विशी फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विशी फ्रान्स
État Français
French State

Flag of France.svg १९४०१९४४ Flag of France.svg
Flag of France.svgध्वज Informal emblem of the French State (1940–1944).svgचिन्ह
France map Lambert-93 with regions and departments-occupation.svg
राजधानी विशी
अधिकृत भाषा फ्रेंच

विशी फ्रान्स किंवा नाझी फ्रान्स हे नाव जुलै १९४० ते ऑगस्ट १९४४ दरम्यान नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेल्या फ्रान्सचा उल्लेख करण्याकरिता वापरले जाते. दुसर्‍या महायुद्धामध्ये ऍडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने १० मे १९४० रोजी फ्रान्ससोबत युद्ध पुकारून लष्करी आक्रमण केले व २५ जून १९४० रोजी फ्रान्सने शरणागती पत्कारली. त्यानंतर फ्रान्सचे ३ तुकडे पाडण्यात आले. उत्तरेकडील मोठा भाग जर्मनीने बळकावला, पूर्वेकडील छोट्या भागावर इटलीने कब्जा मिळवला तर दक्षिणेकडील भाग स्वतंत्र राहिला. ह्या तिन्ही भागांवर विशी फ्रान्सची सत्ता होती. फेलिप पेतें हा विशी फ्रान्सचा प्रमुख होता.