Jump to content

बीबी का मकबरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बिबी का मकबरा या पानावरून पुनर्निर्देशित)



बीबी का मकबरा
Monument
बीबी का मकबरा
ऐतिहासिक स्थळ
स्थान छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, भारत
निर्मिती इ.स. १६७९
वास्तुविशारद आजम शहा
वास्तुशैली मुस्लिम स्थापत्यशैली
प्रकार सांस्कृतिक
देश भारत
खंड आशिया

बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे. बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात.

बांधकाम

[संपादन]

ही कबर असलेला मकबरा औरंगजेबाच्या काळात मलिकाच्या मुलाने-आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये बांधला आहे. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी या मिनारांवर जाता येत होते.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

[संपादन]
बीबी का मकबरा

ही राबिया दुर्रानीची कबर २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.