नागराज मंजुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
नागराज मंजुळे
[[File:
The Director Nagraj Manjule along with cast and crew of the film ‘Sairat’ at the presentation, during the 47th International Film Festival of India (IFFI-2016), in Panaji, Goa on November 22, 2016.jpg
|250 px|alt=]]
नागराज मंजुळे
जन्म जेऊर, सोलापूर, महाराष्ट्र, भारत
पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2016 चा फेवरेट दिग्दर्शकाचा पुरस्कार.
अधिकृत संकेतस्थळ www.nagrajmanjule.net

नागराज पोपटराव मंजुळे हे मराठी कवी आणि "पिस्तुल्या"[१] या लघुपटाचे आणि फॅंड्रीसैराट या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शक आहेत.

व्यक्तिगत जीवन[संपादन]

हे सोलापूर जिल्हयातील, करमाळा तालुक्यातील जेऊर गावचे आहेत. त्यांचा जन्म वडार समाजात झाला.

शिक्षण[संपादन]

वडार समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यंत कमी, तरीही नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. आणि पुढे एम.फिल केले. नगरच्या महाविद्यालयात मास कम्युनिकेशनचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला. आणि तिथेच प्रोजेक्टचा एक भाग म्हणून 'पिस्तुल्या' ही पहिला लघुपट निर्माण केला.[२]

कारकीर्द[संपादन]

नागराजच्या 'पिस्तुल्या' या पहिल्या लघुपटाला आणि त्यातील बालकलाकार सुरज पवार यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. शाळेत जाण्यासाठी दलित मुलांची इच्छा तसेच कुटुंबाच्या गरिबीमुळे तसेच त्याच्या जमातीसाठी ह्या समाजात खोलवर रुजलेले द्वेष आणि तिरस्कार या कारणांमुळे मुलांना औपचारिक शिक्षण मिळण्यासाठीची असमर्थता हा लघुपट दर्शवितो.प्रथम चित्रपट फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला. फॅंड्री म्हणजे कैकाडी भाषेतील डुक्कर.[३] त्यांचा दुसरा चित्रपट 'सैराट' सर्वाधिक कमाईचा चित्रपट ठरला.[४] , [५] त्यांचा 'उन्हाच्या कटाविरूद्ध' हा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. [६]

कारकीर्द[संपादन]

 • पिस्तुल्या(लघुपट)
 • फॅंड्री (मराठी चित्रपट)
 • सैराट (मराठी चित्रपट) : या चित्रपटाची ६६व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळ्यासाठी निवड झाली [७].

पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ https://www.deccanherald.com/content/163049/pistulya-depicts-deprivation-undying-urge.html
 2. ^ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms
 3. ^ https://www.slashfilm.com/fandry-revisited/
 4. ^ https://www.ibtimes.co.in/box-office-collection-will-rinku-akash-starrer-marathi-film-sairat-cross-rs-100-crore-mark-679936
 5. ^ https://www.india.com/entertainment/sairat-box-office-marathi-blockbuster-on-its-way-to-rs-100-crore-collections-beating-baaghi-and-fan-1242159/
 6. ^ https://timesofindia.indiatimes.com/city/pune/My-film-reflects-my-own-struggle-for-education/articleshow/8968010.cms
 7. ^ "६६वा बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपटमेळा" (इंग्रजी भाषेत).
 8. ^ https://www.loksatta.com/pune-news/nagraj-manjule-get-bharat-ratna-dr-babasaheb-ambedkar-award-1490876/