Jump to content

फराह खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फराह खान
जन्म ९ जानेवारी, १९६५ (1965-01-09) (वय: ५९)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, नृत्यदिग्दर्शक
पती शिरीष कुंदर

फराह खान (जन्म : मुंबई, ९ जानेवारी १९६५) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व मुख्यत: नृत्यदिग्दर्शक आहे. तिने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये शाहरूख खानपासून ते शाकिरापर्यंत अनेक अभिनेत्यांना नृत्यामध्ये प्रशिक्षित केले आहे. तिने ४ चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. २०१२ सालच्या शिरीन फरहाद की तो निकल पडी ह्या चित्रपटामध्ये तिची नायिकेची भूमिका होती.

कुटुंब

[संपादन]

फराह खान हिचे वडील कामरान खान स्टंटमन होते. चित्रपटांतील मारपिटीची दृश्ये ते आयोजित करत. मागाहून ते चित्रपट निर्माते झाले. फराहच्या आईचे नाव मेनका. ती पटकथा लिहिते. [[अभिनेत्री हनी इराणीची ती बहीण लागते. फराहचा भाऊ साजिद हा प्रसिद्ध विनोदी अभिनेता, अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शक आहे. (साजिद खानवर मीटूचे आरोप झाले होते.) फरहान अख्तर आणि जोया अख्तर या फराह खानच्या आते किंवा मामेबहिणी आहेत.

शिक्षण

[संपादन]

मुंबईच्या सेंट झेव्हियर्स काॅलेजातून फराह खानने सोशालाॅजीत पदवी मिळवली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. मायकल जॅक्सनकडे पाहून त्यांनी नृत्यामध्ये कारकीर्द करायचा नक्की केले.

नृत्यदिग्दर्शनाची सुरुवात

[संपादन]

सरोज खान हिने 'जो जीता वही सिकंदर' हा चित्रपट सोडल्यावर त्याचे नृत्यदिग्दर्शन करण्याची संधी फराह खानला मिळाली, तिचे तिने सोने केले. त्यानंतर तिला चित्रपटांवर चित्रपट मिळू लागले.

दूरचित्रवाणीवरही तिने नवोदितांना नृत्याचे धडे दिले.


फराह खानने दिग्दर्शित केलेले चित्रपट

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत