Jump to content

मारिया शारापोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मरिया शारापोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
मारिया शारापोव्हा
देश रशिया ध्वज रशिया
वास्तव्य फ्लोरिडा, अमेरिका
जन्म १९ एप्रिल, १९८७ (1987-04-19) (वय: ३८)
न्यागान, सोव्हिएत रशिया
उंची १.८८ मी (६ फु २ इं)
सुरुवात १९ एप्रिल २००१
शैली उजव्या हाताने
बक्षिस मिळकत $ २,७९,४५,३८१
एकेरी
प्रदर्शन 647–169
अजिंक्यपदे ३२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (२२ ऑगस्ट २००५)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ७
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२००८)
फ्रेंच ओपन विजयी (२०१२, २०१४)
विंबल्डन विजयी (२००४)
यू.एस. ओपन विजयी (२००६)
इतर स्पर्धा
अजिंक्यपद विजयी (२००४)
ऑलिंपिक स्पर्धा रौप्य पदक (२०१२)
दुहेरी
प्रदर्शन 23–17
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४१
शेवटचा बदल: जून २०१४.

मारिया शारापोव्हा (रशियन: Мари́я Ю́рьевна Шара́пова​; जन्मः एप्रिल १९, इ.स. १९८७) ही एक व्यावसायिक रशियन टेनिसपटू आहे. वयाच्या सातव्या वर्षी रशियामधून अमेरिकेत स्थानांतर केलेल्या मारियाने २००४ साली (वयाच्या १७व्या वर्षी) विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकून टेनिस जगतात खळबळ निर्माण केली. आजवर तिने ९ ग्रँड स्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठली असून ५ वेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

टेनिससोबत मॉडेलिंग जगतातही मारियाने नाव कमावले आहे. २००८ व २०१० साली ती सर्वाधिक उत्पन्न मिळवणारी महिला खेळाडू होती.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम स्पर्धा अंतिम फेऱ्या

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजयी2004विंबल्डनगवतीअमेरिका सेरेना विल्यम्स6–1, 6–4
विजयी2006यू.एस. ओपनहार्डबेल्जियम जस्टिन हेनिन6–4, 6–4
उपविजयी2007ऑस्ट्रेलियन ओपनहार्डअमेरिका सेरेना विल्यम्स1–6, 2–6
विजयी2008ऑस्ट्रेलियन ओपनहार्डसर्बिया आना इवानोविच7–5, 6–3
उपविजयी2011विंबल्डनगवतीचेक प्रजासत्ताक पेत्रा क्वितोव्हा3–6, 4–6
उपविजयी2012ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्डबेलारूस व्हिक्टोरिया अझारेन्का3–6, 0–6
विजयी2012फ्रेंच ओपनमातीचेइटली सारा एरानी6–3, 6–2
उपविजयी2013फ्रेंच ओपनमातीचेअमेरिका सेरेना विल्यम्स4–6, 4–6
विजयी2014फ्रेंच ओपन (2)मातीचेरोमेनिया सिमोना हालेप6–4, 6–7(5–7), 6–4

बाह्य दुवे

[संपादन]