फ्रीडरिश नित्ची
फ्रीडरिक विल्हेम कार्ल लुडविग नित्ची ( ऑक्टोबर १५, इ.स. १८४४, रॉकेन, जर्मनी - ऑगस्ट २५, इ.स. १९००) हा एकोणिसाव्या शतकातील जर्मन तत्त्वज्ञ होता. याने धर्म, नीती, तत्त्वज्ञान, तत्कालीन संस्कृती आणि विज्ञान यांवर अनेक टीकात्मक ग्रंथ रचले. द बर्थ ऑफ ट्रॅजेडी पासून द ग्रीक स्टेट पर्यंत अनेक ग्रंथांचे लेखन नित्चीने केले.

जन्म[संपादन]
जर्मनीतील लिपझिग जवळच्या रॉकेन या छोट्याशा खेड्यात नित्चीचा जन्म १५ ऑक्टोबर १८४४ रोजी सकाळी १० च्या सुमारास झाला. योगायोगाने याच दिवशी नेमका प्रूशियाचा राजा फ्रीडरिक विल्हेल्म चौथा याचा ४९ वा जन्मदिवस होता. राजाच्या जन्मदिनी मुलाचा जन्म झाल्याने नित्चीच्या वडिलांनी राजाचेच नाव मुलाला ठेवले. राजाने त्यांना त्या प्रांताचा मंत्री म्हणून नेमलेले होते.[१]नित्चीच्या वडिलांचे नाव कार्ल लुडविग नित्ची आणि आईचे नाव फ्रान्झिस्का नित्ची होते.[२]
फीडरिक १८५४ साली नॉम्बर्ग शहरास राहण्यास गेला.
संदर्भ[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
- ^ Robert Wicks, Friedrich Nietzsche,http://plato.stanford.edu/entries/nietzsche
- ^ Dale Wilkerson, Friedrich Nietzsche http://www.iep.utm.edu/nietzsch/