रिंकू राजगुरू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिंकू राजगुरू
जन्म

प्रेरणा महादेव राजगुरू
३ जून, २००० (2000-06-03) (वय: २३)

[१]
अकलूज, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेत्री
कारकीर्दीचा काळ २०१६ - सद्य
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट सैराट

प्रेरणा महादेव राजगुरू उर्फ रिंकू राजगुरू एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे.[२] ही अभिनेत्री तिच्या रिंकू ह्या टोपण नावाने प्रसिद्ध आहे. रिंकु ही सैराट या चित्रपटामधील नायिका ‘आर्ची’ (अर्चना पाटील) या भूमिकेसाठी ओळखली जाते.[३][४] तिने आपल्या अभिनयाची सुरुवात आकाश ठोसर या नटासोबत केली. तिला २०१५ मध्ये ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने (चित्रपट) गौरवण्यात आले.[५] तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस्. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेककरिता रिंकुला नायिका म्हणून घेतले आणि हा सिनेमा (सिनेमाचे नाव: मनसु मल्लिगे, अर्थ: मन हा मोगरा) ३१ मार्च २०१७ रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकला.[ संदर्भ हवा ]

चित्रपट[संपादन]

वर्ष शीर्षक भाषा व्यक्तिरेखा टीप
२०१६ सैराट मराठी अर्चना "आर्ची" पाटील ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग) मिळाला.
२०१७ मान्सू मिलान्गय कन्नड सानवी ३१ मार्च २०१७ रोजी प्रदर्शित.
२०१९ कागर मराठी २६ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित.
२०२० मेकअप मराठी पुर्वी ७ फेब्रुवारी २०२० रोजी प्रदर्शित.
२०२१ २०० हल्ला हो हिंदी आशा सुर्वे २० ऑगस्ट २०२१ रोजी प्रदर्शित.
२०२२ झुंड हिंदी मोनिका ४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित

मालिका[संपादन]

वर्ष मालिका अभिनय Network
२०२० हंड्रेड नेत्रा पाटील हॉटस्टार

पुरस्कार[संपादन]

  • स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्कार (चित्रपट विभाग)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "हॅप्पी बर्थडेः साध्या पद्धतीने रिंकूचा वाढदिवस साजरा करणार- महादेव राजगुरु" (इंग्रजी भाषेत).
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-03-29. 2017-03-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Sairat: Rinku Rajguru on winning the National Award and much more".
  4. ^ "Sairat amasses Rs 25.50 cr in first week" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ "६३व्या नॅशनल फिल्म ॲवॉर्ड्‌स" (PDF) (इंग्रजी भाषेत). 28 March 2016 रोजी पाहिले.

बाह्य दुवा[संपादन]