Jump to content

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१४ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा सैनिक आपल्या प्रदर्शनीय गणवेशात

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना १७६८ साली झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. सैनिक याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रूपांतर करण्यात आले. मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवारतुतारी हे आहे.

पोशाख

[संपादन]

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. पूर्वी ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती होती. शा पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. आता ही लॅनयार्ड सैन्यातील इतर रेजिमेंटच्या सैनिकांप्रमाणे खांद्यावरच असते. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पूर्वी हे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुऱ्यामुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हणले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.

मर्दुमकी

[संपादन]

या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटेमिया या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून पॅलेस्टाईनमधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इटलीमधील केरेन व आसाम, ब्रह्मदेशमधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युद्धातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे.

सोमालिया

[संपादन]

आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय.

कुटचा वेढा

[संपादन]

काहूनचा पराक्रम

[संपादन]

या पराक्रमाची आठवण म्हणून पुण्यामधील एका रस्त्यास काहून हे नाव देण्यात आले.

पेकींग शहराची शरणागती आणि शांघाईची लढाई

[संपादन]

शरकातचे घनघोर युद्ध

[संपादन]

२९ ऑक्टोबर १९१८ रोजी जो तुर्की सैन्यावर हल्ला केला गेला त्यात तुर्कस्तानची बगदादवरची सत्ता नष्ट झाली. या युद्धाच्या स्मरणार्थ दरवर्षी शरकत दिवस पाळला जातो आणि त्या दिवशी एक खास परेडचे आयोजन केले जाते. या लढाईत ११४व्या मराठा लाईट इन्फंट्रीला २८ शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. एकाच हल्ल्यात इतकी शौर्य पदकं मिळवणारी मराठा लाईट इन्फंट्री ही एकमेव रेजिमेंट आहे. सोबतच त्यांची घोषणा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी आहे .[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ ग्रेट मराठी. "मराठा लाईट इन्फंट्रीबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?". http://greatmarathi.com/. 4 फेब्रुवारी 2020 रोजी पाहिले. External link in |संकेतस्थळ= (सहाय्य)[permanent dead link]