Jump to content

बामियान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बामियान प्रांत तथा बाम्यान प्रांत (दारी/पश्तो:ولایت بامیان) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या मध्य भागात असलेल्या या प्रांतात ८ जिल्हे असून येथील लोकसंख्या ४,९५,५५७ आहे.[] यांतील बव्हंश हजारा असून काही प्रमाणात ताजिक लोकही येथे राहतात. या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र बामियान आहे.

सातव्या शतकात येथे बांधलेले बुद्धाचे प्रचंड पुतळे तालिबानने २००१मध्ये भग्न केले.

चतुःसीमा

[संपादन]

बामियान प्रांताच्या सीमा परवान प्रांत, बाघलान प्रांत, वारदाक प्रांत, समानगान प्रांत, सर-ए-पोल प्रांत, दायकुंडी प्रांत, घोर प्रांत आणि गझनी प्रांतांना लागून आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2020-21" (PDF). Islamic Republic of Afghanistan, National Statistics and Information Authority. 2020-07-03 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 6 June 2021 रोजी पाहिले.