Jump to content

लुक्रेझिया दे मेदिची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लुक्रेझिया दे मेदिची
मानव
लिंगमहिला संपादन
दिलेले नावLucrezia संपादन
आडनावमेदिची संपादन
जन्म तारीख१३ ऑगस्ट 1470 संपादन
जन्मस्थानफिरेंझे संपादन
मृत्यू तारीख१५ नोव्हेंबर 1553 संपादन
मृत्यूस्थानफिरेंझे संपादन
चिरविश्रांतीस्थानSanta Maria sopra Minerva संपादन
वडीललॉरेंझो दे मेदिची संपादन
आईक्लॅरिचे ओर्सिनी संपादन
भावंडेपोप लिओ दहावा, पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची, जुलियानो दि लॉरेंझो दे मेदिची, माद्दालेना दे मेदिची, काँतेस्सिना दे मेदिची संपादन
वैवाहिक जोडीदारJacopo Salviati संपादन
कुटुंबमेदिची घराणे संपादन
व्यवसायaristocrat संपादन

लुक्रेझिया मरिया रोमोला दे मेदिची (४ ऑगस्ट, १४७० - नोव्हेंबर, १५५३) ही १५व्या शतकातील इटलीमधील फिरेंझेवर शासन करणाऱ्या मेदिची घराण्यातील स्त्री होती, ती लॉरेन्झो दे मेदिची आणि क्लॅरिचे ओर्सिनी [१] यांची थोरली मुलगी आणि मारिया साल्वियाती आणि जियोव्हानी साल्वियाती यांची आई होती. [२]

लुक्रेझियाचे लग्न फेब्रुवारी १४८८ मध्ये याकोपो साल्व्हियातीशी झाले. [३] तिच्या लग्नात २,००० फ्लोरिन्सचा हुंडा दिला गेला होता. [४] जेव्हा तिच्या भावांना फिरेंझेमधून हद्दपार करण्यात आले तेव्हा ती कठीण परिस्थितीत आली कारण याकोपो नवीन राज्यकर्त्यांचा समर्थक होता. [५] ऑगस्ट १४९७मध्ये तिने तिचा भाऊ पिएरोला सत्तेवर परत आणण्या साठी ३,००० डकट्स खर्च केले. [५] जेव्हा हा कट अयशस्वी झाला तेव्हा त्यात सहभागी झालेल्या पुरुषांना मृत्युदंड देण्यात आली, परंतु फिरेंझेच्या नेता फ्रांचेस्को व्हॅलोरीने लुक्रेझियाला स्त्री असल्यामुळे सोडून दिले. [५]

मार्च १५१३ मध्ये तिचा एक भाऊ पोप लिओ दहावा झाला. [६] १५१४मध्ये व्हॅटिकनचा खजिना रिकामा होत आल्यामुळे त्याने आपला मुकुट लुक्रेझिया आणि तिच्या पतीकडे ४४,००० डुकाट रकमेसाठी गहाण ठेवला होता.[७]

१५३३ मध्ये याकोपोचा मृत्यू झाल्यानंतर वीस वर्षांनी वयाच्या ८३व्या वर्षी लुक्रेझियाचा मृत्यू झाला.

अपत्ये

[संपादन]

लुक्रेझिया आणि याकोपो साल्व्हियातींना अकरा मुले (सहा मुलगे आणि पाच मुली) झाल्या.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Tomas 2003, पान. 7.
  2. ↑ Tomas 2003, पान. 5.
  3. ↑ Tomas 2003, पान. 21.
  4. ↑ Tomas 2003, पान. 20.
  5. 1 2 3 Tomas 2003, पान. 109.
  6. ↑ Tomas 2003, पान. 126.
  7. ↑ Tomas 2003, पान. 130.