इंडियन आयडॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंडियन आयडॉल (Indian Idol) हा भारतामधील एक गायन स्पर्धा दूरचित्रवाणी कार्यक्रम आहे. ब्रिटनमधील पॉप आयडॉलची भारतीय आवृत्ती असलेल्या इंडियन आयडॉलचा पहिला हंगाम ऑक्टोबर २००४ ते मार्च २००५ दरम्यान सोनी टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासून इंडियन आयडॉलचे एकूण ६ हंगाम बनवले गेले आहेत.

ह्या कार्यक्रमामध्ये अनेक स्पर्धक मंचावर येऊन गायन करतात. प्रत्येक स्पर्धकाला पंचांद्वारे गूण दिले जातात. तसेच कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना देखील फोनद्वारे प्रत्येक स्पर्धकाला गूण देण्याची संधी मिळते. हंगामाच्या अखेरीस सर्वाधिक गूण मिळवणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित केले जाते.

हंगाम[संपादन]

हंगाम काळ सुत्रधार पंच विजेता उपविजेता
ऑक्टोबर २००४ — मार्च २००५ मिनी माथुरअमन वर्मा अभिजीत सावंत अमित साना
नोव्हेंबर २००५ — एप्रिल २००६ मिनी माथुरअमन वर्मा संदीप आचार्य एन.सी. कारुण्य
मे २००७ — सप्टेंबर २००७ मिनी माथुरहुसेन कुवाजेर्वाला प्रशांत तमंग अमित पॉल
सप्टेंबर २००८ — मार्च २००९ मयांग चांगहुसेन कुवाजेर्वाला सुरभी देबबर्मा कपिल थापा
एप्रिल २०१० — ऑगस्ट २०१० अभिजीत सावंतहुसेन कुवाजेर्वाला श्रीराम चंद्र भूमी त्रिवेदी
जून २०१२ — सप्टेंबर २०१२ मिनी माथुरहुसेन कुवाजेर्वाला विपुल मेहता देवेंद्र पाल सिंग

बाह्य दुवे[संपादन]