"हेमा साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
|||
ओळ ७: | ओळ ७: | ||
==पुस्तके== |
==पुस्तके== |
||
* आपले हिरवे मित्र |
* आपले हिरवे मित्र |
||
* पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (सहलेखिका - डॉ. विनया घाटे) |
|||
* बुद्ध परंपरा आणि [[बोधीवृक्ष|बोधिवृक्ष]] |
* बुद्ध परंपरा आणि [[बोधीवृक्ष|बोधिवृक्ष]] |
||
* [[वा.द. वर्तक]] यांनी संपादित केलेल्या 'शंभरेक संशोधन प्रबंधां'तील काही प्रबंध |
|||
* सम्राट अशोकावरील 'देवानंपिय पियदसी राञो ashok' हे पुस्तक |
* सम्राट अशोकावरील 'देवानंपिय पियदसी राञो ashok' हे पुस्तक |
||
२२:०४, ३ ऑगस्ट २०१७ ची आवृत्ती
डॉ. हेमा साने (१९४० - ) या पुण्यात राहणाऱ्या एक वनस्पतीशास्त्रज्ञ आहेत. त्या वनस्पती शास्त्रातल्या एम.एस्सी. पीएच्.डी. असून भारतविद्या शास्त्रातल्या एम.ए. एम.फिल.आहेत. पुण्यातील आबासाहेब गरवारे (एम.ई.एस.) कॉलेजच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या त्या प्रमुख होत्या.[ संदर्भ हवा ]
त्या निसर्गप्रेमी असून त्यांनी इतिहासाचादेखील अभ्यास केला आहे. साने पुण्यातील जोगेश्वरी बोळाजवळच्या शीतलादेवीचा पार भागातील जुनाट आणि पडक्या अशा राहतात. वाड्यात त्यांच्याबरोबर चार मांजरांचा, एका मुंगुसाचा, एका घुबडाचा आणि भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या अशा पक्ष्यांचाही निवास आहे.[ संदर्भ हवा ]
हेमा साने यांनी सन १९६०पासून विजेचा वापर केला गेलेला नाही. त्यामुळे घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजिरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणेही नाहीत. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना हे वाहन वापरले. तोपर्यंत आणि त्यानंतर त्या नोकरीव्यतिरिक्त इतरत्र पायीच जात. अजूनही त्या विहिरीवरून पाणी आणतात. त्यांनी टेलिफोनही वापरलेला नाही. केवळ दिवसाच्या प्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली आहेत. मात्र उपलब्ध झाल्यापासून त्या सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरू लागल्या आहेत.[ संदर्भ हवा ]
पुस्तके
- आपले हिरवे मित्र
- पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (सहलेखिका - डॉ. विनया घाटे)
- बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष
- वा.द. वर्तक यांनी संपादित केलेल्या 'शंभरेक संशोधन प्रबंधां'तील काही प्रबंध
- सम्राट अशोकावरील 'देवानंपिय पियदसी राञो ashok' हे पुस्तक
कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली क्रमिक पुस्तके
- Biology (सहलेखिका - वीणा अरबाट)
- Industrial Botany (सहलेखिका - डॉ. सविता रहांगदळे)
- Plant Anatomy and Embryology
- Plant Biotechnology (सहलेखक - डॉ. सविता रहांगदळे आणि डॉ, संजयकुमार रहांगदळे)
पुरस्कार आणि सन्मान
- उरवडे(तालुका मुळशी-जिल्हा पुणे) येथी शिवबा प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार.
- किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यामध्ये ८ जानेवारी २०१६ रोजी झालेल्या ४थ्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.