युनिव्हर्सिटी ऑफ बॉन
Type | सार्वजनिक विद्यापीठ |
---|---|
स्थापना | १८ ऑक्टोबर, इ.स. १८१८ |
विद्यार्थी | ३५,६१९ |
बॉन विद्यापीठ जर्मनीतील बॉन शहरातील विद्यापीठ आहे. येथे स्नातक, अनुस्नातक आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम उपलब्ध असून ५४४ प्राध्यापक अंदाजे ३५,००० विद्यार्थ्यांना शिक्षण देतात.बॉन विद्यापीठाच्या ग्रंथालयात ५०,००,००० पेक्षा अधिक पुस्तके आहेत.
या विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांत मिळून सात नोबेल पारितोषिके, तीन फील्ड्स मेडल विजेते, बारा गॉटफ्रीड विल्हेल्म लाइब्नित्स पुरस्कार विजेते समाविष्ट आहेत. फ्रीडरिक नित्ची, पोप बेनेडिक्ट सोळावा, सॅक्स-कोबर्ग-गोथाचा आल्बर्ट|राजकुमार आल्बर्ट, कार्ल मार्क्स, कॉनराड आडेनोउअर, हाइनरिक एडुआर्ड हाइन, फ्रीडरिक तिसरा, जर्मनी|फ्रीडरिक तिसरा, जोझेफ शुंपेटर यांनी या विद्यापीठात शिक्षण घेतले.
या विद्यापीठाची स्थापना १८ ऑक्टोबर, इ.स. १८१८ रोजी प्रशियाचा राजा फ्रीडरीश विल्हेम तिसरा|फ्रीडरीश विल्हेम तिसऱ्याने केली.