धूमकेतू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वर्ग:धुमकेतू या पानावरून पुनर्निर्देशित)
ह्याकुताके धूमकेतू

धूमकेतू किंवा शेंडेनक्षत्र म्हणजे उल्केसारखाच असणारा पण बर्फापासून बनलेला केरसुणीसारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहे. धूमकेतू अतिलंबगोलाकार कक्षेत सूर्याभोवती फिरतात व फिरताफिरता ते प्लूटोच्याही पुढे जातात. धूमकेतूंमध्ये घन कार्बन डायऑक्साईड, मिथेन, पाणी आणि इतर बरेच क्षार असतात.

धुमकेतू अंतर्बाह्य अतिशय थंड व असुरक्षित असतो. त्याचे कवच सच्छिद्र असते व शीर्षस्थानी चॅाकलेटप्रमाणे थर असतात. धुमकेतूचा पृष्ठभाग स्फटिकासारखा आणि टणक असतो. मात्र, तो जेव्हा सूर्याच्या अतिनिकट येतो तेव्हा त्याचे हिमस्फटिकांत रूपांतर होते. त्यावेळी त्याची घनता अधिक असते. धुमकेतूचा पृष्ठभाग व अंतर्भाग मऊ असतो.

धूमकेतू सूर्यापासून अतिदूर अंतरावर असलेल्या ढगांपासून तयार होतात असे समजले जाते. असे ढग सौर अभ्रिकेपासून(Solar nebula) बनलेल्या घन कचऱ्यापासून तयार झालेले असतात. उल्का वेगळ्या पद्धतीने तयार होतात पण अतिथंड धूमकेतूच्या आतील अस्थिर वायू/बाष्प संपल्यावर त्याच्यापासून उल्का होतात.

इतिहास[संपादन]

ख्रिस्ताब्द कालगणना सुरू होण्यापूर्वी ३५० वर्ष म्हणजे इ.स.पू. ३५०च्या सुमारास ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल याच्या मिटिऑरॉलॉजीआ ( meteorologia) नावाच्या प्रसिद्ध ग्रंथात धूमकेतूचा प्रथम उल्लेख सापडतो. 'पृथ्वीच्या वातावरणात दूरवर घडणारे निसर्गाचे निःश्वास' असे त्याने धूमकेतूचे वर्णन केले आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात तत्कालीन एक पंडित क्लॉडियस टोलेमी (Claudius Ptolemy) यानेही त्याच्या अल्माजेस्ट ( Almagest) या ग्रंथात असेच मत प्रतिपादन करून ऍरिस्टॉटलला दुजोरा दिला. नंतर मात्र हे तत्त्व कोणाला पटले नाही. रोमन तत्त्ववेत्ता ल्युसिअस सिनेका याने प्रथम धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे विधान स्वतःच्या एका लेखात केले. मात्र शास्त्रीय निरीक्षणाचा आधार तो देऊ शकला नाही. नंतर १६ व्या शतकातील एक खगोलशास्त्रज्ञ टायको ब्राहे (Tycho Brahe) याने स्वतः बनवलेल्या उपकरणाच्या साहाय्याने धूमकेतू हे खगोल गोल असल्याचे सप्रमाण सिद्ध करून दाखविले. इ.स. १५७७ साली पृथ्वीच्या जवळ आलेल्या एका धूमकेतूचे त्याने निरीक्षण केले व आपले मत मांडले की, धूमकेतू हे पृथ्वीच्या जवळपास असतीलतर इतर ताऱ्यांच्या संदर्भात पॅरॅलॅक्स पद्धतीनेत्याच्या अंतराचे मोजमाप करता आले पाहिजे. पण तसे शक्य होत नाही याचा अर्थ पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतरापेक्षा कितीतरी पटीने दूर हे धूमकेतू असले पाहिजेत.

धूमकेतूचे आकारमान[संपादन]

धूमकेतूच्या शिराच्या मध्यभागी असलेल्या गाभ्याचा व्यास ५ ते १० कि.मी. असून त्याचे वस्तुमान १०१७ ते १०१८ ग्रॅम असते. पृथ्वीचे वस्तू १०२७ (एकावर २७ शून्य) आहे. म्हणजे धूमकेतूचे वस्तुमान प्रचंड असले तरी पृथ्वीच्या मानाने खूपच कमी आहे.

शीराचा गाभा इतका लहान असतो की जगातल्या सर्वात मोठ्या दुर्बिणीतूनही तो दिसू शकत नाही. असे असताना आपण धूमकेतू पाहतो म्हणजे काय पाहतो? आपण पाहतो तो प्रसारानं पावलेला कोमा होय. कधी कधी प्रसारानं पावलेला कोमा हा हजारो व्यासाच्या आकारमानाचा असतो. त्यातील धुलिकणांवर व इतर भागावर प्रकाश पडून तेथील प्रकाश किरण परावर्तित होतात व तो भाग चमकू लागतो, आपल्याला तेजस्वी दिसू लागतो. मंगळ, गुरू, शुक्र या ग्रहांप्रमाणे धूमकेतूसुद्धा सूर्यप्रकाशात चमकतात. धूमकेतू स्वयंप्रकाशी नाही.

धूमकेतूची शेपटी[संपादन]

धूमकेतूच्या शीराचा भाग (गाभा व कोमा) प्रसारानं पावतो व त्यातून वाळूयुक्त धुळीच्या कणांचे लोट बाहेर फेकले जातात. सूर्यापासून तर नेहमीच वायू व इतर द्रव्ये बाहेर फेकण्याची प्रक्रिया सतत चालूच असते. त्यामुळे एक प्रकारचा उर्त्सजन दाब निर्माण होत असतो. हा दाब लाटेप्रमाणे सर्व बाजूने पसरतो आणि धूमकेतूपासून हलके होऊन बाहेर पडणाऱ्या वायू व धुलिकणांना बाजूला सतत ढकलत असतो. ढकलल्या गेलेल्या द्रव्यात लांबलचक शेपटीचा आकार तयार होतो. सूर्याचे प्रकाशकिरण पडून ती शेपटी चमकू लागते व आपल्याला तेजस्वी दिसते. शेपटीची लांबी काही कोटी मैलही असू शकते.

धूमकेतूच्या सभोवतालच्या अतिशय कंटाळवाणा वातावरणात कोमा म्हणतात आणि सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या दबावामुळे कोमावर शक्ती बळकट होते आणि सौर वायु एक प्रचंड शेपटी बनविण्याचे कारण बनवते, जे सूर्यापासून दूर होते.

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]