माद्दालेना दे मेदिची
| लिंग | महिला |
|---|---|
| दिलेले नाव | Maddalena |
| आडनाव | मेदिची |
| जन्म तारीख | २५ जुलै 1473 |
| जन्मस्थान | फिरेंझे |
| मृत्यू तारीख | २ डिसेंबर 1519 |
| मृत्यूस्थान | रोम |
| चिरविश्रांतीस्थान | बासिलिका ऑफ सेंट पीटर |
| वडील | लॉरेंझो दे मेदिची |
| आई | क्लॅरिचे ओर्सिनी |
| भावंडे | लुक्रेझिया दे मेदिची, जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची, पोप लिओ दहावा, पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची, काँतेस्सिना दे मेदिची |
| वैवाहिक जोडीदार | फ्रांचेशेत्तो सिबो |
| अपत्य | Lorenzo Cybo, Innocenzo Cybo, Caterina Cybo |
| कुटुंब | मेदिची घराणे |
| व्यवसाय | aristocrat |
| Social classification | सामंतशाही |
मरिया माद्दालेना रोमोलो दे मेदिची तथा माद्दालेना दे मेदिची (२५ जुलै, १४७३ - २ डिसेंबर, १५१९) ही पंधराव्या शतकातील इटलीमधील मेदिची घराण्यातील स्त्री होती. ही लॉरेंझो दे मेदिची याची मुलगी होती. [१] हिचा जन्म व बालपण फिरेंझेमधील होते. ही तिच्या भावंडांसोबत अँजेलो पॉलिझियानो व इतर शिक्षकांकडे शिकले. यामुळे तिच्यावर मानवतावादी संस्कृतीचा प्रभाव होता. [२] हिचे लग्न फेब्रुवारी १४८९ मध्ये पोप इनोसंट आठव्याचा अनौरस मुलगा फ्रांचेशेत्तो सिबो याच्याशी झाले. [२] यात तिने ४,००० डकट्सचा हुंडा आणल्याची नोंद आहे. [२] या विवाहामुळे तिचे कुटुंब आणि व्हॅटिकन यांच्यातील संबंध दृढ झाले. यामुळे पुढे जाता तिचा भाऊ जिओव्हानीला कार्डिनल म्हणून नियुक्ती मिळण्यास मदत झाली. [२] माद्दालेनाने तिचे वडील, तिचा भाऊ पिएरो आणि पोप यांच्यावरील आपल्या तिच्या प्रभावाचा उपयोग मित्रांना आणि गरीब लोकांना चर्च आणि सरकारमध्ये मदत आणि पद मिळवून देण्यासाठी केला. [२]
१४८८मध्ये तिने स्तिलियानो शहरातील गरम पाण्याचे झरे असलेले सार्वजनिक न्हाणीघर विकत घेतले व बुडीत चाललेल्या हा व्यवसायाचे पुनरुत्थान करून ते फायदेशीर करून घेतले. [३]
१५१३ मध्ये तिचा भाऊ जिओव्हानी पोप लिओ दहावा म्हणून निवडून आल्यानंतर माद्दालेना रोमला राहण्यास गेली [२] पोप लिओने तिचा मुलगा इनोसेन्झोला कार्डिनल बनवले. [२] १५१५मध्ये माद्दालेनाला तिच्या भावाकडून रोमन नागरिकत्व आणि निवृत्तीवेतन मिळाले. [२] तिने आपल्या सर्व मुलांची लग्ने उच्चभ्रू कुटुंबात करून दिली. [२] माद्दालेनाने रोमध्ये राहून पोप लिओ दहावा आणि आपला पुतण्या उर्बिनोचा ड्यूक लॉरेंझो यांच्या मदतीने लोकांना संरक्षण, मदत आणि तुरुंगातून सोडवण्याची कामे केली आणि हद्दपारीची शिक्षा कमी करण्यास मदत केली. [२] ती रोममध्ये मृत्यू पावल्यावर तिच्या चुलत भाऊ पोप क्लेमेंट सातव्याच्या आदेशानुसार तिला सेंट पीटर बॅसिलिका येथे दफन करण्यात आले.