"पहलाज निहलानी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
दुवे |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''पहलाज निहलानी''' हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता [[गोविंदा (अभिनेता)|गोविंदा]] याच्याबरोबर [[आँखे (चित्रपट)|आँखे]], [[शोला और शबनम (चित्रपट)|शोला और शबनम]] अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक [[गोविंद निहलानी]] यांचे कनिष्ठ बंधू आहेत. |
'''पहलाज निहलानी''' हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता [[गोविंदा (अभिनेता)|गोविंदा]] याच्याबरोबर [[आँखे (चित्रपट)|आँखे]], [[शोला और शबनम (चित्रपट)|शोला और शबनम]] अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक [[गोविंद निहलानी]] यांचे कनिष्ठ बंधू आहेत. |
||
पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. २०१७ सालच्या सुरुवातीला |
पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. २०१७ सालच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या [[उडता पंजाब]], [[इंदू सरकार]], [[लिपस्टिक अंडर माय बुरखा]] आणि [[बाबूमोशाय बंदूकबाज]] या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेऊन निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यापूर्वीही अनेक कलाकारांनी निहलानींच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निहलानी यांनी कधीच कलाकारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना जुमानले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ''अॅक्शन हिरो'' संबोधून आपल्या राजकीय निष्ठा स्पष्ट केल्या होत्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे असल्याचा आरोपही अनेकदा झाला होता. |
||
==सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या काटछाटी आणि त्यांचे निराकरण== |
|||
* [[उडता पंजाब]]ला सुचवलेल्या ८९ कट्सपैकी फक्त एक काटछाट मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली, बाकी ८८ फेटाळून लावल्या. |
|||
* मधुर भंडारकरांच्या [[इंदु सरकार]]लाा सुचवलेल्या एकूण १४ काटछाटी : १. चित्रपटात वर्तमानपत्राचे एक कात्रण दिसते, त्यावर [[अटलबिहारी वाजपेयी]], [[मोरारजी देसाई]] आणि [[लालकृष्ण अडवाणी]] यांची नावे दिसतात. तो शॉट कापावा. २. [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ]], [[प्रधान मंत्री]], [[कम्युनिस्ट]], [[अकाली दल]] आणि [[गुप्तचर विभाग]] असले काही शब्द चित्रपटातून काढून टाकावे. |
|||
* ही वाक्ये काढून टाकावी : १. अब इस देश में गाँधीजी के मायने बदल चुके हैं. २.. भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया है. ३. और तुम लॊग जिंदगीभर माँ-बेटे की गुलामी करते रहोगे. ४. मैं तॊ सत्तर साल का बुढ्ढा हूँ, मेरी नसबंदी क्यूँ करवा रहे हो? , वगैरे वगैरे. |
|||
* 'काही वाक्ये ट्रेलरमध्ये चालतील, पण मुख्य चित्रपटात असता कामा नयेत' हा एक खास आदेश होता. |
|||
मधुर भंडारकरांनी अपील केल्यावर बहुतेक सर्व कट्स उडाले, काही किरकोळच राहिले, आणि [[इंदु सरकार]] हा चित्रपट U/A (चित्रपट मोठ्या माणसांसह आलेल्या लहान मुलांनाही बघता येईल असे परवानापत्र) सर्टिफिकेटसह प्रदर्शित करायला मान्यता मिळाली. |
|||
==अध्यक्षपदावरून पायउतार== |
|||
११ ऑगस्ट २०१७ रोजी निहालानींना चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय झाला, त्यांच्या जागी गीतकार आणि जाहिरातकार [[प्रसून जोशी]] यांची नियुक्ती करण्यात आली. |
११ ऑगस्ट २०१७ रोजी निहालानींना चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय झाला, त्यांच्या जागी गीतकार आणि जाहिरातकार [[प्रसून जोशी]] यांची नियुक्ती करण्यात आली. |
||
२२:५९, १४ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
पहलाज निहलानी हिंदी दिग्दर्शक-निर्माता आहेत. निहलानी यांनी वयाच्या १४व्या वर्षी चित्रपट वितरक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १९७५मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपट वितरण कंपनी सुरू केली तसेच चित्रपट निर्मितीही केली. १९९० च्या दशकात त्यांनी हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदा याच्याबरोबर आँखे, शोला और शबनम अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. निहलानी हे दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे कनिष्ठ बंधू आहेत.
पहलाज निहलानी यांची १९ जानेवारी २०१५ रोजी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा हा कार्यकाळ अनेक वादांनी गाजला. त्यांच्या वादग्रस्त मार्गदर्शक तत्त्वांसाठी ते कायम चर्चेत राहिले. २०१७ सालच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब, इंदू सरकार, लिपस्टिक अंडर माय बुरखा आणि बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटात त्यांनी अनेक दुरुस्त्या सुचवल्या होत्या. काही दिग्दर्शकांनी एकत्र येत पत्रकार परिषदेत घेऊन निहलानींना सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली होती. त्यापूर्वीही अनेक कलाकारांनी निहलानींच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निहलानी यांनी कधीच कलाकारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांना जुमानले नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अॅक्शन हिरो संबोधून आपल्या राजकीय निष्ठा स्पष्ट केल्या होत्या. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे असल्याचा आरोपही अनेकदा झाला होता.
सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या काटछाटी आणि त्यांचे निराकरण
- उडता पंजाबला सुचवलेल्या ८९ कट्सपैकी फक्त एक काटछाट मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केली, बाकी ८८ फेटाळून लावल्या.
- मधुर भंडारकरांच्या इंदु सरकारलाा सुचवलेल्या एकूण १४ काटछाटी : १. चित्रपटात वर्तमानपत्राचे एक कात्रण दिसते, त्यावर अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई आणि लालकृष्ण अडवाणी यांची नावे दिसतात. तो शॉट कापावा. २. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रधान मंत्री, कम्युनिस्ट, अकाली दल आणि गुप्तचर विभाग असले काही शब्द चित्रपटातून काढून टाकावे.
- ही वाक्ये काढून टाकावी : १. अब इस देश में गाँधीजी के मायने बदल चुके हैं. २.. भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया है. ३. और तुम लॊग जिंदगीभर माँ-बेटे की गुलामी करते रहोगे. ४. मैं तॊ सत्तर साल का बुढ्ढा हूँ, मेरी नसबंदी क्यूँ करवा रहे हो? , वगैरे वगैरे.
- 'काही वाक्ये ट्रेलरमध्ये चालतील, पण मुख्य चित्रपटात असता कामा नयेत' हा एक खास आदेश होता.
मधुर भंडारकरांनी अपील केल्यावर बहुतेक सर्व कट्स उडाले, काही किरकोळच राहिले, आणि इंदु सरकार हा चित्रपट U/A (चित्रपट मोठ्या माणसांसह आलेल्या लहान मुलांनाही बघता येईल असे परवानापत्र) सर्टिफिकेटसह प्रदर्शित करायला मान्यता मिळाली.
अध्यक्षपदावरून पायउतार
११ ऑगस्ट २०१७ रोजी निहालानींना चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदावरून काढण्याचा निर्णय झाला, त्यांच्या जागी गीतकार आणि जाहिरातकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली.