"सैराट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ७०: | ओळ ७०: | ||
== पुरस्कार == |
== पुरस्कार == |
||
या चित्रपटाची [[६६ वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव|६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात]] निवड झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.berlinale.de/en/programm/berlinale_programm/datenblatt.php?film_id=201607581#tab=filmStills|शीर्षक=प्रोग्रॅम: जनरेशन १४प्लस: सैराट [वाईल्ड]|accessdate=2 April 2016|प्रकाशक=Internationale Filmfestspiele Berlin|भाषा = इंग्रजी}}</ref><ref>{{स्रोत बातमी|शीर्षक=वॉच : टीझर्स ऑफ 'फँड्री' डायरेक्टर नागराज मंजुळेज् नेक्स्ट, 'सैराट', सिलेक्टेड टु कॉम्पीट ॲट बर्लिन फिल्म फेस्टिव्हल|दुवा=http://www.huffingtonpost.in/2015/12/21/sairat-berlin-film-festiv_n_8852698.html|प्रकाशक=हफिंग्टन पोस्ट |दिनांक=२१ डिसेंबर २०१५|accessdate=2 April 2016|भाषा = इंग्रजी}}</ref> [[रिंकू राजगुरू]] हिला "एका चैतन्यशील मुलीचे प्रभावी चित्र रंगवण्यासाठी" २०१५ मध्ये [[६३ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार|६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.<ref name="63rdaward">{{संकेतस्थळ स्रोत|शीर्षक=६३वी नॅशनल फिल्म ॲवॉर्ड्स|दुवा=http://dff.nic.in/writereaddata/Winners_of_63rd_NFA_2015.pdf|प्रकाशक=[[डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल]]|दिनांक=२८ मार्च २०१६|accessdate=28 March 2016|भाषा = इंग्रजी}}</ref><ref>{{स्रोत बातमी|आडनाव=अतुलकर|पहिलेनाव=प्रीती|शीर्षक=आय ॲम एंजॉयिंग धिस मोमेंट टु द फुलेस्ट: रिंकू राजगुरू|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Im-enjoying-this-moment-to-the-fullest-Rinku-Rajguru/articleshow/51596264.cms|accessdate=27 April 2016|प्रकाशक=द टाइम्स ऑफ इंडिया|दिनांक=२९ मार्च २०१६| भाषा = इंग्रजी}}</ref> |

==हिंदीत== |
|||
सैराट चित्रपटावरून हिंदीत 'धडक' निघाला आहे. [[श्रीदेवी]]ची मुलगी जान्हवी कपूर 'धडक'ची नायिका आहे. |
|||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
२१:२६, २७ जून २०१८ ची आवृत्ती
सैराट | |
---|---|
दिग्दर्शन | नागराज मंजुळे |
निर्मिती |
नागराज मंजुळे, नितिन केणी, निखिल साने |
कथा | नागराज मंजुळे |
प्रमुख कलाकार |
आकाश ठोसर रिंकू राजगुरू |
संकलन | कुतुब इनामदार |
छाया | सुधाकर रेड्डी |
संगीत | अजय - अतुल |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
अवधी | २ ता. ५० मि. |
एकूण उत्पन्न | ११० कोटी (US$२४.४२ दशलक्ष) [१] |
सैराट हा नागराज मंजुळे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे. नागराज मंजुळे, नितिन केणी आणि निखिल साने यांनी आटपाट प्रोडक्शन, एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओ या बॅनर अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाला अजय - अतुल यांनी संगीत दिले असून यामध्ये रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. २९ एप्रिल २०१६ रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला.
विशेष
सैराट हा शब्द मराठीत पहिल्यांदा रा.ग. जाधव यांनी दादा कोंडके यांच्या संदर्भात वापरला. सैराट ह्या शब्दाचा उगम अर्थातच "स्वैर" म्हणजे स्वच्छंदी असा होतो. "मोकळा" ह्या शब्दापासून जसा "मोकाट" हा शब्द तयार झाला आहे, त्याचप्रमाणे, स्वैर शब्दापासून सैराट हा गावठी शब्द तयार झाला असला पाहिजे. उच्चभ्रू समाजात हा शब्द विशेष वापरला जात नसल्याचे दिसून येते.
कथानक
कथानक अगदीच नविन आहे असे नक्कीच नाही, परंतु हाताळणी थोडीशी वेगळ्या पद्धतिची असल्याकारणाने सिनेमा अत्यंत लोकप्रिय झाला. फासेपारधी जातीत जन्मलेला नायक, प्रशांत काळे (उर्फ परश्या) हा गावच्या धनाढय आणि राजकारणात अतिशय सक्रिय असलेल्या पाटलाच्या मुलीच्या (रिंकु राजगुरु ने अर्चना पाटील उर्फ आर्ची ची भूमिका उत्तमपणे पार पाडली आहे) प्रेमात पडतो. त्यांचे प्रेम फुलविण्यामध्ये परश्याचे दोन् मित्र, लंगड्या (तानाजी गळगुंडे ह्यांनी अप्रतिमपणे केलेली ही भूमिका पाहून मन थक्क होते) आणि सलिम शेख उर्फ सल्या, हे त्याला वेळोवेळी मदत करत असतात. घरच्यांचा विरोध पत्करुन दोघेजण हैदराबादला पळून जाऊन लग्न करतात परंतु शेवटी सुडाने जळफळत असलेला आर्चीचा भाऊ त्यांना शोधून त्यांना ठार मारतो. सिनेमातील शेवटचे दृश्य हे हेलावून टाकणारे आहे.
कलाकार
- रिंकू राजगुरू ... (अर्चना पाटील उर्फ 'आर्ची')
- आकाश ठोसर ... (प्रशांत काळे उर्फ 'परश्या')
- तानाजी गळगुंडे ... (प्रदीप बनसोडे उर्फ 'लंगड्या')
- अरबाज शेख ... (सलीम शेख उर्फ 'सल्या')
- अनुजा मुळे ... (ॲनी)
- धनंजय ननावरे... (मंगया)
- सुरेश विश्वकर्मा... (तात्या)
- भक्ती चव्हाण
- सूरज पवार ... (प्रिन्स)
- संभाजी तांगडे
- वैभव परदेशी
- नागराज मंजुळे ... (सातपुते सर)
- छाया कदम
- भूषण मंजुळे
- ज्योती सुभाष ... (संगुना आत्या)
ह्या सिनेमातील सर्वात आश्चर्यकारकपणे सर्वांच्या मनात भरण्याजोगा अभिनय रिंकु राजगुरुने केला असून, ती आर्चीची भूमिका अक्षरश: जगली आहे असे दिसून येते. प्रेक्षक तिचा अभिनय पाहून थक्क झाले असून आश्चर्य व्यक्त करीत आहेत. "आता गं बया.." ह्या गाण्यात, पोलीसस्टेशनमधिल प्रस्ंग, झोपडपट्टीमध्ये तिचा होणारा कोंडमारा तसेच काॅलेजमधिल तिचे बिंनधास्त वागणे ह्या सर्व गोष्टी तिने स्वत:च्या सहजसुंदर अभिनयाने अगदी उत्तमपणे नटविल्या आहेत. तिच्या तुलनेत आकाश ठोसर थोडा अभिनयात कमी पडतो, पर्ंतु चाॅकलेट हिरो म्हणून भाव खाऊन जातो, हे निश्चित.
संगीत
या चित्रपटाचे संगीत हा त्याचा आत्मा आहे असे म्हणणे काही वावगे होणार नाही. अजय-अतुल ह्यांनी इतके कर्णमधुर संगीत देऊन प्रेक्षकांची वाहवा मिळविली आहे. सैराट चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन अजय-अतुल यांचे आहे.[२] चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी अजय-अतुल यांनीच लिहिली असून पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. ज्याच्या पार्श्वसंगीताचे ध्वनिमुद्रण हॉलीवूड, कॅलिफोर्निया मधील 'सोनी स्कोरिंग स्टेज' या स्टुडिओत 'सिंफनी ऑर्केस्ट्रा'मध्ये झाले असा सैराट हा भारतातील पहिलाच चित्रपट आहे.. या स्टुडिओमध्ये त्यांनी ४५ जणांच्या वाद्यवृंदासोबत या चित्रपटाच्या संगीताचे ध्वनिमुद्रण केले आहे. संगीतात सेलो, व्हायोलीन, हार्प, हॉर्न, ब्रास या वाद्यांचा वापर केला आहे.[३]
क्र. | शीर्षक | गीतकार | गायक | अवधी |
---|---|---|---|---|
१. | "याड लागलं" | अजय - अतुल | अजय गोगावले | ०५:१४ |
२. | "आत्ताच बया का बावरलं" | अजय - अतुल | श्रेया घोषाल | ०५:३४ |
३. | "सैराट झालं जी" | अजय - अतुल, नागराज मंजुळे | चिन्मया श्रीपदा, अजय गोगावले | ०६:०९ |
४. | "झिंगाट" | अजय - अतुल | अजय - अतुल | ०३:४६ |
एकूण अवधी: |
१९:४५ |
निर्मिती
नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाची कहाणी सौम्य प्रेमकथा म्हणून लिहिली होती. त्यांचा उद्देश असाच होता की ह्या चित्रपटाने मागच्या काही चित्रपटांपेक्षा जास्त व्यवसाय करावा. चित्रपटाची कथाही त्यांच्या स्वतःच्या आयुष्याशी संबंधित आहे.. त्यामुळेच चित्रीकरणासाठी सोलापूर जिल्ह्यातील जेऊर ह्या त्यांच्या स्वतःच्या मूळ गावाची निवड करण्यात आली.[४]
प्रदर्शन
हा चित्रपट महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कोलकाता, भिलाई, रायपूर, कर्नाटक, तेलंगण या ठिकाणी इंग्रजी उपशीर्षकांसहित प्रदर्शित करण्यात आला.[५]
बॉक्स ऑफिस
सैराट मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत आत्तापर्यंत ११० कोटींची कमाई केली आहे.[१]
पुरस्कार
या चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली.[६][७] रिंकू राजगुरू हिला "एका चैतन्यशील मुलीचे प्रभावी चित्र रंगवण्यासाठी" २०१५ मध्ये ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.[८][९]
हिंदीत
सैराट चित्रपटावरून हिंदीत 'धडक' निघाला आहे. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'धडक'ची नायिका आहे.
संदर्भ
- ^ a b (इंग्रजी भाषेत) http://movieboxofficecollection.com/sairat-collection-till-now-box-office-worldwide-overseas-total-report/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.loksatta.com/manoranjan-news/ajay-atul-back-in-marathi-363641/. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://zeenews.india.com/marathi/news/kallabaji/sairat-first-indian-film-to-record-its-music-at-hollywood/307859. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ सहानी, अलका. http://indianexpress.com/article/entertainment/regional/discrimination-exists-everywhere-in-india-nagraj-manjule/#. 27 April 2016 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ http://www.huffingtonpost.in/2016/04/29/sairat-review-interview_n_9803798.html%7Caccessdate=1
- ^ (इंग्रजी भाषेत) https://www.berlinale.de/en/programm/berlinale_programm/datenblatt.php?film_id=201607581#tab=filmStills. 2 April 2016 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (इंग्रजी भाषेत) http://www.huffingtonpost.in/2015/12/21/sairat-berlin-film-festiv_n_8852698.html. 2 April 2016 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ (PDF) (इंग्रजी भाषेत) http://dff.nic.in/writereaddata/Winners_of_63rd_NFA_2015.pdf. 28 March 2016 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ अतुलकर, प्रीती. (इंग्रजी भाषेत) http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Im-enjoying-this-moment-to-the-fullest-Rinku-Rajguru/articleshow/51596264.cms. 27 April 2016 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |