क्लॅरिचे ओर्सिनी
क्लॅरिचे ओर्सिनी (१४५३ – १४८८) [१] ही मध्ययुगीन इटलीमधील एक खानदानी स्त्री होती. हे फिरेंझेच्या शासक लॉरेंझो इल मॅग्निफिकोची पत्नी होती व माद्दालेना आणि याकोपो ओर्सिनी यांची मुलगी होती. [१]
क्लॅरिचे आणि लॉरेंझे यांचे लग्न ४-८ जून, १४६९ असे चार दिवसांत झाले [२] हे लग्न लॉरेंझोच्या आई लुक्रेझिया तोर्नाबुओनीने आपल्या मुलाचा व मेदिची कुटुंबाचा सामाजिक दर्जा वाढवण्यासाठी जुळवले होते. [१] लग्नाच्यावेळी लॉरेंझो आणि क्लॅरिचे साधारण एकाच वयाचे होते. तत्कालीन इटलीत हे नवल होते. [१] क्लॅरिचेचा हुंडा 6,000 फ्लोरिन होता. [२]
लग्नानंतर लॉरेंझोने तिचा रिनाल्दोला फिरेंझेचा आर्चबिशप पदावर निवडून येण्यात मदत केली होती.[३] फिरेंझेचे नागरिक आपली गाऱ्हाणी घेउन तिच्याकडे येत असत[४] तिने आपले स्वतःचे हेरवजा ओळखींचे जाळे रचले होते. त्याद्वारे ती सैन्याच्या हालचाली आणि लढायांसह दूरवरच्या राजकीय आणि लष्करी घटनांबद्दल माहिती गोळा करीत असे. [५]
क्लॅरिचे ३० जुलै, १४८८ रोजी फिरेंझेमध्ये मृत्यू पावली. [६] त्यावेळी लॉरेंझो तिच्या जवळ नव्हता. तो स्वतः खूप आजारी असल्याने सिएनाजवळ होता. तो अंत्यसंस्कारालाही येऊ शकला नाही. [६]
पोप इनोसंट आठव्याला लिहिलेल्या पत्रात लॉरेंझो दिवंगत पत्नीची खूप आठवण येते.
अपत्ये
[संपादन]क्लॅरिचे आणि लॉरेंझो यांना दहा मुले झाली:
- लुक्रेझिया दे मेदिची -- हिने याकोपो साल्व्हियेतीशी लग्न केले आणि त्यांना १० मुले झाली, यांत कार्डिनल जियोव्हानी साल्व्हियेती, कार्डिनल बेर्नार्दो साल्व्हियेती, मारिया साल्व्हियेती ( पहिल्या कोसिमो दे मेदिचीची आई), आणि फ्रांचेस्का साल्व्हियेती (पोप लिओ अकराव्याची आई).
- जन्मतः मृत जुळी मुले
- पिएरो दे मेदिची - लॉरेंझोनंतरचा फिरेंझेचा शासक. याला कमनशिबी असे टोपणनाव होते.
- माद्दालेना दे मेदिची -- हिने फ्रांचेशेत्तो सिबो यापोप इनोसंट आठव्याच्या अनौरस मुलाशी लग्न केले. त्यांना ८ मुले झाली.
- काँतेस्सिन बेआत्रिस दे मेदिची -- जन्मानंतर लगेचच मृत
- जियोव्हानी दे मेदिची -- पोप लिओ दहावा
- लुइजिया दे मेदिची -- ही अकराव्या वर्षी मृत्यू पावली.
- काँतेस्सिना दे मेदिची -- हिने पिएरो रिदोल्फीशी लग्न केले. त्यांना कार्डिनल निक्कोलॉ रिदोल्फी ५ मुले झाली.
- जुलियानो दे मेदिची (नेमूर्सचा ड्यूक)
संदर्भ
[संपादन]- ^ a b c d Tomas 2003.
- ^ a b Pernis & Adams 2006.
- ^ Tomas 2003, पान. 59.
- ^ Tomas 2003, पान. 51,62.
- ^ Tomas 2003, पान. 61-62.
- ^ a b Tomas 2003, पान. 24.