"चक्रवाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो added Category:जीवशास्त्र using HotCat |
No edit summary |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
==वास्तव्य/आढळस्थान== |
==वास्तव्य/आढळस्थान== |
||
{{लेखनाव}} हे बहुतकरून [[भारत|भारतात]] आढळणारे स्थलांतरित [[बदक]] आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]], [[चीन]]चा काही भाग आणि आफ्रिकेतील [[इथियोपिया]] येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या |
{{लेखनाव}} हे बहुतकरून [[भारत|भारतात]] आढळणारे स्थलांतरित [[बदक]] आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच [[बांगलादेश]], [[पाकिस्तान]], [[म्यानमार]], [[चीन]]चा काही भाग आणि आफ्रिकेतील [[इथियोपिया]] येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनार्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थित चालू शकतात. |
||
==खाद्य== |
==खाद्य== |
||
ओळ १९: | ओळ १९: | ||
==प्रजनन काळ== |
==प्रजनन काळ== |
||
हे बदक मुळातले भारताच्या [[लडाख]] प्रांतातील व [[तिबेट|तिबेटमधील]] आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे [[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[जून]] हा काळ {{लेखनाव}} पक्ष्यांचा वीणीचा काळ असतो. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत असते, ते पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ |
हे बदक मुळातले भारताच्या [[लडाख]] प्रांतातील व [[तिबेट|तिबेटमधील]] आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे [[एप्रिल महिना|एप्रिल]] ते [[जून]] हा काळ {{लेखनाव}} पक्ष्यांचा वीणीचा काळ असतो. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत असते, ते पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढर्या रंगाची अंडी देते. |
||
==इतर== |
==इतर== |
||
{{लेखनाव}} पक्ष्याला '''ब्राह्मणी बदक''' असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगच्छटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे. |
{{लेखनाव}} पक्ष्याला '''ब्राह्मणी बदक''' असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगच्छटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे. |
||
हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून {{लेखनाव}} भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक |
हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून {{लेखनाव}} भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी [[पक्षी निरीक्षक]] तिबेटमधील [[मानससरोवर|मानस सरोवराला]] हे पक्षी बघायला जातात. |
||
==ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?== |
==ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?== |
||
ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र |
ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनार्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथांत अनेक उल्लेख आहेत. केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. त्याची मादी दरवर्षी बदलते अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. शास्त्रीय नाव : Tadorna ferruginea.. |
||
==इतिहासात== |
|||
ज्ञानेश्वर महाराजांनीही याचे वर्णन केले आहे: |
|||
==वाङ्मयात== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
'''भोगवी जो दिगगजन | भुवनदिवा ||'''{{संदर्भ हवा}}</br> |
|||
१. [[ज्ञानेश्वर]] महाराजांनीही ज्ञानेश्वरीतील १६व्या अध्यायात चक्रवाक पक्ष्याची उपमा वापरली आहे.: |
|||
अर्थ: हे सूर्यदेवा! तू आता लवकर दर्शन दे कारण मी माझ्या हरविलेल्या सखीला साद घालून-घालून थकलो आहे. |
|||
⚫ | |||
'''भोगवी जो चिद्गगन | भुवनदिवा ||''' </br> ... [[ज्ञानेश्वरी]] १६.६ |
|||
अर्थ: (बुद्धी आणि यथार्थबोध हे दोन चक्रवाक नर-मादी पक्षी शब्दाच्या भिन्नार्थरूपी अडचणीत सापडल्याने परस्परांच्या वियोगाने अनादिकालापासून ओरडत बसले आहेत), हे (चिद्गगनातील गुरुरूपी दिवा असलेया) सूर्यदेवा! तू आता लवकर दर्शन दे आणि या चक्रवाकाच्या जोडप्याला समरस ऐक्यतेचे सुख (भोगव) मिळवून दे. |
|||
२. महाकवी [[कालिदास|कालिदासानेही]] त्याच्या काव्यांत चक्रवाकाच्या उपमा दिल्या आहेत.</br> |
|||
'''दूरी भूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकां''' --- [[मेघदूत]] २.२० </br> |
|||
अर्थ : चक्रवाकीसारखीच माझी पत्नी (मी दूर असल्याने घरी) एकटीच असेल. |
|||
३. '''इहेमामिन्द्र संनुद चक्रकेव दम्पती''' </br> |
|||
..'''प्रजयैनो स्वस्तकौ विश्वमायुर्व्यश्नुताम्''' -- अथर्ववेद १४.२.६४ </br> |
|||
अर्थ : संतानप्राप्ती होऊन सुखाचे आयुष्य उपभोगता यावे यासाठी हे इंद्रा, तू या पतिपत्नींना चक्रकाक-चक्रवाकीप्रमाणे प्रेरित कर. |
|||
४. शिवाय [[रघुवंश]] (३.२४), [[कुमारसंभव]] (५.२६) आणि हिरण्यकेशी गृह्यसूत्रात (१.२४.६) चक्रवाक पक्ष्याच्या प्रतिमा वापरल्या आहेत. |
|||
महाकवी कालीदासांनीही त्यांच्या काव्यात चक्रवाकाचे वर्णन केले आहे.{{संदर्भ हवा}} |
|||
⚫ | |||
[[वर्ग: आख्यायिका|पक्षी]] |
[[वर्ग: आख्यायिका|पक्षी]] |
१५:२४, २६ मार्च २०१५ ची आवृत्ती
शास्त्रीय नाव | Tadorna ferruginea (Pallas) |
---|---|
कुळ | कादंबाद्य (Anatidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश |
Ruddy Shelduck Brahminy Duck |
हिंदी | सुरखाब |
वर्णन
चक्रवाक हा साधारण ६६ सें. मी. आकारमानाचा पक्षी आहे. चक्रवाक नर केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा आणि मानेचा रंग त्यामानाने थोडा फिकट असतो. त्याच्या मानेभोवताली काळे वर्तुळ(काळा कंठ), पंखांत काळेपांढरे आणि हिरवे पट्टे असून शेपूट काळी असते. मादी नरासारखीच पण तिचे रंग फिकट असतात. मादीच्या मानेभोवती काळे वर्तुळ(काळा कंठ) नसते.
वास्तव्य/आढळस्थान
चक्रवाक हे बहुतकरून भारतात आढळणारे स्थलांतरित बदक आहे. हिवाळ्यात दक्षिण भारताचा प्रदेश वगळता संपूर्ण भारतभर ते आढळते. तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, चीनचा काही भाग आणि आफ्रिकेतील इथियोपिया येथेही यांचे वास्तव्य आहे. हे पक्षी तलावात जोडीने किंवा लहान थव्याने विहार करतात त्यातही तलावांच्या किनार्याकडे राहणे जास्त पसंत करतात. हे पक्षी इतर बदकांच्या मानाने जमिनीवर जास्त व्यवस्थित चालू शकतात.
खाद्य
पाण वनस्पती, पाण्यातले कीटक, मासे, सर्पट, मृदुकाय कवची गोगलगाई, कालवे हे या पक्ष्यांचे खाद्य आहे.
प्रजनन काळ
हे बदक मुळातले भारताच्या लडाख प्रांतातील व तिबेटमधील आहे. तिथून ही बदके हिवाळ्यात भारताच्या दक्षिण भागात स्थलांतर करतात व उन्हाळ्यात पुन्हा तिबेट व लडाखमध्ये परततात. साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ चक्रवाक पक्ष्यांचा वीणीचा काळ असतो. त्यांचे घरटे झाडाच्या ढोलीत, जुन्या इमारतींच्या भिंतीत असते, ते पिसांनी बनविलेले असते. मादी एकावेळी ६ ते १० स्वच्छ पांढर्या रंगाची अंडी देते.
इतर
चक्रवाक पक्ष्याला ब्राह्मणी बदक असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते इंग्लिश भाषेतील पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगच्छटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे.
हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून चक्रवाक भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरून उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी पक्षी निरीक्षक तिबेटमधील मानस सरोवराला हे पक्षी बघायला जातात.
ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?
ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनार्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथांत अनेक उल्लेख आहेत. केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. त्याची मादी दरवर्षी बदलते अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. शास्त्रीय नाव : Tadorna ferruginea..
वाङ्मयात
संस्कृत आणि अन्य भारतीय काव्यांत हा पक्षी प्रेमाचे व पर्यायाने विरहाचे प्रतीक म्हणून मानला गेला आहे.
१. ज्ञानेश्वर महाराजांनीही ज्ञानेश्वरीतील १६व्या अध्यायात चक्रवाक पक्ष्याची उपमा वापरली आहे.:
तया चक्रवाकांचे मिथुन | साम सामरस्याचे समाधान |
भोगवी जो चिद्गगन | भुवनदिवा ||
... ज्ञानेश्वरी १६.६
अर्थ: (बुद्धी आणि यथार्थबोध हे दोन चक्रवाक नर-मादी पक्षी शब्दाच्या भिन्नार्थरूपी अडचणीत सापडल्याने परस्परांच्या वियोगाने अनादिकालापासून ओरडत बसले आहेत), हे (चिद्गगनातील गुरुरूपी दिवा असलेया) सूर्यदेवा! तू आता लवकर दर्शन दे आणि या चक्रवाकाच्या जोडप्याला समरस ऐक्यतेचे सुख (भोगव) मिळवून दे.
२. महाकवी कालिदासानेही त्याच्या काव्यांत चक्रवाकाच्या उपमा दिल्या आहेत.
दूरी भूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकां --- मेघदूत २.२०
अर्थ : चक्रवाकीसारखीच माझी पत्नी (मी दूर असल्याने घरी) एकटीच असेल.
३. इहेमामिन्द्र संनुद चक्रकेव दम्पती
..प्रजयैनो स्वस्तकौ विश्वमायुर्व्यश्नुताम् -- अथर्ववेद १४.२.६४
अर्थ : संतानप्राप्ती होऊन सुखाचे आयुष्य उपभोगता यावे यासाठी हे इंद्रा, तू या पतिपत्नींना चक्रकाक-चक्रवाकीप्रमाणे प्रेरित कर.
४. शिवाय रघुवंश (३.२४), कुमारसंभव (५.२६) आणि हिरण्यकेशी गृह्यसूत्रात (१.२४.६) चक्रवाक पक्ष्याच्या प्रतिमा वापरल्या आहेत.
चित्रदालन
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |