Jump to content

तुषार सिंचन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तुषार सिंचन पद्धत ही ॲल्युमिनीयम किंवी पीव्हीसी पाईपला जोडलेल्या बारीक वेज असलेल्या तोटीद्वारे (स्प्रिंकलर नोझल) पाण्याच्या दाबाचा वापर करून पाणी पावसाप्रमाणे पिकावर सर्व ठिकाणी सारखे फवारले जाण्याची पद्धत होय. यात जास्तीत जास्त नोझल ठराविक वेगाने कायम वर्तुळाकाररीत्या फिरवण्याची सोय असते.

फायदे

[संपादन]

१) तुषार पद्धतीत पाण्याचा नाश होत नाही.

२) प्रवाही सिंचनापेक्षा सिंचन क्षमता जास्त मिळते.

३) तुषार सिंचन पद्धत जवळजवळ सर्व पिकांच्या सिंचनासाठी वापरता येते.

४) पाण्याची २५ ते ३५% बचत होते

५) पाणी सर्व ठिकाणी ठिकाणी समप्रमाणात पाहिजे तेवढे देता येते.

६) पाण्याचा प्रवाह कमी असतानासुद्धा पाहिजे तेवढे पाणी देता येते.

७) पावसासारखे पाणी पिकांवर पडते त्यामुळे काही किडी-रोग धुऊन जातात.

८) पाने आणि ताटे स्वच्छ राहतात.

९) द्रवरूप रासायनिक खाते तुषार-सिंचनाद्वारे देता येतात. खाते पिकाच्या मुळाशी पडतात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन बचत होते.

१०) ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा दरएकरी खर्च कमी येतो..

११) जमीन सपाट करण्याची अगर रानबांधणीची गरज नसते.

१२) मजुरीवरचा खर्च कमी येतो.

१३) पीक उत्पादनात १२ ते २०%वाढ होते.

योग्य असा आराखडा तयार करून योग्य तितक्याअश्वशक्तीचा आणि दाबाचा पंपसेट वापरल्यास ही तुषार सिंचन पद्धत उपयुक्त ठरते. इलेक्ट्रिक मोटार/डीझेल इंजिन, पंप, सक्शन डीलीव्हरी पाईप्स, उपमुख्य नळ्या लॅटरल्स, रायझर, नोझल, एन्दप्लग, बेंड इ. साहित्य सिंचनासाठी लागते. स्प्रिंकलरला एक मोठा आणि दुसरा लहान नोझल जोडलेला असतो. मोठा नोझल वर्तुळाकार दूरच्या क्षेत्रावर पाणी समप्रमाणात पसरवतो, लहान नोझल जवळील वर्तुळाकार क्षेत्रावर पाणी पसरवतो.पाणी जास्त दाबाने पाईपमधून नोझलद्वारे फावारल्यासारखे बाहेर पडते. नोझल प्रती चौ.इंच ४० पाउंड या दाबावर काम करीत असेल, तर साधारणपणे २४० सें.मी.व्यासाच्या वर्तुळाकार क्षेत्रावर पाणी पसरवते. तुषार सिंचनाचा आराखडा तयार करण्यासाठी जमिनीचा प्रकार, जमिनीचा चढ उतार, विहीर, नदी, अगर शेततळ्यातून पाणीपुरवठा, एकूण उपलब्ध पाणी किती तास पाणी उपसु शकतो आणि पिकाचा प्रकार, सिंचन क्षेत्राची लांबी-रुंदी आणि कंटूर नकाशा इ. गोष्टींचा वापर करून तज्ज्ञ तांत्रिकदृष्ट्या सक्षम तुषार सिंचन प्रणाली बसवितात.

वापरताना घेण्याची काळजी

[संपादन]

१) योग्य त्या स्प्रिंकलरची निवड करावी.

२) स्प्रिंकलरमधून दर तशी बाहेर पडणारे पाणी अगर त्याचा वेग हा नेहमी त्या जमिनीच्या पाणी पोषण क्षमतेपेक्षा कमी असावा.

३) उपलब्ध पाण्याचा विचार करून स्प्रिंकलर निवडावा. तुषार सिंचन सेट सुरू करण्यापूर्वी माहिती पुस्तीकेनुसार अगर तद्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी. काळजी घ्यावी म्हणजे तुषार सिंचन संच सक्षमतेने चालविता येतो.

१) सर्व नट-बोल्ट योग्य तऱ्हेने घट्ट बसवावेत.

२) सर्व पाइप्स स्वच्छ ठेवावेत.

३) संच बंद करताना पहिल्यांदा गेट व्हाल्व्ह हळुवारपणे बंद करून मग पंप बंद करावा.

४) स्प्रिंकलरला ओईल अगर ग्रीस लाऊ नये.

५) लॅटरल सिंचन केल्यानंतर आतून फ्लॅश करावा.

संदर्भ

[संपादन]