फ्रेंच इंडोचीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
फ्रेंच इंडोचीन
[[चित्र:|border|30 px|link=गुयेन घराणेशाही]] 
30 px 
Flag of Cambodia (1863–1948).svg 
Flag of Laos (1893–1952).svg
इ.स. १८८७इ.स. १९५४ Flag of North Vietnam (1945–1955).svg  
[[चित्र:|border|30 px|link=दक्षिण व्हियेतनाम]]  
Flag of Cambodia.svg  
Flag of Laos (1952–1975).svg
Flag of France.svgध्वज
French indochina map.png
फ्रेंच इंडोचीनचे जगातील स्थान
राष्ट्रगीत: ला मार्सेयेझ
राजधानी सैगॉन (1887-1902)
हनोई (1902–1939), (1945-1954)
दा लात (1939–1945)
अधिकृत भाषा फ्रेंच, व्हियेतनामी, लाओ, कंबोडियन
क्षेत्रफळ ७,३७,००० (इ.स. १९३५) चौरस किमी
लोकसंख्या २,१५,९९,५८२ (इ.स. १९३५)

फ्रेंच इंडोचीन (फ्रेंच: Indochine française, ख्मेर: សហភាពឥណ្ឌូចិន, व्हियेतनामी: Đông Dương thuộc Pháp) ही फ्रेंच वसाहती साम्राज्याची आग्नेय आशियामधील एक मोठी वसाहत होती. १८८७ साली फ्रान्सने व्हियेतनामचे उत्तर, मध्य व दक्षिण प्रदेश तसेच कंबोडिया समवेत ह्या वसाहतीची स्थापना केली. १९८३ साली लाओसला फ्रेंच इंडोचीनमध्ये विलिन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धकाळात फ्रेंच इंडोचीनचे नियंत्रण विशी फ्रान्सकडे होते. युद्धाच्या उत्तरार्धात जपान हा भूभाग आक्रमण करून बळकावला. ह्यादरम्यान उत्तर व्हियेतनाममध्ये हो चि मिन्ह ह्याच्या नेतृत्वाखाली व्हियेत मिन्ह ह्या गटाने स्वातंत्र्यचळवळ चालवण्यास सुरुवात केली.

महायुद्ध संपल्यानंतर ऑगस्ट १९४५ मध्ये फ्रान्सने पुन्हा येथे अधिपत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर व्हियेत मिन्हने त्यास विरोध केला ज्याची परिणती पहिल्या इंडोचीन युद्धामध्ये झाली. १९५४ साली ह्या युद्धात फ्रान्सचा पराभव झाल्यानंतर जिनिव्हा येथील एका परिषदेमध्ये फ्रेंच इंडोचीनचे विघटन करण्याचे ठरले. ह्यामधून कंबोडियालाओस हे स्वतंत्र देश तर व्हियेतनामचे उत्तरदक्षिण हे दोन तुकडे निर्माण झाले.