती
धनगर ही महाराष्ट्रातील एक भटकी जमात आहे. या समाजातले लोक पाळीव दुभते प्राणी चरावयास नेण्याचे व त्यांच्या देखभालीचे काम करतात व त्यांतून मिळणाऱ्या पैशांतून उदरनिर्वाह करतात.[ संदर्भ हवा ] यांची एकंदर लोकसंख्या (१९९१) ६,७३,४३९ इतकी आहे.. कोंकण, उत्तर महाराष्ट्रात सांगली, धुळे, सोलापूर, बारामती, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद या जिल्ह्यांत तर मध्य प्रदेश, वऱ्हाड व मध्यभारत या प्रांतांत हे लोक आढळतात. मेंढ्या चारणे, विकणे व घोंगडया विणणे हे त्यांचे व्यवसाय असून ते शेळ्या-मेंढ्या, गुरे-ढोरे पाळून त्यांवर उदरनिर्वाह करतात.
दैवते
!बिरोबा!!खंडोबा!!धुळोबा!!शिंगरोबा!!म्हसोबा
विरोबा हे धनगरांचे मुख्य दैवत आहे. त्याचे मुख्य स्थान (सांगली) जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे आहे. खंडोबा हे धनगर समाजाचे दुसरे मुख्य दैवत आहे. खंडोबाचे मुख्य देवस्थान जेजुरी, जिल्हा-पुणे येथे आहे. धुळोबा हे धनगरांचे तिसरे दैवत आहे. धुळोबाच्या व विरोबाच्या कथांमध्ये साम्य आढळते.. शिंगरोबाची जीवनगाथा अगदी अलीकडची म्हणजे ब्रिटिशांच्या काळातली आहे, म्हणून त्याला आधुनिक देव मानले जाते. वीरतीर्थ या क्षेत्राच्या ठिकाणी असलेला काळभैरवनाथ हे देखील धनगरांचे एक दैवत मानले जाते.
लोकसाहित्य
- विरोबाची ओवी, धनगरी ओव्या व गजी
संबंधित पुस्तके
- धनगरांचा गौरवशाली इतिहास (संजय सोनवणी)
- धनगरी ओवीगीतातील सांस्कृतिकता आणि भाषाविशेष (तानाजी पाटील)
- धनगरी बोली (वसंत पाटील)
- माझा धनगरवाडा (लेखक - धनंजय धुरगुडे)