भारतातील हुंडा प्रथा
भारतातील हुंडा प्रथेमध्ये लग्नाच्यावेळी वधूच्या कुटुंबाला अट म्हणून टिकाऊ वस्तू, रोख रक्कम आणि वास्तविक किंवा जंगम मालमत्तेची मागणी करतात.[१][२][३] हुंड्याला हिंदीत "दहेज" व इंग्रजीत "डाउरी" म्हणतात. [४]
हुंडा पद्धतीमुळे वधूच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडू शकतो.[५] काही प्रकरणांमध्ये, हुंडा पद्धतीमुळे महिलांविरुद्धचे गुन्हे घडतात जसे भावनिक अत्याचार आणि दुखापतींपासून मृत्यूपर्यंत.[६] भारताच्या संसदेने मंजूर केलेला हुंडा प्रतिबंध कायदा, १९६१ आणि त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ब आणि ४९८अ द्वारे हुंड्यास विशिष्ट भारतीय कायद्यांतर्गत दीर्घकाळापासून प्रतिबंधित करण्यात आले आहे.[७] हुंडा बंदी कायदा, १९६१ हा हुंडा परिभाषित करतो व लग्नास मुस्लिम वैयक्तिक कायदा लागू असल्यास त्यातील महर ही समाविष्ट नाही.[८]
हुंडा बंदी कायदा, १९६१ चे कलम ३ निर्दिष्ट करते की भेटवस्तू देणे किंवा घेणे हा दंडणीय नाही जर त्यांची मागणी केली जात नसेल.[९]
हुंड्याविरुद्धचे भारतीय कायदे अनेक दशकांपासून लागू असले तरी ते कुचकामी असल्याची टीका मोठ्या प्रमाणात होत आसते.[१०] भारतातील अनेक भागांमध्ये हुंडाबळी आणि हत्या या प्रथा अनियंत्रितपणे सुरू आहेत, ज्यामुळे अंमलबजावणीच्या प्रश्नावर आणखी टीका होत आसते.[११]
भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८अ नुसार पत्नीने हुंड्यासाठी छळाची तक्रार केल्यास वराला आणि त्याच्या कुटुंबाला आपोआप अटक करणे आवश्यक होते. ह्या कायद्याच्या तर्तूदीचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग झाला आहे आणि २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की दंडाधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय अशी अटक करता येणार नाही.[१२]
ऐतिहासिक संदर्भ
[संपादन]दक्षिण आशियातील हुंड्याचा इतिहास स्पष्ट नाही. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की हुंडा प्रथा प्राचीन काळी प्रचलित होती, परंतु काही हे मानत नाहीत. भारतातील हुंडा पद्धतीच्या खुणा वैदिक युगात आढळतात जेथे उच्चवर्णीय हिंदूंमध्ये ही सामान्य प्रथा दिसत आहे.
मायकेल विट्झेल, जे एक जर्मन-अमेरिकन भारतशास्त्रज्ञ आहेत, ते असा दावा करतात की प्राचीन भारतीय साहित्य सूचित करते की वैदिक काळात हुंडा प्रथा लक्षणीय नव्हती.[१३] विट्झेल असेही नमूद करतात की प्राचीन भारतातील स्त्रियांना एकतर भाऊ नसताना किंवा नियुक्तीद्वारे मालमत्तेचा वारसा हक्क देखील होता.
अलेक्झांडर द ग्रेटच्या विजयातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा लिखाणात (३०० ईसापूर्व) असे नोंदवले आहे की भारतात हुंडा प्रथा नसल्याचा उल्लेख आहे.[१४]
अबू रेहान अल-बिरुनी हे एक मुस्लिम पर्शियन विद्वान होते जे इ.स. १०१७ पासून १६ वर्षे भारतात राहिले. त्यांनी अनेक भारतीय ग्रंथांचे अरबी भाषेत भाषांतर केले, तसेच भारतीय संस्कृती आणि त्यांनी पाहिलेले जीवन यावर एक संस्मरण लिहिले. अल-बिरुनी यांनी दावा केला आहे तेव्हाच्या लग्नपद्ध्तीत हुंडा नव्हता.[१५]
हुंड्याची कारणे
[संपादन]भारतातील हुंडा प्रथेची विविध कारणे सांगितली गेली आहेत. यामध्ये आर्थिक घटक आणि सामाजिक घटकांचा समावेश होतो.
हुंडा व्यवस्थेला हातभार लावणारे अनेक आर्थिक घटक आहेत. यापैकी काहींमध्ये वारसा प्रणाली आणि वधूची आर्थिक स्थिती यांचा समावेश होतो.
वारसाबाबत कमकुवत कायदेशीर संस्था स्त्रियांना गैरसोयीच्या आहे आणि वारसा फक्त मुलांकडेच राहतो.[१६] यामुळे स्त्रिया त्यांच्या पतींवर आणि सासरच्या लोकांवर अवलंबून रहावे लागते ज्यासाठी हुंडा देतात.[१७] १९५६ पूर्वी, ब्रिटिश राजवटीच्या काळात, मुलींना त्यांच्या कुटुंबाच्या संपत्तीवर वारसा हक्क नव्हता. १९५६ मध्ये, भारताने हिंदू उत्तराधिकार कायद्यांतर्गत, हिंदू, शीख आणि जैन कुटुंबांमधील मुली आणि पुत्रांना समान कायदेशीर दर्जा दिला. नवीन वारसा कायदा असूनही, पालकांच्या मृत्यूनंतर पालकांच्या संपत्तीचे वाटप सामाजिक प्रक्रियेद्वारे मुलीला तिच्या लग्नाच्या वेळी केले जाते अशी प्रक्रिया म्हणून हुंडा चालू ठेवला आहे.[१८]
हुंड्याने, किमान सैद्धांतिकदृष्ट्या, स्त्रियांना त्यांच्या लग्नात जंगम वस्तूंच्या रूपात आर्थिक सुरक्षा दिली जाते. यामुळे कौटुंबिक संपत्तीचे तुकडे टाळण्यास मदत झाली आणि त्याच वेळी वधूला सुरक्षा प्रदान करण्यात आली.[१६][१९]
हुंडा, सामाजिक रीतिरिवाज किंवा विधींवर प्रभाव टाकणाऱ्या विवाह प्रथांव्यतिरिक्त, पालकांच्या हुंड्याची अपेक्षा असल्याने सुरू आहे. १९९५ च्या एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की हुंड्याबद्दल लोकांचा दृष्टीकोन बदलत असतानाही हुंडा प्रचलित आहे.[२०][२१] १९८० च्या एका अभ्यासात, ७५% विद्यार्थ्यांनी असा प्रतिसाद दिला की लग्नासाठी हुंडा महत्त्वाचा नाही, परंतु त्यांच्या पालकांपैकी ४०% पालकांना हुंडा अपेक्षित आहे.[२०]
गुन्हे
[संपादन]नवविवाहित स्त्री हुंड्याशी संबंधित हिंसाचाराचे लक्ष्य असू शकते कारण ती तिच्या नवऱ्याशी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बांधली जाते.[२२] काही प्रकरणांमध्ये, वधूच्या कुटुंबाकडून अधिक मालमत्ता मिळविण्यासाठी हुंडा ही धमकी किंवा ओलिस प्रकारची परिस्थिती म्हणून वापरली जाते.[२३][१९] हुंड्याचे गुन्हे धमकी किंवा हिंसाचाराने घडू शकतात, त्यामुळे वधूच्या कुटुंबाला त्यांच्या मुलीच्या संरक्षणासाठी अधिक हुंडा देण्याशिवाय पर्याय राहत नाही.[१९] भारताच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हुंडा-संबंधित हिंसाचाराचे प्रमाण जास्त आहे.[२४]
संदर्भ
[संपादन]- ^ "Moneycontrol.com". 8 March 2007. 11 January 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Rani Jethmalani & P.K. Dey (1995). Dowry Deaths and Access to Justice in Kali's Yug: Empowerment, Law and Dowry Deaths. pp. 36, 38.
- ^ Paras Diwan and Peeyushi Diwan (1997). Law Relating to Dowry, Dowry Deaths, Bride Burning, Rape, and Related Offences. Delhi: Universal Law Pub. Co. p. 10.
- ^ Waheed, Abdul (February 2009). "Dowry among Indian muslims: ideals and practices". Indian Journal of Gender Studies. 16 (1): 47–75. doi:10.1177/097152150801600103.
- ^ Anderson, Siwan (2007). "The Economics of Dowry and Brideprice". The Journal of Economic Perspectives. 21 (4): 151–174. doi:10.1257/jep.21.4.151.
- ^ Anita Rao and Svetlana Sandra Correya (2011). Leading Cases on Dowry. New Delhi: New Delhi: Human Rights Law Network.
- ^ "Arrest of police officer in unlawful detention under s 498A". Into Legal World. 8 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2017 रोजी पाहिले.
- ^ Rao, C.N. Shankar (2019). Indian Social Problems. S. Chand. p. 238. ISBN 978-93-848-5795-0.
- ^ "The Dowry Prohibition Act, 1961". 27 January 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Manchandia, Purna (2005). "Practical Steps towards Eliminating Dowry and Bride-Burning in India". Tul. J. Int'l & Comp. L. 13: 305–319.
- ^ Spatz, Melissa (1991). "A "Lesser" Crime: A Comparative Study of Legal Defenses for Men Who Kill Their Wives". Colum. J. L. & Soc. Probs. 24: 597, 612.
- ^ "No arrests under anti-dowry law without magistrate's nod: SC". The Times of India. 3 July 2014. 7 July 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Witzel, Michael. "Little Dowry, No Sati: The Lot of Women in the Vedic Period." Journal of South Asia Women Studies 2, no. 4 (1996).
- ^ John Watson McCrindle (Translator), The Invasion of India by Alexander the Great as described by Arrian, Archibald Constable & Co. (Westminster, UK): 280 ページ出版
- ^ Edward Sachau (Translator), Bīrūnī, Muḥammad ibn Aḥmad, Alberuni's India (Vol. 2), Kegan Paul, Trench, Trübner & Co. (London, 1910.) Chapter LXIX: 154 ページ出版; see Al-Hind too.
- ^ a b Dalmia, Sonia; Pareena G. Lawrence (2005). "The Institution of Dowry in India: Why It Continues to Prevail". The Journal of Developing Areas. 38 (2): 71–93. doi:10.1353/jda.2005.0018.
- ^ Majumdar, Maya (2005). Encyclopaedia of Gender Equality Through Women Empowerment. Sarup & Sons. p. 74. ISBN 9788176255486.
- ^ Lucy Carroll (1991), Daughter's Right of Inheritance in India: A Perspective on the Problem of Dowry, Modern Asian Studies, Vol. 25, No. 4, pages 791-809
- ^ a b c Teays, Wanda (1991). "The Burning Bride: The Dowry Problem in India". Journal of Feminist Studies in Religion. 7 (2): 29–52.
- ^ a b Rao, V.V. Prakasa; V. Nandini Rao (1980). "The Dowry System in Indian Marriages: Attitudes, Expectations And Practices". International Journal of Sociology of the Family. 10 (1): 99–113.
- ^ Krishnaswamy, Saroja (1995). "Dynamics of personal and social factors influencing the attitude of married and unmarried working women towards dowry". International Journal of Sociology of the Family. 25 (1): 31–42.
- ^ Srinivasan, Sharada; Arjun S. Bedi (2007). "Domestic Violence and Dowry: Evidence from a South Indian Village". World Development. 35 (5): 857–880. doi:10.1016/j.worlddev.2006.08.005.
|hdl-access=
requires|hdl=
(सहाय्य) - ^ Bloch, Francis; Vijayendra Rao (2002). "Terror as a Bargaining Instrument: A Case Study of Dowry Violence in Rural India" (PDF). The American Economic Review. 92 (4): 1029–1043. doi:10.1257/00028280260344588.
|hdl-access=
requires|hdl=
(सहाय्य) - ^ "National Crime Statistics 2012 (p. 196), National Crime Statistics 2013 (p. 81)" (PDF). National Crime Records Bureau, India. 16 January 2013. 20 June 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 25 April 2015 रोजी पाहिले.