Jump to content

"भालचंद्र दत्तात्रय खेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १०४: ओळ १०४:
==नाटके==
==नाटके==
* येथे ग्रह बदलून मिळतील
* येथे ग्रह बदलून मिळतील

==साहित्य समीक्षा==

* परदेशातील साहित्य सफर
* माझे साहित्य स्वप्न


==बाह्यदुवे==
==बाह्यदुवे==

००:४६, २३ जून २०१२ ची आवृत्ती

भालचंद्र दत्तात्रय खेर
जन्म जून १२, इ.स. १९१७
महाराष्ट्र, भारत
मृत्यू जून २१,इ.स. २०१२
महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
वडील दत्तात्रय

भालचंद्र दत्तात्रय खेर (जन्म : कर्जत-अहमदनगर जिल्हा :जून १२, इ.स. १९१७ - मृत्यू : पुणे; जून २१,इ.स. २०१२) हे मराठी लेखक होते. बी.ए. एल्‌‍एल.बी. झालेले भा. द. खेर हे पंचवीस वर्षे केसरीचे उपसंपादक होते. तसेच 'सहयाद्री' मासिकाचेही ते दहा वर्षे संपादक होते. भा.द.खेर हे मराठी लेखक वि.स.खांडेकर यांचे मामेभाऊ लागत.

कारकीर्द

भा. द. खेरांनी इ.स. १९४१ ते इ.स. १९८४ या काळात त्यांनी विपुल आणि दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखन केले. मनोहर माळगावकरांच्या कादंबऱ्यांचे 'अधांतरी', दे प्रिन्सेस' हे त्यांनी केलेले अनुवादही गाजले. शेक्सपीअरच्या 'हॅम्लेट', किंग लियर, विंटर्स टेल' इत्यादी नाटकांचे अनुवाद, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राची व साहित्याची ओळख करून देणारे ग्रंथ, श्री गुलाबराव महाराज, गजानन महाराज, साईबाबा आदी महात्म्यांची महती पटवून देणारी पुस्तके, ऐतिहासिक गुजगोष्टी, नाना नवलकथा' असे संकीर्ण लेखन प्रकाशित झालेले आहे. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५०००हून अधिक आहे. ’समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा.द.खेर एक सहसंपादक होते.


सन्मान

  • ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात भा. द. खेर यांचा सत्कार करण्यात आला होता.
  • भा.द.खेर यांनी लिहिलेल्या हिरोशिमा या कादंबरीचे प्रकाशन भारताचे तत्कालीन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले होते.
  • ’हिरोशिमा’चा इंग्रजी अनुवाद भारताचे राष्ट्राध्यक्ष ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशित झाला.
  • पुणे महापालिकेने शहरातील सिंहगड रस्त्यावरील एका (संतोष हॉल)चौकाला ’भा.द.खेर चौक’ असे नाव त्यांच्या हयातीतच दिले होते.
  • जपान फाउंडेशनने १९७६साली भा.द.खेर यांना ’हिरोशिमा’ लिहिण्यासाठी जपानला आमंत्रित केले होते.

भा.द.खेर यांना मिळालेले पुरस्कार

कादंबऱ्या

  • आई माझी आहे
  • आनंद जन्मला (कुटुंबनियोजन या विषयावरील कादंबरी)
  • कल्पवृक्ष (महाभारतावरील कादंबरी)
  • क्रांतीच्या वाटेवर
  • गुलाबाचं फूल
  • चक्रव्यूह
  • नंदादीप
  • प्रायश्चित
  • बर्लिन गंगेला मिळाले.
  • वादळवारा
  • विजय
  • शुभमंगल
  • सुखाचा लपंडाव
  • हिरोशिमा

कथासंग्रह

  • आणखी संस्कार-कथा
  • कथा चिरेबंदी
  • नादलहरी (१९३९)
  • संस्कार-कथा

चरित्रामक कादंबऱ्या

कादंबऱ्यांचे अनुवाद

  • अधांतरी
  • मकिको कॉन(अपूर्ण)
  • दे प्रिन्सेस
  • हॅम्लेट
  • किंग लियर
  • विंटर्स टेल

नाटके

  • येथे ग्रह बदलून मिळतील

साहित्य समीक्षा

  • परदेशातील साहित्य सफर
  • माझे साहित्य स्वप्न

बाह्यदुवे