मेसोपोटेमिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नकाशावर मेसोपोटेमिया

हा एक मध्याश्मयुगीन प्रदेश होता.इथे आद्य शेतकऱ्यांचा उगम झाला.असे या प्रदेशाला संबोधले जाते.या प्रदेशात मध्याश्मयुगीन संस्कृती नांदत होती.

आजचे इराक, सीरिया हे देश तसेच इराणचा पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानचा आग्नेय कडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये समावेश होतो.मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे.मेसोस म्हणजे" मधला ". पोटेमोस म्हणजे " नदी ". दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया.दोन नद्यांच्य मुबलक पाणी आणि त्यांना दरवर्षी येणाऱ्या पुरांमुळे सुपीक झालेली जमीन यांमुळे प्राचीन मेसोपोटेमिया मध्ये मध्याश्मयुगीन भटके - निभटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन आद्य गाव - वसाहतींचा उदय झाला. मेसोपोटेमिया मधील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी १०००० वर्ष इतक्या प्राचीन आहेत. तेथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असतं. प्राचीन काळामध्येे मेसोपोटेमिया बरोबर भारताचा व्यापार चालत असे याचा पुरावा म्हणजे लोोथल येथे सापडलेल्या मेसोपोटेमियन मुद्रा होय