कोरेगाव भिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भीमा कोरेगाव या पानावरून पुनर्निर्देशित)
कोरेगावातील ब्रिटिश-पेशवे लढाईत ब्रिटिश व महारांचा विजयस्तंभ

कोरेगाव भिमा हे भीमा नदीच्या डाव्या (उत्तर) काठावर वसलेले भारतातील एक पंचायत गांव आहे. प्रशासकीयदृष्टया, कोरेगांव भिमा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे. कोरेगांव भीमा ग्रामपंचायतमध्ये कोरेगाव भीमाचे फक्त एकच गाव आहे. कोरेगांव भीमा हे शहर, शिकारापूर गावाच्या एसएच ६० मोटरवेसह नैऋत्येकडे आणि पुणे शहराच्या उत्तरपूर्व रस्त्यावरून २८ किमी अंतरावर आहे. १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी पेशवेइंग्रज यांच्यात कोरेगावला लढाई झाली होती. लढाईत महार व इग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला.

इतिहास[संपादन]

लोकसंख्या[संपादन]

इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार, कोरेगाव भिमाची लोकसंख्या १३,११६ आहे, यापैकी १,७५२ पुरुष तर स्त्रियांची संख्या ५,८९६ इतकी आहे. वयोगट ० ते ६ मधील बालकांची संख्या १,९५४ (१४.९०%) आहे. गावात अनुसूचित जातीची लोकसंख्या ११.५४% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या २.०३% आहे.

धर्म[संपादन]

गावातील १३,११६ लोकसंख्येत ९१.८४% हिंदू, ५.२५% मुसलमान, १.९६% बौद्ध, ०.४२ ख्रिस्ती, ०.४० जैन, ०.०५% शीख, ०.०५% इतर धर्मीय आणि ०.०२ निधर्मी आहेत.

संदर्भ[संपादन]