चहाडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चहाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

  ?चहाडे
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
गुणक: (शोधा गुणक)
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा पालघर
सरपंच
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२५२५
• महा४८

भौगोलिक स्थान[संपादन]

पालघर रेल्वे स्थानकापासून मनोर राज्य महामार्गावर १० किमी अंतरावर हे गाव स्थित आहे.वाघोबा खिंड पार केल्यानंतर लगेचच ह्या गावाची हद्द चालू होते.

हवामान[संपादन]

येथे हिवाळ्यात थंडगार वातावरण असते आणि वाघोबा खिंडीतून जाताना भरपूर धुके अनुभवायला मिळते. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे जागोजागी झरे तयार झालेले असतात आणि त्यामध्ये नैसर्गिकरीत्या मासे पैदास होते.उन्हाळ्यात येथे उष्ण हवामान असते.

लोकजीवन[संपादन]

मुख्यतः कुणबी, आदिवासी समाजातील लोक येथे पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत.खरीप हंगामातील भातशेती, नागलीशेती बरोबरच रब्बी हंगामात फुलभाज्या, फळभाज्या, पालेभाज्या ह्यांचे उत्पादन घेतले जाते. सूर्या नदी गावाजवळून वाहत असल्याने आणि बारमाही पाणी उपलब्ध झाल्याने काकडी, पडवळ,दुधी,गलका, कारले, केळी, आळू,शिराळा, कोबी, कांदा, मिरची ह्यांचे भरपूर प्रमाणात उत्पन्न घेतले जाते.

नागरी सुविधा[संपादन]

येथे प्राथमिक शिक्षणाची सोय आहे.गावात सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिक, उच्च शिक्षण तसेच न्यायालयीन कामकाज, महसूल कामकाजासाठी पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.

संदर्भ[संपादन]

https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc