Jump to content

लिव्हिव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ल्वोव या पानावरून पुनर्निर्देशित)
लिव्हिव
Львів (युक्रेनियन)
युक्रेनमधील शहर

लिव्हिवचे जुने शहर-केंद्र
ध्वज
चिन्ह
लिव्हिव is located in युक्रेन
लिव्हिव
लिव्हिव
लिव्हिवचे युक्रेनमधील स्थान

गुणक: 49°51′0″N 24°1′0″E / 49.85000°N 24.01667°E / 49.85000; 24.01667

देश युक्रेन ध्वज युक्रेन
राज्य लिव्हिव ओब्लास्त
स्थापना वर्ष तेरावे शतक
क्षेत्रफळ ४०५ चौ. किमी (१५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९७१ फूट (२९६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ७,६०,०००
  - घनता ४,२९८ /चौ. किमी (११,१३० /चौ. मैल)
  - महानगर १४,९८,०००
city-adm.lviv.ua


लिव्हिव (युक्रेनियन: Львів; uk-Львів.ogg उच्चार ; पोलिश: Lwów; रशियन: Львов; जर्मन: Lemberg; लॅटिन: Leopolis) हे युक्रेन देशामधील एक शहर आहे. हे शहर युक्रेनच्या पश्चिम भागात पोलंडच्या सीमेजवळ वसले असून ते लिव्हिव ओब्लास्तचे राजधानीचे शहर तसेच युक्रेनमधील सर्वात मोठ्या सांस्कृतिक केंद्रांपैकी एक आहे. लिव्हिवचे ऐतिहासिक शहर केंद्र युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

इ.स. १२५६ साली स्थापण्यात आलेले लिव्हिव शहर आजवर अनेक महासत्तांचा भाग राहिले आहे. १३३९ - १७७२ दरम्यान पोलंडचे राजतंत्र, १७७२ - १९१८ दरम्यान ऑस्ट्रियन साम्राज्य, १११८ - १९३९ दरम्यान दुसरे पोलिश प्रजासत्ताक ह्यांनी लिव्हिववर सत्ता चालवली. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला नाझी जर्मनीच्या पोलंडवरील आक्रमणानंतर सोव्हिएत संघाने लिव्हिववर कब्जा मिळवला व लिव्हिव युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये सामील करण्यात आले. ऑपरेशन बार्बारोसादरम्यान जुलै १९४१ मध्ये नाझी जर्मनीने लिव्हिव काबीज केले व जुलै १९४४ पर्यंत तेथे राज्य केले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर लिव्हिव पुन्हा सोव्हिएत युक्रेनच्या अधिपत्याखाली आणण्यात आले.

ऐतिहासिक काळापासून लिव्हिवमध्ये पोलिशज्यू लोकांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य राहिले आहे. दुसऱ्या महायुद्धातील होलोकॉस्ट दरम्यान येथील जवळजवळ सर्व ज्यूंची कत्तल करण्यात आली व महायुद्ध संपल्यानंतर सोव्हिएत संघाने येथील बहुसंख्य पोलिश लोकांना हाकलून लावले. ह्याचा परिणाम म्हणजे सध्या येथे केवळ ०.९ टक्के पोलिश व ०.३ टक्के ज्यू राहिले आहेत.

क्रीडा

[संपादन]

पोलिश फुटबॉलची सुरुवात लिव्हिवमध्ये झाली असे मानण्यात येते. युएफा यूरो २०१२ साठी निवडण्यात आलेल्या ८ यजमान शहरांपैकी लिव्हिव एक आहे.

गॅलरी

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत