विकिपीडिया:सद्य घटना/फेब्रुवारी २००८

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फेब्रुवारी २००८
सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु सो मं बु गु शु
<< १० ११ १२ १३ १४ १५ १६ १७ १८ १९ २० २१ २२ २३ २४ २५ २६ २७ २८ २९ >>


आजचे छायाचित्र


Pato aguja africano (Anhinga rufa), parque nacional de Chobe, Botsuana, 2018-07-28, DD 46.jpg

दि. ०१.०२.२००८[संपादन]

ऑक्‍स्फर्ड शब्दकोश...सव्वाशे वर्षांचा वाटाड्या!
ऑक्‍स्फर्ड शब्दकोश...सव्वाशे वर्षांचा वाटाड्या!
तीन लाख नवीन शब्द, ३५ कोटी शब्द, एक लाख ६९ हजार वाक्‍प्रचार, ५ लाख ७७ हजार संदर्भ...हा पसारा आहे ऑक्‍स्फर्ड शब्दकोशाचा. जगभरात नावाजला गेलेला हा शब्दकोश जगभरातील बदलत्या शब्दांची, वाक्‍यांची दखल घेत इंग्रजी शब्दांसाठीचा वाटाड्या बनून गेला आहे. आज तो सव्वाशेव्या वर्षात पदार्पण करतो आहे.

ऑक्‍स्फर्ड शब्दकोशाचा पहिला खंड १ फेब्रुवारी १८८४ रोजी प्रसिद्ध झाला. "अ न्यू इंग्लिश डिक्‍शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स; फाऊंडेड मेनली ऑन द मटेरिअल्स कलेक्‍टेड बाय द फिलॉलॉजिकल सोसायटी' असे त्याचे लांबलचक नाव होते. ३५२ शब्दांच्या खंडात "ए' पासून "अँट'पर्यंतच्या शब्दांचा समावेश होता. हळूहळू हा डोंगर वाढत गेला आणि संपूर्ण एकत्रित शब्दकोश तयार व्हायला १९ एप्रिल १९२८ ही तारीख उजाडावी लागली. १९३३ मध्ये या शब्दकोशाला "ऑक्‍स्फर्ड इंग्लिश डिक्‍शनरी' असे नाव मिळाले. १९५७ नंतर जगभरातील बोली भाषांतील शब्दांची जोड या शब्दकोशात द्यायला सुरवात झाली आणि जे शब्द वापरले जात नाहीत, ते काढून टाकणेही सुरू झाले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे या शब्दकोशाचे संगणकीकरण करणे आवश्‍यक बनले आणि त्यासाठी "न्यू ऑक्‍स्फर्ड इंग्लिश डिक्‍शनरी' हा प्रकल्प सुरू झाला. संगणकीकरणासाठी १२० टाइपरायटर्सनी तब्बल ३५ कोटी कॅरॅक्‍टर्स टाइप केली. १९८९ मध्ये या प्रकल्पातील "न्यू' हे नाव काढून टाकण्यात आले आणि "ऑक्‍स्फर्ड इंग्लिश डिक्‍शनरी-२' या नावाने खंड प्रकाशित करण्यात आला. १४ मार्च २००० रोजी या शब्दकोश माहितीच्या महाजालात पूर्णपणे समाविष्ट झाला....

सकाळ[मृत दुवा]


शिर्डीतून मराठी हद्दपार!
शिर्डी महाराष्ट्रातच आहे का याची शंका यावी अशा तेलुगू, तामिळ, इंग्रजी पाट्या येथे बहुसंख्य दुकानांवर दिसतात.

' रुम चाहिए ? मंदिर के पासही लॉज है। दर्शन करोगे ? व्ही . आय . पी . पास भी दिलादुँगा ... लक्झरी , व्होल्वो बसका तिकीट चाहिए ? टॅक्सी भी मिलेगी .....' साईबाबांच्या शिर्डी भूमीत पाऊल टाकताच पदोपदी असे ऐकायला मिळतेच ; पण फुलवाल्यापासून हॉटेल , लॉजींगवाल्यापर्यंत सर्वच व्यावसायिकांच्या पाट्यांकडे नजर टाकल्यास मराठीचे कुठेही दर्शन घडत नाही . मात्र इंग्रजी , तेलुगु , गुजराती भाषेतील बोर्ड ठळकपणे दिसतात . मराठीचा वापर करण्याविषयी राज्य सरकारचे लेखी आदेश असले तरी स्थानिक नगरपालिका प्रशासन व तहसिलदारांच्या आशीर्वादाने हा आदेश शिर्डीकरांनी केव्हाच धाब्यावर बसविला आहे .

' सर्व जातिपंथाचे प्रतिक ' या भावनेने भाविकांची वर्दळ वाढू लागली आणि शिर्डी हे खेडे शहर बनले . चहाची टपरी , स्टार हॉटेले , लॉजिंग , टांगा , रिक्षा , लक्झरी बसेस , ए . सी . कार , वडा व भजेवाले , फुलविक्रेते , कटलरी , प्रसाद अशा सर्वच व्यावसायिकांचा धंदा तेजीत आहे . गिर्‍हाईकांच्या शोधासाठी या सगळ्यांचे दोन हजार एजंट ( शिर्डीत त्यांना ' पॉलीशवाले ' म्हणतात ) आहेत . भिकार्‍यांची संख्या दोन हजाराच्या आसपास आहे . भाविक शिर्डीत उतरत नाही तोच ४ - ५ एजंटांचा त्याच्याभोवती गराडा पडतो आणि ' क्या चाहिए ? लॉज , दर्शन , फुलप्रसाद , अच्छा खाना , नहाने के लिए गरम पानी ...' अशा प्रश्नांचा भडिमार होतो . संस्थानातल्या धर्मशाळा , पी . आर . ओ ., मंदिर या कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या तोंडीही कधी मराठी ऐकायला मिळत नाही . त्यामुळे आपण महाराष्ट्राऐवजी अन्य कुठल्या प्रांतात तर आलो नाही ना , हा विचार मराठी माणसाच्या मनाला नक्कीच भिडतो .....

मटा.


पालिकेत हिंदीचा आग्रह
इथे महाराष्ट्र दिनच साजरा व्हायला हवा, या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या इशार्‍याला पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी 'हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याने पालिकेच्या कामकाजात हिंदीचा वापर झाला पाहिजे', अशी मागणी करत काटशह देण्याचा प्रयत्न केला आहे.

सभागृहाच्या बैठकीत या सूचनेचा विचार व्हावा, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. या सूचनेवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत प्रत्येक महिन्यात भरणार्‍या सभागृहाच्या बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर ही सूचना असावी, असेही त्यांनी सांगितले.

मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून पालिकेचा कारभार मराठीतून व्हावा, याकरीता मी आग्रही राहिलो आहे. मात्र, सभागृहाच्या तसेच विविध समित्यांच्या बैठकीत सदस्यांना कोणत्याही भाषेत बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. सभेचे वृत्तांत किंवा कार्यक्रमपत्रिका मात्र मराठी तसेच इंग्रजी भाषेतून दिली जाते. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे व पालिकेतील काही सदस्य हिंदीतून बोलतात. ज्याप्रमाणे त्यांच्या भाषणांची नोंद मराठी व इंग्रजीत भाषेत होते, तशीच नोंद हिंदी भाषेत झाली पाहिजे, तसेच कार्यक्रम पत्रिकाही हिंदीतून द्यावी, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.

मटा.

दि. ०४.०२.२००८[संपादन]

बम्बई नही आई तो कहाँ जाइ...
कुर्ल्याचे लोकमान्य टिळक टर्मिनस... दुपारची वेळ... पोलिसांचा कडक बंदाबस्त... नातेवाईकांची गर्दी... 'अब बाहर माहौल कैसा है, यहाँपर कुछ गडबड तो नहीं होगी ना'... अशा चचेर्तच पटना एक्स्प्रेसचे टमिर्नसमध्ये आगमन झाले. पण, स्टेशनवर न रेंगाळता प्रत्येकजण मिळेल ती रिक्षा पकडून सटकत होता.

रविवारी मुंबईतील उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेने केलेल्या आंदोलनाची माहिती अनेकांच्या वाजणार्‍या मोबाइलवरुन ट्रेनमध्ये पोहोचली होती. 'हम बम्बई नहीं आई तो कहाँ जाई...', मुंबईत पहिल्यांदाच पाय ठेवत असलेल्या अनेकांच्या तोंडून उमटणारी हीच प्रतिक्रिया उमटत होती. ..

मटा.


कायदा हातात घेणार्‍यांवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री
विशिष्ट राज्यातील लोकांच्या विरोधात भूमिका घेणे चूक असल्याचे स्पष्ट मत व्यक्त करून मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कायदा हातात घेणारी व्यक्ती कोणीही असो, अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई होईल, असा निर्वाळा आज येथे दिला.

सर्वांनीच संयम पाळण्याची गरज आहे, असे ते म्हणाले...

सकाळ[मृत दुवा]

दि. ०५.०२.२००८[संपादन]

तुकाराम महाराज गाथा आता चौदाहून अधिक भाषांत
वारकरी संप्रदायावर अमृतवर्षाव केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे गेल्या चार दशकांत चौदाहून जास्त भाषेत रूपांतर झाले असून; इटालियनमध्ये भाषांतराला नुकताच प्रारंभ झाला आहे. महाराजांच्या जन्म चतुःशताब्दी सोहळ्यानिमित्त ही मौलिक भेट म्हणता येईल...
सकाळ[मृत दुवा]


विख्यात अक्षरांकनकार र.कृ. जोशी यांचे निधन
अक्षरांकन (कॅलिग्राफी) हा कलाप्रकार भारतात रुजविणारे व त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे र.कृ. जोशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अमेरिकेत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते...
लोकसत्ता

दि. ०९.०२.२००८[संपादन]

थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे निधन
आधुनिक युगातील महान समाजसेवक बाबा आमटे (वय ९४) यांचे आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील "आनंदवन" आश्रमात त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. त्यांना कर्करोग होता. त्यांच्या मागे दोन मुलगे आहेत....
सकाळ[मृत दुवा]

दि. १३.०२.२००८[संपादन]

"आयकर" भरतीत भूमिपुत्रांना डावलले
घटनेतील तरतुदीनुसार भूमिपुत्रांना नोकरी-व्यवसायात प्राधान्य मिळायलाच हवे, असे सांगत आयकर विभागात झालेल्या "टॅक्‍स असिस्टंट'पदाच्या भरतीविरोधात तीव्र निदर्शने करून शिवसेनेने आपला "मराठी बाणा' पुन्हा एकवार दाखवून दिला.

ही भरती रद्द करावी वा त्या उमेदवारांना त्यांच्या राज्यात सामावून घ्यावे, अशी मागणी करीत तसे न केल्यास शिवसेना आपल्या स्टाईलने त्यांचे "पार्सल' परत पाठवून देईल, असा इशारा स्थानीय लोकाधिकार समितीने दिला आहे.

आयकर विभागात अलीकडेच करण्यात आलेल्या ४०३ टॅक्‍स असिस्टंटपदाच्या भरतीत केंद्रातील हिंदी भाषक लॉबीने जाणीवपूर्वक मराठी तरुणांना डावलल्याचा आरोप करीत शिवसेनाप्रणीत लोकाधिकार समितीने आज येथील आयकर कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. विभागाने ही भरती तत्काळ रद्द करावी वा त्या पदांवरती भरती केलेल्या उमेदवारांना त्यांच्या राज्यात त्याच विभागात सामावून घ्यावे, अशी जोरदार मागणी समितीच्या वतीने गजानन कीर्तिकर यांनी या वेळी केलेल्या भाषणात केली. ...

सकाळ[मृत दुवा]

दि. १४.०२.२००८[संपादन]

लालूंचे राजला आव्हान; मुंबईत करणार छटपूजा
उत्तर भारतीयांच्या मुंबईतील छटपूजेला आक्षेप घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता थेट केंद्रीय रेल्वेमंत्री आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आव्हान दिले आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये आपण स्वतः मुंबईत येऊन पत्नीसोबत छटपूजा करू ; मला कोण अडवतंय ते बघू या... अशा भाषेत लालू यांनी राजला ललकारले आहे.

उत्तर भारतीयांच्या विरोधात प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषणे केल्याच्या आरोपावरुन कालच राज ठाकरे यांना अटक झाली होती व त्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली. राज ठाकरेंच्या सुटकेनंतर आता मुंबई तसेच राज्यातील तणाव निवळला असला तरी उत्तर भारतीयांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकसारख्या शहरातून तर शेकडो उत्तर भारतीय आपापल्या गावी परतत आहेत. अशावेळी उत्तर भारतीयांच्या बाजूने आता लालूप्रसाद यादव उभे ठाकले आहेत. मुंबईत राहणार्‍या उ. भारतीयांना घाबरण्याची गरज नाही. सगळ्यांनी तिथेच राहा. अजिबात पळून येण्याचे कारण नाही. एकत्र येऊन आपण सगळे या गुंड , बदमाश , लफंग्यांचा मुकाबला करुया , असे सांगतानाच मी स्वतः मुंबईत येऊन पत्नी राबडीदेवी यांच्यासोबत छटपूजा करणार आहे. मला कोण अडवतं , तेच मी पाहतो , अशी गर्जना त्यांनी यावेळी केली....

मटा.


नाशकात दगडफेकीत एकाचा मृत्यू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक झाल्यानंतर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शहरात विविध ठिकाणी झालेल्या दगडफेकीत एकाचा मृत्यू झाला. अंबादास धाराव असे या ६० वर्षीय नागरिकांचे नाव असून सिडको परिसरात एच एल कंपनीच्या बसवर झालेल्या दगडफेकीत त्यांचा मृत्यू झाला. दगडफेक झाली तेव्हा अंबादास हे बसमध्ये खिडकीत बसले. एच एलची बस सिडको परिसरात आल्यावर तिथे जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यातील एक दगड त्यांच्या वर्मी बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. अंबादास धाराव यांच्यासमवेत असणारे आणखी एक जण जखमी झाले आहे. परंतु, अद्याप त्यांचे नाव समजू शकले नाही.
मटा ऑनलाइन प्रतिनिधी

दि. १८.०२.२००८[संपादन]

परप्रांतियांच्या विरोधाला काँग्रेसचाही सूर
दिंडोरीतील गोळीबाराची घटना

- म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सर्व काही आलबेल असल्याची द्वाही देत असले आणि साक्षात मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन परप्रांतियांना अभय दिल्याचे जाहीर केले तरी त्याचदिवशी म्हणजे शनिवारी रात्री दिंडोरी तालुक्यातील वलखेड येथे काही परप्रांतियांनी केलेल्या गोळीबारात एक स्थानिक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्या परिसरात विलक्षण लोकक्षोभ उसळून त्याचा फटका पोलिसांनाही बसला.

या निमित्ताने दिंडोरीतील औद्योगिक पट्ट्यामध्ये परप्रांतियांच्या दादागिरीचे वास्तव चव्हाट्यावर आले असून, काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही मनसेच्या सुरात सूर मिसळला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आणि तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे यांनीही परप्रांतियांच्या दिंडोरीतील वाढत्या प्रस्थाला अटकाव करण्याची भावना व्यक्त करून मनसेच्या सुरात सूर मिळवला आहे.

दिंडोरी तालुक्यात 'डी झोन' असल्यामुळे तिथे शेतीमाल प्रक्रिया, पोल्ट्री आणि इतर काही उद्योग स्थिरावले आहेत. त्यातल्या अनेक ठिकाणी परप्रांतियांचा वरचष्मा असल्याने रोजगार मिळत नसल्याची धुम्मस स्थानिकांमध्ये आहे. अनेकवेळा शेकडोंच्या संख्येतील परप्रांतिय एकीच्या जोरावर स्थानिक ग्रामस्थांना दडपून टाकण्यात यश मिळवतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात स्थानिकांमध्ये असंतोष आहे. शनिवारी घडलेल्या घटनेतून तो प्रकटला आहे.....

मटा.

दि. १९.०२.२००८[संपादन]

जगातील निम्या भाषा अस्ताकडे
जगभरात सहा ते सात हजार भाषा अधिकृतपणे बोलल्या जात असल्या, तरी त्यातील निम्म्या भाषा अस्ताच्या मार्गावर आहेत.

इंग्रजी ही ज्ञानभाषा किंवा त्या त्या प्रांतातील इतर भाषांच्या वर्चस्वामुळे अनेक ठिकाणच्या मातृभाषा अडचणीत आल्या आहेत.

येत्या २१ तारखेला "जागतिक मातृभाषा' दिन आहे. मातृभाषांचे महत्त्व वाढावे, या दृष्टीने "युनेस्को'ने हा उपक्रम सुरू केला आहे. युनेस्कोने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जगात सहा हजार आठशे भाषा बोलल्या जातात. खूप पूर्वीपासून भाषांचा अभ्यास करणार्‍या "एथनोलॉग' या संस्थेने २००५मध्ये तयार केलेल्या यादीनुसार जगात ६,९१२ भाषा बोलल्या जातात. अनेक भाषा बोलणार्‍यांचे प्रमाण अतिशय कमी असल्याने त्यांचे नावच या याद्यांमध्ये नसल्याने जगभरातील एकूण भाषांची संख्या दहा हजारच्या घरात असल्याचे भाषातज्ज्ञ मानतात. "एथनोलॉग'ने दिलेल्या माहितीनुसार, मॅंदरिन ही चीनमधील भाषा जगात सर्वांत जास्त बोलली जाते. एकूण ८३ कोटी लोक ती बोलतात. तिच्याखालोखाल स्पॅनिश भाषेचा क्रमांक असून, ही भाषा ३३ कोटी लोक बोलतात. इंग्लिशचा क्रमांक जगात तिसरा असून, ही भाषा बोलणार्‍यांची (प्रथम भाषा) संख्या केवळ ३० कोटी इतकी आहे. अरेबिक, हिंदी (प्रमाण), पोर्तुगीज, बंगाली, रशियन, जपानी, जर्मन या भाषांचा त्यानंतर क्रमांक आहे. या भाषा बोलणार्‍यांचे प्रमाण जगाच्या लोकसंख्येच्या जवळजवळ निम्मे आहे. या प्रत्येक भाषेची प्रांतवार वेगवेगळी रूपे आहेत.

सकाळ[मृत दुवा]


राजविरुद्ध मानवाधिकार आयोगात तक्रार
उत्तर भारतीयांविरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनात दोघांचा बळी गेला असून याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात मनुष्यवधचा गुन्हा दाखल करावा यासाठी उत्तर भारतीय संघाने मानवाधिकार आयोगकडे विनंती अर्ज केला आहे.
म. टा. प्रतिनिधी

दि. २१.०२.२००८[संपादन]

दिंडोरीत तणाव
गेल्या शनिवारी एका परप्रांतियांने केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या योगेश शिंदे (२२) या युवकाचे बुधवारी सकाळी निधन झाले. या प्रकरणी गावातील अनेकांना पोलिसी जाच सहन करावा लागत असून, गोळीबार करणारे मात्र नामानिराळे असल्याच्या भावनेने आधीच संतापलेल्या दिंडोरीवासीयांमध्ये योगेशच्या मृत्यूनंतर विलक्षण अस्वस्थता निर्माण झाली आहे. दिवसभर संचारबंदीसदृश वातावरण असलेल्या दिंडोरीमध्ये सायंकाळी तणावपूर्ण शांततेत योगेशच्या पाथिर्वावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिंडोरीला लागूनच असलेल्या वलखेड फाट्यावर शनिवारी एका परप्रांतियाचा एकाशी किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर त्या परप्रांतियाने एका स्कोडा गाडीतून त्याचे तीन साथीदार आणले. या चौघांनी गोळीबार केल्यामुळे योगेशच्या छातीत गोळी लागली. हा प्रकार घडताच इतर तीन जण गाडीसह फरार झाले. त्यातल्या एकाला मात्र तिथे उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी पकडले होते. त्याला ताब्यात घेऊन जाणार्‍या पोलिसांवरही ग्रामस्थांनी दगडफेक करून आणि त्यांची मोटारसायकल जाळून संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एक परप्रांतीय आणि २६ स्थानिकांना ताब्यात घेतले होते...

मटा.


शिवसेना म्हणते...खबरदार मराठीला हात लावाल तर !
मुंबई महापालिकेची परिपत्रके हिंदीतून काढण्याच्या हिंदी भाषी नगरसेवकांच्या मागणीनंतर राज ठाकरे यांच्या मनसेने उत्तर भारतीयांच्या विरोधात राज्यव्यापी ‘ हल्लाबोल ’ केला. त्यानंतर उशिरा का होईना पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आज मैदानात उतरली आहे. मुंबई महापालिकेची परिपत्रके कदापी हिंदीतून निघणार नाही...महापालिकेची भाषा मराठीच राहणार अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून मांडली.

ठाकरे म्हणतात की मुंबईवर काही वटवाघळे नेहमी फडफडत असतात. मुंबई महापालिकेची अधिकृत भाषा मराठी असताना काही लोक उगीचच हिंदीच्या फुसकुल्या सोडत आहेत. निदान पालिकेची परिपत्रके तरी हिंदीत यावीत असा त्यांचा आग्रह आहे. मात्र हे होणार नाही म्हणजे नाही. मराठीला हात लावाल तर खबरदार. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही मराठीच्या बाबतीच लेचेपेचे राहू नये असा दम बाळासाहेबांनी भरला आहे.

बाहेरून सतत येणा-या लोंढ्यामुळे मुंबईसारखी शहरे मरत आहेत. बिल्डर्सही बाहेरचेच आणि टॉवरमध्ये घरे घेणारेही बाहेरचेच. त्यांचा महाराष्ट्राच्या संस्कृतीशी संबंधच नाही. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे व मराठी माणसाने मुंबईसाठी १०५ हुतात्मे दिले हे त्यांच्या खिजगणतीतही नाही. ज्या मुंबईसाठी मराठी माणसाने रक्त सांडले त्या मुंबईची भाषा हिंदी व्हावी हे कदापी शक्य नाही...

मटा.


शांततेचे आवाहन - राज ठाकरे यांना शालेय विद्यार्थ्यांचे पत्र
"आपण प्रथम सुसंस्कृत माणसे आहोत, त्यानंतर भारतीय आणि नंतर महाराष्ट्रीय आहोत, सर्वांनी शांततेने आणि एकमेकांवर परोपकार करीत जगले तर सर्वांचेच आयुष्य शांत-सुंदर होईल,' असा मौलिक सल्ला "विबग्यार हाय' या शाळेतील विद्यार्थिनींनी स्वहस्ताक्षरात पत्र लिहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला आहे. .......
सकाळ[मृत दुवा]

दि. २२.०२.२००८[संपादन]

शनीवर पडतो कर्बोदकांचा पाऊस
पृथ्वीवर खनिज तेलाचा साठा घटतोय, अशी चिंता बर्‍याचदा व्यक्त केली जाते. मात्र, या बाबतीत शनी फारच सुदैवी म्हटला पाहिजे. तिथे चक्क कर्बोदकांचा (हायड्रोकार्बन) पाऊस पडतो. दरम्यान, येत्या रविवारी शनी पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार आहे...
सकाळ[मृत दुवा]

दि. २८.०२.२००८[संपादन]

'जोधा-अकबर'विरुद्ध सांगलीत रणकंदन!
जोधा-अकबर विरोधात बुधवारी सांगलीत रणकंदन पेटले. हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आक्षेप घेत शिवप्रतिष्ठानच्या कार्यर्कत्यांनी शहरातील न्यू प्राइड मल्टिप्लेक्सवर धडक देताच त्यांचा पोलिसांशी संघर्ष उडाला. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे जखमी झाल्याने संतापलेल्या कार्यर्कत्यांनी अनेक एसटी बसेस, मोटारींचा चक्काचूर केला. पोलिसांची वाहनेही लक्ष्य झाली. संतप्त कार्यर्कत्यांनी शहरातील गावभाग पोलिस चौकीही पेटवून दिली. बारावीची परीक्षेच्या तोंडावर संघर्ष पेटण्याची शक्यता असतानाच भिडे यांनी 'झालं, गेलं विसरून जाऊ', असे सांगत कार्यर्कत्यांना शांततेचे आवाहन केले.

'जोधा-अकबर'चे शो बंद करावेत, या मागणीसाठी शिवप्रतिष्ठानच्या कार्यर्कत्यांनी बुधवारी सकाळी न्यू प्राईड मल्टिप्लेक्ससमोर निदर्शने सुरू केली. भिडे यांनी शिवाजी पुतळ्यापाशी शिवप्रार्थनाही म्हटली. त्याचवेळी कार्यकतेर् व पोलिसांत बाचाबाची झाली. प्रकरण धक्काबुक्की व मारहाणीपर्यंत गेल्याने सांगलीचे पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी स्वत: काठी हाती घेतली व भिडेंसह कार्यर्कत्यांवर लाठ्या चालवल्या. यामध्ये भिडे यांच्या हाताला मार लागून ते रक्तबंबाळ झाले. त्यानंतर या सर्वांना पोलिसांनी अटक करून सांगलीच्या गावबाग पोलिस चौकीत आणले. पाठोपाठ कार्यकतेर्ही आले. त्यांंनी पोलिस चौकीला घेराव घालून पेटवून दिली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी भिडे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथेही कार्यर्कत्यांच्या संतापाचा वणवा पसरला. अखेर कार्यर्कत्यांना शांत करण्यासाठी भिडे यांनीच पुढाकार घेतला व सर्वांना शांततेचे आवाहन केले.

मटा.


हे सुद्धा पहा[संपादन]