Jump to content

"गिरीश कर्नाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५०: ओळ ५०:
* [[उंबरठा]] (मराठी, अभिनय)
* [[उंबरठा]] (मराठी, अभिनय)
* एक था टायगर (हिंदी, अभिनय)
* एक था टायगर (हिंदी, अभिनय)
* ओंदनोंदू कालादल्ली (कानडी)
* ओंदनोंदू कालादल्ली (कानडी, दिग्दर्शन)
* कनक पुरंदर (कानडी)
* कनक पुरंदर (कानडी)
* काडू (कानडी)
* काडू (कानडी, दिग्दर्शन))
* कानुरू हेग्गदिती (कानडी)
* कानुरू हेग्गदिती (कानडी)
* गोधुलि (हिंदी, पटकथा)
* गोधुलि (हिंदी, पटकथा)
ओळ ५९: ओळ ५९:
* [[निशांत]] (हिंदी, अभिनय)
* [[निशांत]] (हिंदी, अभिनय)
* पुकार (हिंदी, अभिनय)
* पुकार (हिंदी, अभिनय)
* मंथन (हिंदी, अभिनय(
* वंशवृक्ष (कानडी)
* लाईफ गोज ऑन (हिंदी, अभिनय)
* वंशवृक्ष (कानडी, दिग्दर्शन)
* सरगम (मराठी, अभिनय) (अप्रकाशित)
* सरगम (मराठी, अभिनय) (अप्रकाशित)
* संस्कार (हिंदी, अभिनय)


== कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली/लिहिलेली नाटके ==
== कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली/लिहिलेली नाटके ==

२०:१३, ११ जून २०१९ ची आवृत्ती

गिरीश कर्नाड
जन्म मे १९, इ.स. १९३८
माथेरान, महाराष्ट्र
मृत्यू जून १०, इ.स.२०१९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता
साहित्य प्रकार नाटक, कविता
प्रसिद्ध साहित्यकृती नाटके: तुघलक, हयवदन, नागमंडल
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)

गिरीश कर्नाड (जन्म : १९ मे १९३८; मृत्यू : १० जून २०१९), हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला.

शिक्षण

कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. गणित आणि संख्याशास्त्र हे विषय घेऊन कर्नाड प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले.[]

चित्रपट

गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.[]

नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगनेओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत.

गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे.

गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.[]

गिरीश कर्नाड यांचे चित्रपट

  • इक्बाल (हिंदी, अभिनय)
  • उत्सव (हिंदी भाषेत, दिग्दर्शन)
  • उंबरठा (मराठी, अभिनय)
  • एक था टायगर (हिंदी, अभिनय)
  • ओंदनोंदू कालादल्ली (कानडी, दिग्दर्शन)
  • कनक पुरंदर (कानडी)
  • काडू (कानडी, दिग्दर्शन))
  • कानुरू हेग्गदिती (कानडी)
  • गोधुलि (हिंदी, पटकथा)
  • टायगर जिंदा है (हिंदी, भूमिका-राॅ चीफ)
  • तब्बलियू नीनादे मगने (कानडी)
  • निशांत (हिंदी, अभिनय)
  • पुकार (हिंदी, अभिनय)
  • मंथन (हिंदी, अभिनय(
  • लाईफ गोज ऑन (हिंदी, अभिनय)
  • वंशवृक्ष (कानडी, दिग्दर्शन)
  • सरगम (मराठी, अभिनय) (अप्रकाशित)
  • संस्कार (हिंदी, अभिनय)

कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली/लिहिलेली नाटके

कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतेक कानडी नाटकांची मराठी रूपांतरे झाली आहेत.

  • अग्नी मत्तू मळे (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवाद, 'अग्नी आणि पाऊस', अनुवादक - सरोज देशपांडे)
  • काटेसावरी (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक - सरोज देशपांडे)
  • टिपू सुलतानचे स्वप्न (मूळ कानडी, मराठी अनुवादक - उमा कुलकर्णी)
  • तलेदंड (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक - उमा कुलकर्णी)
  • तुघलक (कानडीत लिहिलेले)
  • नागमंडल (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवादक - उमा कुलकर्णी)
  • बलि (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवादक - सरोज देशपांडे)
  • भंगलेले बिंब पुष्पसाज (मूळ कानडी नाटक , मराठी अनुवाद - सरोज देशपांडे)
  • ययाती (नाटक, मूळ कानडी, मराठीत अनुवाद श्री.र. भिडे आणि शिवाय उमा कुलकर्णी)
  • हयवदन (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक - सरोज देशपांडे)[]

गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार

आत्मचरित्र

गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर ’राजहंस प्रकाशना’ने छापून प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह या घटनेपासून सुरू होऊन स्वतःच्या लग्नापाशी थांबते.[]

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ aajtak.intoday.in (हिंदी भाषेत) https://aajtak.intoday.in/gallery/girish-karnad-funeral-not-with-religious-rituals-will-be-held-at-an-electric-crematorium-tmov-6-34666.html. 2019-06-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ vineshkumar.dixit. Dainik Bhaskar (हिंदी भाषेत) https://www.bhaskar.com/national/news/writer-and-playwright-girish-karnad-passed-away-on-monday-passed-away-01565671.html. 2019-06-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ क़ुरैशी, इमरान (2019-06-11). (इंग्रजी भाषेत) https://www.bbc.com/hindi/india-48589773. 2019-06-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ Navbharat Times (हिंदी भाषेत) https://navbharattimes.indiatimes.com/india/girish-karnads-death-is-a-big-loss-for-indian-art/articleshow/69723810.cms. 2019-06-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ NDTVIndia https://khabar.ndtv.com/news/bollywood/writer-actor-and-director-girish-karnad-dies-at-81-2050677. 2019-06-11 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)